भारतातील दळणवळण सुविधा आणि संचार

भारतातील दळणवळण 

भारतातील दळणवळण – संचार

    शब्द आणि संदेशांचे एका स्रोतांकडून दुसऱ्या स्रोताकडे वहन किंवा पारेषण याला संचार म्हणतात. हे संदेश दृक-श्राव्य असतात. जेव्हा हे वहन एकमेकांच्या संपर्कात न येता संपर्क होतो तेव्हा त्याला दूरसंचार म्हणतात.

याची विविध माध्यम आहेत. उदाहरण- टपाल जाळे, टपाल सेवा, टेलिफोन, रेडिओ, टेलिग्राफ, टेलिव्हिजन, सिनेमा, इंटरनेट, नियतकालिके, फॅक्स, टेलेक्स इत्यादी संचार चे विविध माध्यम आहे. अनेक ठिकाणी काही वेळा टेलिफोन सेवांना दूरसंचार म्हणून ओळखले जाते. रेडिओ, नियतकालिके, सिनेमा, टेलिव्हिजन, जाहिरात आणि नृत्य नाटक यांना पारंपारिक माध्यम म्हणून ओळखतात. व त्यांना जन संचार माध्यम असे म्हणतात. त्यामुळे एकाच वेळी असंख्य लोकापर्यंत संदेश वहन शक्य होते. यामध्ये नियतकालिकांना प्रिंट मीडिया असे म्हटले जाते.

दळणवळण
दळणवळण

भारतातील दळणवळण – टपाल जाळे

           भारतातील पोस्टाचे जाळे हे जगातील सर्वात मोठे जाळे म्हणून ओळखले जाते. आणि २०११ अखेर पोस्ट कार्यालयांची संख्या एकूण १,५४,८६६ एवढी आहे. त्यातील ८९.७८ टक्के कार्यालय ग्रामीण भागात आहेत. आणि १०.२२ टक्के कार्यालय शहरी भागात आहेत. हेड पोस्ट ऑफिस, सब पोस्ट ऑफिस, एक्स्ट्रा डिपार्टमेंटल ब्रँच  पोस्ट ऑफिस, एक्स्ट्रा डिपार्टमेंटल सब पोस्ट ऑफिस ही पोस्टाची चार कार्यालय आहेत.

भारतातील दळणवळण – टपाल सेवा

             टपाल सेवा, वित्तीय सेवा, व्यवसाय विकास काम आणि अधिमूल्यवर्धित सेवा हे टपाल सेवा मध्ये चार प्रकार पडतात.

टपाल सेवा- प्रथम दर्जा टप्पल आणि संचार सेवा या सेवा ही टपाल सेवा मध्ये समावेश केला जातो. त्यात पोस्टकार्ड अंतर्देशीय पत्र व पाकिटांचा समावेश केला जातो. आणि दोन शहरे हवाई मार्गाने जोडलेले असेल तर यांची वाहतुक हवाईमार्गाने केली जाते. त्यातच वाहतूक सेवा द्वितीय दर्जा यांचाही समावेश होतो. यात पुस्तके, नियतकालिके व नोंदणीकृत वर्तमानपत्रे इ. समावेश होतो. यांची वाहतूक रेल्वे मार्गांनी किंवा रस्ते मार्गांनी केली जाते. टपाल व्यवस्था ही व्यवस्थित चालण्यासाठी १९७२ सालापासून पिन कोड याची व्यवस्था सुरू केली होती. त्यामुळे प्रत्येक शहराला आणि गावाला सहा आकडी स्वतंत्र नंबर दिला गेला. या पोस्टात खात्यातर्फे अनेक प्रकारच्या वित्तीय सेवा दिल्या जातात. याची सुरुवात १८८० पासून झाली होती.

सेवांमध्ये पैशांची पाठवण पाच हजार रुपयापर्यंत शक्य झाले. कोणी ९४ पासून उपग्रहाच्या सहाय्याने ऑर्डर सेवा सुरू करण्यात आली होती. /’त्यामुळे वेळेची बचत होणे शक्य झाले. यासाठी VSAT टर्मिनल्स हे मोठ्या कार्यालयामध्ये स्थापन केले आहेत. देशामध्ये पोस्ट ऑफिस ही सर्वात मोठी बचत बँक आहे. या बँकेच्या सहाय्याने आठ वित्तीय सेवा देतात.

आवर्ती ठेवी, सार्व भविष्यनिर्वाह निधी, बचत बँक, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, मुदत ठेवी, जेष्ठ नागरिक बचत योजना, मासीक उत्पन्न योजना, विकास पत्र, इत्यादी पोस्ट ऑफिस बचत बॅंकेचे सेवा आहेत. पोस्ट खात्याच्या सहाय्याने अनेक प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी ई-बिल पोस्ट, एक्सप्रेस पार्सल पोस्ट, स्पीड पोस्ट सेवा, डायरेक्ट पोस्ट, मेघदूत पोस्ट कार्ड, आणि बिजनेस पोस्ट, इत्यादी च्या सहाय्याने वित्तीय सेवा दिल्या जातात.

भारतातील दळणवळण – टेलिफोन

         अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध १९७५ साली लावला. १९१३ ते १४ या साली सिमला येथे पहिले स्वयंचलित टेलिफोन एक्सचेंज सुरु करण्यात आले होते. भारतात कलकत्त्याला टेलिफोन सेवा १९८१ ते १९८२ साली करण्यात आले होते. STD सेवा ही १९६० या साली देशात सुरू केली गेली. कानपूर ते लखनौ याठिकाणी पहिली STD टाकण्यात आली. टेलिफोनच्या संदेशाचे वहन जमिनीत पुरलेल्या केबलच्या माध्यमातून केला जातो. हे केबल्स आधी तांब्याच्या तारेचा होते. सेल्यूलर सेवा ही टेलिफोन सेवा म्हणून ओळखले जाते. या सेल्स चा आकार षष्टकोणी असतो.

भारतातील दळणवळण – रेडिओ

       भारतात रेडिओ चे प्रसारण हे १९२० साली सुरू झाले होते.बॉम्बे चा रेडिओ क्लब १९२३ मध्ये पहिल्या कार्यक्रमाचे प्रसारण सुरू केले होते. स्वातंत्र काळी भारतात सहा रेडिओ केंद्र होते. त्यातील तीन रेडिओ केंद्र पाकिस्तान कडे गेली. ऑल इंडिया रेडिओ च्या मद्रास स्टेशने ने १९७७ सलीम पहिली सेवा सुरू करण्यात आली. ऑल इंडिया रेडिओ चे नाव १९५७ साली बदलून आकाशवाणी ठेवण्यात आले होते. भारतात स्वातंत्र्य काळी रेडिओचे केंद्रे ६ आणि १८ ट्रान्समीटर होते. त्यामुळे अनेक लोकांपर्यंत रेडिओ चे कार्यक्रम पोहोचत होते.

भारतातील दळणवळण – टेलिग्राफ

          विल्यम ओ शॉगनेसी यांनी भारतात टेलिग्राफ चा विकास घडवून आणले. भारतात पहिली प्रायोगिक टेलिग्राफ लाईन कोलकाता ते डायमंड हार्बर येथे १९५० साली सुरू केले गेले. त्यांच्यावर लॉर्ड डलहौसीने कलकत्ता जवळील टेलिग्राफ लाईन या बांधकामाची पहिली जबाबदारी टाकली गेली. अनेक लोक भारतात या टेलिग्राफ कार्यालयाच्या कामात गेले होते. या रेडिओ मुळे टेलिग्राफ संदेश आग्रा हुन कोलकत्ता पर्यंत सहज पाठविणे शक्य झाले.

भारतात टेलिग्राफ कायदा ही १९८५ मध्ये संमत केली गेली. आणि भारतात टेलिग्राफ ची सेवा जनतेसाठी १८५३ साली सुरू करण्यात आले. ही सेवा १६३ वर्षानंतर १४ जुलै २०१३ या दिवशी संध्याकाळी पाच वाजता सेवा कायमची बंद केली गेली. त्यामुळे बीएसएनएल यांच्या मुळे टेलिग्राफ ची सेवा उपलब्ध करुन देण्यात आले होते.

भारतातील दळणवळण – टेलिव्हिजन

             भारताचे पहिले टेलिव्हिजन हे दिल्ली येथील आकाशवाणी भवनातील एका स्टुडीओ मधून १५ सप्टेंबर १९६९ साली प्रसारण करण्यात आली. भारतात टेलिव्हिजन ची पहिली सिरीयल तिसरा रास्ता हि सिरीयल १९६२ साली प्रसारित झाली. हम लोग हे रंगीत दूरदर्शन वरील पहिली सिरीयल १९८४ साली प्रसारित करण्यात आली. कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून नियमित प्रक्षेपण हे १९८२ सुरू केले गेले. ऑल इंडिया मध्ये रेडिओ पासून दूरदर्शन हे १९७६ साली करण्यात आले. दूरदर्शन सेवा ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. सत्यम शिवम सुंदरम हे दूरदर्शन चे घोषवाक्य आहे. त्यानंतर दूरदर्शनचे काही चॅनेल प्रसारित करण्यात आले. डी डी भारती, डीडी नॅशनल, डीडी स्पोर्ट्स, डीडी न्यूज यासारखे अनेक प्रकारचे चॅनेल निर्माण करण्यात आले.

भारतातील दळणवळण – नियतकालिके

               नियतकालिकांचे कार्यालय १ जुलै १९५६ रोजी अस्तित्वात आले होते. भारतातील वर्तमानपत्रे आणि नियतकालिक यांचा वार्षिक अहवाल दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी सादर करण्यात येत होते. काही नियतकालिके ही हिंदीत आणि इंग्रजीत प्रकाशित केले गेले होते. काश्मिरी भाषा सोडली तर अनेक दैनिक वर्तमानपत्रे सर्व देशातील प्रमुख भाषांमध्ये प्रकाशित केले जात होते. काही वर्तमानपत्रे उत्तरप्रदेशमधून प्रकाशित केले जात होते. १८२२ बॉंबे समाचार हे मुंबईतून प्रकाशित केले गेलेले देशातील जुने कार्यरत वर्तमानपत्र आहे.

अशा प्रकारे संचार साधने समजून घेता येतील. कोणत्याही देशाच्या विकासात संचार साधने अत्यावश्यक व महत्वाची ठरतात. संचार प्रभावी असेल तर विकासाची गती जास्त असते.

माहिती आवडल्यास शेअर करा. आणखी वाचा …..

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती – प्रमुख 12 जिल्हे ।khanij Sampatti

Rivers in Maharashtra महाराष्ट्रातील नद्या,प्रमुख 3 नद्यांसह

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “भारतातील दळणवळण सुविधा आणि संचार”

Leave a Comment