Bharatacha Bhugol Marathi Mahiti | भारताचा भूगोल – पर्वत व पठार

Bharatacha Bhugol Marathi Mahiti | भारताचा भूगोल – पर्वत व पठार

उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश

                 हिमालय पर्वत रांगा या सर्वात अर्वाचीन घडीच्या पर्वतरांगा आहेत. हिमालय हा जगातील सर्वात उंच भूस्वरूपीय उठावाचा प्रदेश आहे. या पर्वत रांगा चा गाभा कनाश्म खडकांनी बनलेला असून त्याच्या दुतर्फा रूपांतरित व गाळाचे खडक आहेत. या प्रदेशाची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये अतिशय असमान भूस्वरूपे आहेत. तीव्र उतारअत्युच्च बर्फाच्छादित शिखरे, थंड हवामान, अरुंद खोल दऱ्या, वेगाने वाहणाऱ्या नद्या, ही हिमालय पर्वताची वैशिष्ट्ये आहेत. तिथे रस्त्यांची संख्या कमी आहे.

विखुरलेल्या शेतजमिनीचे डोंगर उतारावर सपाट तुकडे पायऱ्या प्रमाणे आहेत. हा एक बहुतांश ठिकाणी मनुष्य वस्ती नसलेला विस्तारित भूप्रदेश आहे. त्याच्या पूर्वेकडील भागात खूप जास्त पर्जन्यमान, नैसर्गिक वनस्पतींचे दाटीवाटीने झालेली वाढ आणि दूरवर पसरलेले विविध सांस्कृतिक समूह आहेत. ते विखुरलेल्या वस्त्यांमधून राहतात. भूपृष्ठीय क्षितिज समांतर हालचालीमुळे दाब पडून तो गाळ झाला आहे. या गाळामुळे हिमालयात वली पर्वताची निर्मिती झाली आहे.

हिमालयाच्या पर्वतरांगा

    Bharatacha Bhugol मधील हा अतिशय महत्वाचा भाग आहे. शिवालिक टेकड्या- शिवालिक टेकड्या हे  हिमालयच्या दक्षिणेकडील श्रेणी आहे. या शिवालिक टेकड्यांना रंग, बाह्य, हिमालय, आणि उप हिमालय श्रेणी म्हणून ओळखले जाते. तरुण, कमी उंचीची व हिमालयातील सर्वात बाहेरचे टेकडी आहे. हिमालयाच्या पायथ्याशी शिवालिक टेकड्या पाकिस्तानमधील पवार ते  ब्रह्मपुत्रा खोरे इथपर्यंत पसरले गेले आहेत.शिवालिक टेकड्या ची उंची ९०० ते ११००मीटर इतकी आहे. आणि याची लांबी २४०० किलोमीटर इतकी आहे. व रुंदी दहा ते पन्नास किलोमीटर आहे. शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या दऱ्या यांना डून या नावाने ओळखतात.

लघु हिमालय-लघु हिमालयाला निम्न हिमालय आणि मध्य हिमालय ही म्हणून ओळखले जातात. लघु हिमालयाच्या उत्तरेकडे शिवालिक टेकड्या ह्या ८० किलोमीटरवर आहे. आणि ते हिमालयाच्या एका विशाल पर्वतीय क्षेत्राला लागून आहे. हिमालया जवळची काही शिखरे समान स्वरूपाच्या आहेत.

बृहद  हिमालय-बृहद हिमालय हे अति उत्तरेकडे असून त्याच्या पर्वतरांगा सर्वोच्च पसरलेल्या आहेत. बृहद हिमालयाला हिमाद्री म्हणून ओळखले जाते. बृहद हिमालयाचा विस्तार पश्चिमेकडील नंगा पर्वत ते पूर्वेकडे नामचा बरुआ येथे सर्वात लांब पर्वत रांगा आहेत. पश्चिमेकडील नंगा पर्वताची उंची ८१२६ मीटर इतकी आहे. आणि पूर्वेकडील नामचा बरूआ याची उंची ७७५६ मीटर इतके आहे.

हिमालया पलीकडील पर्वतरांगा

                 हिमालयापलीकडील पर्वतरांगांमध्ये लढाख कैलास आणि काराकोरम या पर्वतरांगा येतात. भारताच्या बाहेर या क्षेत्रात कैलास रांगा आहे. आणि पर्जन्यछायेच्या प्रदेशात लडाख प्रदेश आहे. माऊंट एव्हरेस्ट हे शिखर नेपाळ पर्वतरांग हिमालय मध्ये आहे. आणि त्याची उंची ८८४८ मीटर आहे. आणि माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.

नंदादेवी हे कुमाऊ हिमालयामध्ये आहे. ते भारत देशामध्ये येते. त्याची उंची ७८७० मीटर असून ते कुमाऊं तील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई हे उत्तर सह्याद्री पर्वत रांगातील आहे. कळसुबाई महाराष्ट्र मध्ये येते त्याची उंची  १६४६ मीटर असून ते महाराष्ट्रामधील सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर आहे.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश

               उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हे हिमालयाच्या दक्षिणेकडे आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हे भारताच्या द्वीपकल्पाच्या उत्तरेकडे पसरलेले आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हे गंगेचे मैदान आहे. आणि हे गंगेचे मैदान भारतीय संस्कृतीचे माहेरघर आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हे भूगोलाच्या शास्त्रानुसार त्याची निर्मिती सर्वात शेवट निर्माण झाली आहे.

भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा यासारख्या नदींच्या गाळातून पाचशे ते चारशे मीटर खोल हे मैदान (Bharatacha Bhugol) तयार झालेले आहेत. या मैदानी प्रदेशाचा विस्तार पश्चिमेकडून राजस्थान ना पासून ती पूर्वेकडे आसाम इथेपर्यंत पसरले गेले आहे. या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशांमध्ये राजस्थान मैदान, गंगेचे मैदान, आणि पश्चिम मैदान, या सारखे तीन भाग पडतात.

पश्चिम मैदान प्रदेशांमध्ये हरियाणा आणि पंजाब या राज्यातील मैदानी प्रदेशांचा समावेश होतो. राजस्थान मैदान हा भारताच्या वायव्य भागात भारतीय महावाळवंटात येतो. राजस्थान मधील सिंधू संस्कृतीत सापडलेले पुराने वस्तू या उत्खननात सापडले आहेत. पूर्व मैदान मध्ये आसाम मधील ब्रह्मपुत्रेचे मैदान आणि बिहार व पश्चिम बंगालातील गंगेचा त्रिभुज प्रदेश त्यांचा समावेश केला गेला आहे.

bharatacha bhugol,
bharatacha bhugol

Bharatacha Bhugol भारतीय पठारी प्रदेश

            भारतीय पठारी प्रदेश द्वीपकल्पीय पठारी प्रदेश म्हणून देखील ओळखला जातो. भारतीय पठारी प्रदेशाचा आकार अनियमित व त्रिकोणाकृती आहे. भारतीय पठारी प्रदेश हा भू शास्त्रानुसार जडणघडण यादृष्टीने निर्माण झालेला भारतातील सर्वात म्हणजेच प्राचीन भूभाग असून तेथे भूवैज्ञानिक घडामोडींचे केंद्रस्थान आहे. भारतीय पठारी प्रदेशाची उंची सरासरी तीनशे ते दोन हजार मीटर इतकी आहे. 

Bharatacha Bhugol – भारतीय पठाराचे वर्गीकरण उत्तर भारतीय पठार व दक्षिण भारतीय पठार असे केले जाते.

१) उत्तर भारतीय पठार

नद्या व डोंगर रांगा उत्तर भारतीय पठार याचे विभाजन करतात. यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना माळवा बुंदेलखंड बाघेलखंड छोटानागपूर अशी विविध नावे उत्तर भारतीय पठाराला असलेली दिसतात.

उत्तर भारतीय पठार पश्चिमेस हरवली पर्वतापासून पूर्वेकडे राजमहाल टेकड्या पर्यंत विस्तारलेला आहे.

जगातील प्राचीन वली पर्वत म्हणून अरवली पर्वताला ओळखले जाते आणि ते उत्तर भारतीय पठाराचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.

२) दक्षिण भारतीय पठार

दक्षिण भारतीय पठार आला दख्खनचे पठार असेही म्हटले जाते. दख्खनच्या पठाराची चे चार भाग केले जातात ते पुढील प्रमाणे…

  • महाराष्ट्र पठार 
  • कर्नाटक पठार 
  • तेलंगणा पठार 
  • ईशान्य पठार

महाराष्ट्र पठार

महाराष्ट्र पठाराची निर्मिती अग्निजन्य बेसाल्ट खडकापासून झालेली आहे. महाराष्ट्र पठार विस्तार पश्चिमेस अरबी समुद्र पासून उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीरांगा असा आहे.

महाराष्ट्र पठारातील कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे.

कर्नाटक पठार

कर्नाटक पठार हे अग्निजन्य व रूपांतरित खडकांचे बनलेले आहे. पश्चिमेस पश्चिम पठार ते पूर्व घाट दक्षिणेस निलगिरी पर्वत व उत्तरेस महाराष्ट्र पठार यांच्या दरम्यान कर्नाटक पठाराचा विस्तार झालेला आहे. कर्नाटक पठारा मध्ये कृष्णा तुंगभद्रा कावेरी या प्रमुख नद्या वाहतात.

तेलंगणा पठार

तेलंगणा राज्यात असणाऱ्या तेलंगणा पठारा मध्ये मोठ्या प्रमाणावर तलावांची निर्मिती झाली आहे.

ईशान्य पठार

बाघेलखंड, छोटा नागपूर पठार व गर्जत टेकड्या यांचा समावेश ईशान्य पठारा मध्ये होतो. छोटा नागपूर पठार हा विशेषतः खनिजं साठी पूर्ण देशांमध्ये अग्रेसर असणारा भूभाग आहे.खनिज संपन्न प्रदेश म्हणून छोटा नागपूर पठार यांना ओळखले जाते.

हेही वाचा ….

महाराष्ट्रातील 18 व्या शतकातील समाजसुधारक Samajsudharak

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक | DCC Bank

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “Bharatacha Bhugol Marathi Mahiti | भारताचा भूगोल – पर्वत व पठार”

Leave a Comment