बी फार्मसी B Pharmacy कशी करायची ? | B Pharmacy information in Marathi

बी फार्मसी B Pharmacy कशी करायची ? | B Pharmacy information in Marathi

मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की बारावी नंतर काय करावे? कोणत्या शाखेला ॲडमिशन घ्यावे? इत्यादी अशा अनेक प्रकार चे विद्यार्थ्यांना करिअर बद्दलचे प्रश्न पडले पडलेले असतात. कारण बारावीच्या विद्यार्थ्यांना करियर बद्दलचा हा निर्णायक टप्पा (Turning Point) असतो.

बारावी विज्ञान शाखे नंतर अनेक असंख्य कोर्स आहेत म्हणजेच डॉक्टर (Doctor), औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy), अभियांत्रिकीय (Engineering), प्यारा मेडिकल कोर्स (Paramedical Course) इत्यादी. असे अनेक कोर्स आहेत जे की आपण बारावी सायन्स विज्ञान शाखेनंतर करू शकतो. तर आपण आजच्या या लेखामध्ये बी फार्मसी (B Pharmacy) कशी करायची? या लेखाबद्दल पाहणार आहोत.

            तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की बी फार्मसी (B Pharmacy) कशी करायची? बी फार्मसी म्हणजे काय असते? बी फार्मसी साठी आपली शैक्षणिक योग्यता किंवा पात्रता काय असावी? बी फार्मसी हा कोर्स केव्हा करतात? कोणती परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते? फार्मसिस्ट (Pharmacist) कोण असतो? व त्याची भूमिका काय असते? त्यांचे काय काम आहे? बी फार्मसी (B Pharmacy) किती वर्षाचा कोर्स असतो? आणि बी फार्मसी (B Pharmacy) कशी करायची?

बी फार्मसी (B Pharmacy) याबद्दल संपूर्ण माहिती तसेच अशाच अनेक बी फार्मसी बद्दलच्या सर्व गोष्टी आपण आज या लेखामध्ये पाहणार आहोत. जेणेकरून तुम्हाला सर्वांना कळेल की फार्मसी म्हणजे काय असते किंवा किती फार्मसीचे प्रकार आहेत. फार्मसिस्ट बनण्यासाठी आपली योग्यता किंवा पात्रता असणे आवश्यक असते? व आपल्याला कोणती पुस्तके अभ्यासावी लागतात? अशा काही अनेक गोष्टी / बाबी आहेत जे की तुम्हाला माहीत नसतील ते आपणाला आज या लेखांमधून समजून जाईल. आणि आपणाला बी फार्मसी बद्दल माहिती आज तुम्हाला या लेखांमधून कळेल. आणि आपण बी फार्मसी अभ्यासाच्या तयारीला लागू.

        तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना असे वाटते की फार्मसी केल्यानंतर फक्त औषध दुकानच काढता येतो तर तो तुमचा गैरसमज आहे. फार्मसी केल्यानंतर संशोधन क्षेत्रात ही मोठ्या पदावर काम करता येतो. आपण जगाच्या नकाशात पहायला गेलं तर फार्मा हा औषध निर्माण शास्त्र मध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

∆  B Pharmacy बी फार्मसी प्रवेश हायलाईट्स.

  बी फार्मसी (B Pharmacy)  प्रवेशाची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :-

  श्रेणी मुख्य हायलाइट (Major Highlight)
पातळी डिग्री (Bachelor)
कालावधी 4 वर्ष
परीक्षा प्रकार सेमिस्टरनिहाय परीक्षा
पात्रता 10 + 2 किंवा डिप्लोमा इन फार्मसी (D Pharmacy)
प्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षा (Entrance Exam)
कोर्स फी 40,000/ ते 1,00,000/ वर्ष

The Full Form Of B.Pharma is Bachelor Of Pharmacy.

१) बी फार्मसी म्हणजे काय असते? व त्यांची कार्य काय असते?

         तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की बी फार्मसी (B Pharmacy) म्हणजे काय? तर बी फार्मसी हा कोर्सचा कालावधी 4 वर्षाचा असतो. आणि त्यांना हा 4 वर्ष कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वतःचा मेडिकल स्टोअर सुद्धा काढता येतो व एखाद्या मोठ्या नामांकित कंपनीत काम करता येते. वेगवेगळ्या तऱ्हेचे आजारांवर औषध निर्माण करणे व त्याच्यावर चाचणी करणे हे त्यांचे कार्य असते.

२) बी फार्मसी (B Pharmacy) व डी फार्मसी (D Pharmacy) या दोघांमध्ये काय फरक आहे?

         तर विद्यार्थी मित्रांनो बी फार्मसी व डी फार्मसी हे दोन्ही कोर्स दिसायला जरी सारखे असले किंवा दोन्ही समान शब्द असले तरी या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. बी फार्मसी (B Pharmacy) हा 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे.यामध्ये आठ सेमिस्टर असतात. तर डी फार्मसी (D Pharmacy) हा 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. तर तुम्हाला डी फार्मसी (D Pharmacy) बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर मागच्या लेखात डी फार्मसी बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे ते तुम्ही पाहू शकता.

३) बी फार्मसी (B Pharmacy) करण्यासाठी आपली काय शैक्षणिक योग्यता किंवा पात्रता (Eligibility Criteria / Qualification) असावी लागते?

        तर विद्यार्थी मित्रांनो बी फार्मसी हा कोर्स करण्यासाठी आपल्याला दहावीनंतर विज्ञान शाखेला (Science Stream) प्रवेश घेणे गरजेचे असते. आणि हा कोर्स बारावी नंतर म्हणजेच (10 + 2) केला जातो. विद्यार्थी हा भारतीय राष्ट्रीय असावा आणि उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र (10+2) शिक्षण मंडळाची परीक्षा उत्तीर्ण असावा. बारावी मध्ये विद्यार्थ्यांने भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र(Chemistry), आणि जीवशास्त्र (Biology) किंवा गणितासह (Mathematics) [PCM/B] परीक्षा उत्तीर्ण असावी. आणि विद्यार्थ्यांना या पात्रता परीक्षेमध्ये किमान 45% किंवा 50% गुण मिळवणे आवश्यक आहे किंवा कोर्स देणारी संस्था / विद्यापीठाने नमूद केलेले किमान गुणांचे निकष असू शकतात. आणि जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी म्हणजेच डी फार्मसी (D Pharmacy) केलेले आहे त्यांनीही हा कोर्स करू शकतात.

४) बी फार्मसी ला ऍडमिशन मिळविण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी किंवा उत्तीर्ण व्हावे लागते?

       तर प्रत्येक विद्यार्थी मित्राला हा प्रश्न पडलेला असतो की बी फार्मसी ला ऍडमिशन कशी मिळवायची? तर बी फार्मसी ला ऍडमिशन मिळवायची असेल तर महाराष्ट्र सेल मार्फत परीक्षा घेतली जाते ती म्हणजे Entrance Based Admission महाराष्ट्र सीईटी (MHCET) ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. विद्यार्थ्यांना ॲडमिशन बारावीच्या गुणावरून मेरीट सूची वरून ऍडमिशन मिळते.

Entrance Based Admission:-

       बी फार्मसी कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना फार्मसी महाविद्यालये किंवा संस्थांची निवड प्रक्रिया पार पाडावी लागते. आणि निवड प्रक्रियेमध्ये पात्र प्रवेश परीक्षेसाठी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी परीक्षा घेतली जाते जसे की महाराष्ट्रात एमएच सीईटी [Maharashtra Common Entrance Test (MHCET)], कर्नाटकात के सीईटी [Karnataka Common Entrance Test (KCET)] इत्यादी अशा प्रकारचे वेगवेगळ्या राज्यात परीक्षा घेतली जाते ती परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण व्हावे गरजेची असते. ही परीक्षा 200 गुणांची असते प्रत्येकी एका प्रश्नाला एक गुण असतो आणि या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसतो. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. आणि जर खाजगी कॉलेज मध्ये प्रवेश घ्यावयाचा असेल तर एखादी कॉलेज स्वतःचा CET परीक्षा सुद्धा घेतली जाऊ शकते. (Click For MHT-CET BOOKS)

बी फार्मसी प्रवेश परीक्षांची यादी (Entrance Exams For B Pharmacy) खालील प्रमाणे :-

प्रवेश परीक्षांची यादी
MHT-CET (Maharashtra Common Entrance Test)
KCET (Karnataka Common Entrance Test)
UPSEE (Uttar Pradesh State Entrance Examination)
PUCET (Panjab University Common Entrance Test)
NIPER JEE (National Institute of Pharmaceutical Education and Research Joint Entrance Exam)

५) बी फार्मसी (B Pharmacy) नंतर काय?

         तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना प्रश्न पडला असेल की बी फार्मसी नंतर काय? तर आपणाला Medical Shop किंवा Chemist Shop चालू करू शकता. आणि या कोर्सनंतर आपण केमिस्ट्री प्रोफेसर, लॅब असिस्टंट, प्रयोगशाळा तज्ञ (Laboratory Expert) बनू शकता. जर विद्यार्थ्यांना या कोर्सनंतर याही पुढे शिकायचे असेल तर एम फार्मा (M Pharmacy) हा कोर्स करू शकतात. हा कोर्स दोन वर्षाचा असतो. किंवा फार्मसीमध्ये आपण पीएचडी (Ph.D) सुद्धा करू शकतो म्हणजेच डॉक्टरेट पदवी मिळवू शकतो.

६) अंतिम निष्कर्ष :-

        तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या लेखांमधून समजले असेल की बी फार्मसी (B Pharmacy) कशी करायची? बी फार्मसी म्हणजे काय व त्याची शैक्षणिक पात्रता किंवा योग्यता काय आहे इत्यादी अनेक गोष्टी किंवा बाबी तुम्हाला या लेखांमधून मिळाली असेल. तरी तुम्हाला अजून काही बी फार्मसी (B Pharmacy) कशी करायची? याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्स (Comment Section) मध्ये विचारू शकता.

       विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की बी फार्मसी (B Pharmacy) कशी करायची? व त्यानुसार तुम्ही अभ्यासाला लागू शकाल.

हे हि वाचा …

NDA Admission Process in Marathi | एन डी ए परीक्षा 2021

UPSC information in Marathi । upsc 2021 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे?

Maharashtra police bharti 2021 | महाराष्ट्र पोलीस भरती 2021

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

20 thoughts on “बी फार्मसी B Pharmacy कशी करायची ? | B Pharmacy information in Marathi”

  1. क्या मैं इस वेबसाइट के एडमिन से बात कर सकती हूँ?

    Reply
  2. B pharma c नंतर कोनता जाँब मिळतो पेमेंट किती मिळते mht cat ला कगती मार्क लागतात सगळी माहिती सांगा

    Reply
  3. Hello sir in 2023 HSC board I got 47.83%😞and I want to do a B pharma can I do this can I got admission.🥺 If yes then please tell me the pharmacy college name and where is that colleges 🙏🏻

    Reply

Leave a Comment