चालू घडामोडी डिसेंबर २०२० | mpsc current affairs
बोरीस जॉन्सन प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना 2021 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून औपचारिक निमंत्रण दिले आहे. हे औपचारिक निमंत्रण स्वीकारल्याची घोषणा ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमनिक राब यांनी केली आहे. यापूर्वी 1993 मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान जॉन मेजर हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आज पर्यंत पाच ब्रिटनच्या व्यक्तींनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे अतिथी पद भूषवले आहे. 2020 मध्ये ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते.
जगातील सर्वात मोठा पर्यायी वीज निर्मिती प्रकल्प गुजरात मध्ये
जगातल्या सर्वात मोठ्या पर्यायी वीज निर्मिती प्रकल्पाचे 16 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. जगातील सर्वात मोठा पर्यायी वीज प्रकल्प गुजरात मधील खवडा येथे आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीत कोहली अग्रेसर
भारताचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. आयसीसी कसोटी फलंदाजांच्या यादीत प्रथम स्थान ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ याने पटकावले.तर याच यादीतले तिसरे स्थान न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याने पटकावले. फलंदाजांच्या यादीत अन्य भारतीय खेळाडूंचा विचार करता चेतेश्वर पुजारा सातव्या स्थानी तर अजिंक्य राहणे दहाव्या स्थानावर आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा तिसऱ्या स्थानावर ती आहे. रविचंद्रन अश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
महिला व बालकांवरील अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्राचा शक्ती कायदा
महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवा शक्ती कायदा प्रस्तावित केला आहे.
शक्ती कायदा
महिला व बालकांसाठी अशा प्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य ठरणार आहे या प्रकारचा कायदा याआधी हैदराबाद जळीतकांड नंतर तेलंगणा सरकारने केला आहे. तेलंगाना सरकारच्या अशा प्रकारच्या काय त्याला दिशा हे नाव आहे.
महाराष्ट्र सरकारने खास समिती नेमून दिशा कायद्याचा अभ्यास करून या विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. कायद्यातील महत्त्वाच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे
- शक्ती कायद्यातील तपासाचा कालावधी दोन महिन्या वरून 15 कामकाज दिवस इतका करण्यात आलेला आहे.
- शक्ती कायद्याअंतर्गत खटला चालवण्याचा कालावधी दोन महिन्या वरून तीस दिवसांचा करण्यात आलेला आहे.
- या कायद्यांतर्गत अपिलाचा कालावधी सहा महिन्या वरून 45 दिवसांचा केला आहे.
- शक्ती कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नवीन न्यायालयीन व्यवस्था निर्माण करण्याची तरतूद या कायद्यांतर्गत देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ स्थापन होणार
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 या विधेयकास विधिमंडळात मंजुरी देण्यात आली. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. mpsc current affairs videos
mpsc current affairs december 2020 | chalu ghadamodi 2020
Nobel Puraskar 2020 | नोबेल पुरस्कार २०२०