जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक | DCC Bank information in Marathi

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक | DCC Bank information in Marathi

DCC Bank म्हणजेच District Central Co-operative Bank. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हा घटक समजून घेण्याआधी सहकार समजले पाहिजे.  सहकार समजण्यासाठी सहकार चळवळ माहीत असावी लागते.  सहकार चळवळीतून विविध सहकारी संस्था उदयास आल्या.  सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामूहिक विकास साधणे सहज साध्य झाले. 

सहकार म्हणजे समान उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने काही लोक एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात व  सहकाराने विकास साधतात.  सहकारामध्ये एकमेकांना सहकार्य करणे महत्त्वाचे असते. 

सहकारातून उदयास येणाऱ्या विविध संस्था मधून एक महत्त्वाची संस्था म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक /DCC Bank होय. 

DCC bank

लोकांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी किंवा आर्थिक सहकार्य साधण्याच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अस्तित्वात आल्या.  सहकारी बँका या स्वतंत्र नसून यामध्ये सहकार्याची एक शृंखला पाहावयास मिळते. 

राज्य सहकारी बँक | District Co-operative Banks in Marathi

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक / DCC Bank ही राज्य सहकारी बँक यांच्या निर्देशानुसार कार्य करत असते.  म्हणून सहकारी बँक रचनेमध्ये राज्य सहकारी बँक सर्वोच्च आहे.  राज्य सहकारी बँक सहकारी बँकांची शिखर बँक म्हणूनही ओळखली जाते.  

 महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही शिखर बँक म्हणून कार्य करते.  महाराष्ट्र राज्याच्या राज्य सहकारी बँकेची स्थापना स्वातंत्र्य पूर्वीचा ११ ऑक्टोबर १८९१ मध्ये झालेली आहे.   महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आपल्या चार प्रादेशिक कार्यालयांच्या माध्यमातून कार्यकर्ते ही प्रादेशिक कार्यालये औरंगाबाद, नाशिक, पुणे व नागपूर या ठिकाणी आहेत. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील सहकारी बँक व्यवसायाचे प्रतिनिधित्व करते.  ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या विविध सहकारी बँक पतसंस्थांना बचत गटांना एकत्रित ठेवण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करत असते. सहकारातून मिळणाऱ्या विविध सुविधा व वित्त विषयक बाबी ग्रामीण भागातील या संस्थान पर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महत्त्वाची भूमिका बजावतात. 

भांडवल उभारणीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठेवी कर्जे स्वतंत्र रीतीने उभारलेला निधी इत्यादी माध्यमांचा वापर करतात.  ग्रामीण भागामध्ये आर्थिक सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या संजीवनी ठरलेल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकूण ३६ जिल्हे असले तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका मात्र ३१ आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वित्तीय समावेशन घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सहकारी संस्था ठरतात.  आर्थिक व वित्तीय सुविधा ग्रामीण भागापर्यंत व तळागाळापर्यंत पोहोचणे  म्हणजे वित्तीय समावेशन होय.  देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत आर्थिक सुविधा पोहोचविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक / DCC Bank महत्त्वाच्या आहेत. 

 आणखी वाचा….

भारतीय बँक व्यवस्था – RBI / रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापना, रचना,कार्ये

Banking Career Information In Marathi

भारतातील दळणवळण सुविधा आणि संचार

Rivers In Maharashtra

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment