भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती | Bharat ratna puraskar list Marathi 2024

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती | Bharat Ratna Puraskar list Marathi 2024

 Bharat ratna puraskar list Marathi: भारतरत्न पुरस्कार या विषयी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. भारतरत्न पुरस्कार भारत देशातील एक अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे. इतकेच नव्हे तर भारतरत्न पुरस्कार देशातील नागरी पुरस्कार मधील सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतरत्न पुरस्कार व्यतिरिक्त भारतामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री असे विविध नागरी पुरस्कार बहाल केले जातात.

Bharatratn puraskar
Bharat Ratna puraskar list in Marathi

भारतरत्न पुरस्काराची सुरुवात पुरस्काराचे स्वरूप आणि आत्तापर्यंत किती लोकांना हा पुरस्कार देण्यात आला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भारतरत्न पुरस्काराची सुरुवात २१ जानेवारी १९५४ पासून झाली. 

भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप सूर्याची प्रतिकृती आणि देवनागरी लिपी मध्ये भारतरत्न लिहिलेले ब्राँझ धातू पासून बनवलेल्या पिंपळाच्या पानाचा आकार असलेले स्मृतिचिन्ह राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली सनद आणि गळ्यात घालण्याचे पदक अशा स्वरुपात दिले जाते. या पुरस्कारांमध्ये रोख रकमेचा समावेश नसतो. 

एका वर्षांमध्ये जास्तीत जास्त तीन लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो. अपवाद फक्त १९९९ आणि २०२४ या वर्षीचा आहे. १९९९ मध्ये चार लोकांना तर २०२४ मध्ये ५ लोकांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. पुरस्काराविषयी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जनता सरकार जेव्हा देशांमध्ये अस्तित्वात आले तेव्हा १९७७ मध्ये या पुरस्कारा वरती बंदी घालण्यात आलेली होती. मात्र १९८० मधले इंदिरा गांधी सरकारने हा पुरस्कार देण्याची पुन्हा सुरुवात केलेली होती.

आपल्या भारत देशाचा अत्यंत मानाचा पुरस्कार असल्याने या पुरस्काराची प्रतिष्ठा देखील तितकीच उच्च दर्जाची आहे. 

भारत रत्न पुरस्कार आज पर्यंत 53 व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे.

भारतरत्न पुरस्कार सुरूवातीला म्हणजे १९५४ मध्ये पुढील व्यक्तींना बहाल करण्यात आला.

  • १) सी राजगोपालचारी – भारतीय राजकारणी, स्वातंत्र्य कार्यकर्ते, वकील, लेखक, इतिहासकार आणि राजकारणी.
  • २) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन – भारतीय तत्त्वज्ञ आणि राजकारणी.
  • ३) सी व्ही रमण – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

आज पर्यंत भारत रत्न पुरस्कार मरणोत्तर सुद्धा बहाल करण्यात आलेला आहे. मरणोत्तर पुरस्कार मिळालेली पहिली व्यक्ती लाल बहादूर शास्त्री हे होते. 

आज पर्यंत दोन परदेशी व्यक्तींना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. खान अब्दुल गफार खान यांना १९८७ मध्ये तर नेल्सन मंडेला यांना १९९० मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

Bharat Ratna List in Marathi | भारतरत्न पुरस्कार विजेते राष्ट्रपती

  • १) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन  –  १९५४
  • २) डॉक्टर राजेंद्र प्रसाद  – १९६२
  • ३) झाकीर हुसेन  – १९६३
  • ४) वराहगिरी वेंकट गिरी  – १९७५
  • ५) डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम  – १९९७
  • ६) प्रणव मुखर्जी  – २०१९

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती महिला | Bharat Ratna Award Winners in Marathi

राष्ट्रपती पुरस्कार हा आतापर्यंत पाच महिलांना मिळाला आहे 

  • १) इंदिरा गांधी   -१९७१ 
  • २) मदर तेरेसा   -१९८० 
  • ३) अरुणा आसफ अली  – १९९७ 
  • ४) एम एस   सुब्बुलक्ष्मी  – १९९८ 
  • ५) लता मंगेशकर  – २००१ 

राष्ट्रपती पुरस्कार आतापर्यंत सात पंतप्रधानांना मिळाला आहे 

  • १) पंडित जवाहरलाल नेहरू – १९५५ 
  • २) लालबहादूर शास्त्री – १९६६ 
  • ३) इंदिरा गांधी – १९७१ 
  • ४) मोरारजी देसाई – १९९१ 
  • ५) गुलजारी लाल नंदा – १९९७ 
  • ६) राजीव गांधी – १९९१ 
  • ७) अटल बिहारी वाजपेयी – २०१५ 

आजपर्यंत सर्वाधिक भारतरत्न रत्न पुरस्कार प्राप्त नागरिक महाराष्ट्र राज्याचे आहेत. महाराष्ट्रातील एकूण नऊ व्यक्तींना आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेश राज्याचा नंबर लागतो. उत्तर प्रदेश राज्य एकूण आठ व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. 

२०१९ चे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारतातील रत्ने 

  • १) प्रणव मुखर्जी  – भारताचे 13 वे राष्ट्रपती
  • २) भूपेन हजारिका – सामाजिक कार्यकर्ते
  • ३) नानाजी देशमुख – पार्श्वगायक, गीतकार, संगीतकार, गायक, कवी आणि चित्रपट निर्माता

2019 चा भारतरत्न पुरस्कार नानाजी देशमुख भूपेन हजारिका यांना मरणोत्तर मिळालेला आहे.

२०१९ नंतर २०२०, २०२१, २०२२ आणि 2023 या वर्षी भारत रत्न पुरस्कार जाहीर झालेले नाही आहेत.

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती 2024 | Bharat Ratna Award in Marathi 2024

  • कर्पूरी ठाकूर – राजकारणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री
  • लालकृष्ण अडवाणी- माजी राजकारणी आणि माजी उपपंतप्रधान
  • पी व्ही नरसिंह राव – माजी पंतप्रधान
  • चौधरी चरणसिंग – माजी पंतप्रधान
  • एम एस स्वामिनाथन – शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरित क्रांतीचे जनक

Bharat Ratna Puraskar in Marathi | भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती 2024

  • १) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  – 1954
  • २) चक्रवर्ती राजगोपालचारी – 1954
  • ३) डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण – 1954
  • ४) डॉ. भगवान दास  – 1955
  • ५) सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या – 1955
  • ६) पंडित जवाहरलाल – 1955
  • ७) नेहरू गोविंद वल्लभ पंत – 1957
  • ८)  महर्षी धोंडो केशव कर्वे – 1958
  • ९) बिधान चंद्र रॉय – 1961
  • १०) पुरुषोत्तम दास टंडन – 1961
  • ११) डॉ. राजेंद्र प्रसाद – 1962
  • १२) डॉ. जाकिर हुसैन – 1963
  • १३) डॉ. पांडुरंग वामन काणे  – 1963
  • १४) लाल बहादूर शास्त्री – 1963
  • १५) इंदिरा गांधी – 1971
  • १६) वराहगिरी वेंकट गिरी – 1975
  • १७) के कामराज – 1976
  • १८) मदर तेरेसा – 1980
  • १९) आचार्य विनोबा भावे – 1983
  • २०) खान अब्दुल गफार खान – 1987
  • २१) मुर्दुर गोपाला रामचंदम – 1988
  • २२) भीमराव रामजी आंबेडकर – 1990
  • २३) नेल्सन मंडेला – 1990
  • २४) राजीव गांधी  – 1991
  • २५) सरदार वल्लभभाई पटेल – 1991
  • २६) मोरारजीभाई देसाई – 1991
  • २७) मौलाना अबुल कलाम आझाद – 1992
  • २८) जहांगीर रतनजी दादाभाई टाटा – 1992
  • २९) सत्यजित रे  – 1992
  • ३०) अरुणा असिफ अली – 1997
  • ३१) गुलजारी लाल नंदा – 1997
  • ३२) एपीजे अब्दुल कलाम – 1997 
  • ३३) एम एस सुब्बलक्ष्मी – 1998
  • ३४) सि. सुब्रमण्यम – 1998
  • ३५) जयप्रकाश नारायण  – 1999
  • ३६) पंडित रविशंकर – 1999
  • ३७) अमर्त्य सेन – 1999
  • ३८) गोपीनाथ बोरदोलोई – 1999
  • ३९) लता मंगेशकर – 2001
  • ४०) उस्ताद बिस्मिल्ला खा – 2001
  • ४१) पंडित भीमसेन जोशी – 2009
  • ४२) सचिन तेंडुलकर – 2014
  • ४३) सी एन आर राव – 2014
  • ४४)अटल बिहारी वाजपेयी – 2015
  • ४५) पंडित मदनमोहन मालवीय – 2015
  • ४६) प्रणव मुखर्जी – 2019
  • ४७) नानाजी देशमुख – 2019
  • ४८) भूपेन हजारिका – 2019
  • ४९) कर्पूरी ठाकूर – 2024
  • ५०) लालकृष्ण अडवाणी – 2024
  • ५१) पी व्ही नरसिंह राव – 2024
  • ५२) चौधरी चरणसिंग – 2024
  • ५३) एम एस स्वामिनाथन – 2024

महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते | Bharat Ratna Award Winners from Maharashtra

क्रमांक नाव पुरस्कृत वर्ष
1 धोंडो केशव कर्वे १९५८
2 पांडुरंग वामन काणे १९६३
3 आचार्य विनोबा भावे १९८३
4 डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९९०
5 जे.आर.डी. टाटा १९९२
6 लता मंगेशकर २००१
7 भीमसेन जोशी २००८
8 सचिन तेंडुलकर २०१४
9 नानाजी देशमुख २०१९

भारतरत्न पुरस्कारासंबंधी महत्वाची माहिती । Bharat ratna information in marathi

  • भारतरत्न पुरस्कार दरवर्षी जास्तीत जास्त 3 लोकांना दिला जाऊ शकतो, शेवटी 1999 मध्ये 4 जणांना पुरस्कार देण्यात आले.
  • भारतरत्न पुरस्कारामध्ये पुरस्काराची रक्कम दिली जात नाही.
  • राज्यघटनेच्या कलम 18 (1) नुसार कोणताही पुरस्कार विजेता त्याच्या नावापुढे किंवा मागे पुरस्काराचे शीर्षक जोडू शकत नाही.
  • जनता पार्टी सरकारने 1977 मध्ये भारतरत्न पुरस्कार बंद केला होता, त्यानंतर 1980 मध्ये तो पुन्हा सुरू करण्यात आला आणि मदर तेरेसा यांना सन्मानित करण्यात आले.
  • भारतरत्न आणि इतर पद्म पुरस्कार कोलकाता येथील अलीपूर टकसाल येथे बनविले जातात.
  • 1966 नंतर मरणोत्तर भारतरत्नही सुरू करण्यात आला.
  • भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या इंदिरा गांधी या पहिल्या महिला ठरल्या.
  • डी.के. कर्वे यांना 1958 मध्ये वयाच्या 100 व्या वर्षी भारतरत्न मिळाले.
  • 1997 मध्ये सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु त्यांच्या मृत्यूच्या वादामुळे ते देण्यात आले नाही.

FAQ

Q. भारतरत्न मिळवणारे पहिले गैर-भारतीय कोण?

A. खान अब्दुल गफ्फार खान

Q. भारतरत्न पुरस्काराचा पहिला प्राप्तकर्ता कोण आहे?

A. C राजगोपालाचारी

Q. कोणत्या उद्योगपतीला भारतरत्न देऊन गौरविण्यात आले आहे?

A. जेआरडी टाटा

Q. भारतरत्न पुरस्कार मिळविणारी पहिली महिला कोण आहे?

A. इंदिरा गांधी

Q. भारतरत्न पुरस्कार कोणाद्वारे दिले जातात?

A. राष्ट्रपती

Q. भारतरत्न मिळालेला पहिला खेळाडू कोण होता?

A. सचिन तेंडुलकर हा भारतरत्न मिळवणारा पहिला खेळाडू होता.

हे हि वाचलात का …

भारतीय घटना कशी तयार झाली ?

महाराष्ट्रातील 18 व्या शतकातील समाजसुधारक Samajsudharak

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment