मराठी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते । Dnyanpeeth Puraskar Marathi list 2024

ज्ञानपीठ पुरस्कार | Dnyanpeeth Puraskar Marathi list 2024

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील साहित्यिकांसाठी अत्यंत सन्माननीय पुरस्कार आहे.  भारतीय साहित्य क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे.  ज्याप्रमाणे नागरी पुरस्कारांमध्ये भारतरत्न पुरस्कार सर्वोच्च आहे आहे त्याप्रमाणे ज्ञानपीठ पुरस्काराचे महत्व साहित्यविश्वात अनन्यसाधारण आहे. या लेखात “ज्ञानपीठ पुरस्कार” या बद्दल सखोल माहिती अभ्यासणार आहोत. dnyanpeeth puraskar Marathi list

dnyanpeeth puraskar Marathi list

ज्ञानपीठ पुरस्कारचा इतिहास (History of  Gyanpeeth Award in Marathi)

भारतीय लेखकांच्या सन्मानार्थ प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारास ज्ञानपीठ पुरस्कार असे संबोधतात. हा पुरस्कार सुरू करण्या मागे ‘रमा जैन ‘ यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतीप्रसाद जैन यांनी भारतीय लेखकांच्या सन्मानार्थ हे करण्याचा निर्णय घेतला होता.  

२२ मे, १९६१ मध्ये साहू जैन यांच्या ५१ व्या वाढदिवसा निमित्त त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्ट कडून ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर केला. त्यानुसार भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती. रमा जैन, १६ सप्टेंबर १९६१ रोजीच्या सोसायटीच्या बैठकीत ज्ञानपीठ पुरस्कार  बाबत पहिला ठराव मांडला. 

त्या ठरावा नंतर दिल्ली येथे २ एप्रिल १९६१ या दिवशी ३०० विद्वानांना देशभरातून आमंत्रण  देण्यात आले होते. हे विद्वान दोन सत्रात विभागले गेले होते.  

या सत्राच्या अध्यक्ष स्थानी डॉ. व्ही. राघवन होते आणि डॉ. भगवती चरण वर्मा होते.  या बैठकीतून तयार करण्यात आलेल्या पुरस्काराचा संपूर्ण आराखडा डॉ. राजेंद्र प्रसाद  यांनी मांडला. 

त्या नंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ते मान्य करून निवड समितीचे प्रमुख पदही स्वीकारले. परंतु १९६३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर काकासाहेब कालेलकर आणि डॉ.संपूर्णानंद यांनी ते कार्य संपादन केले. 

ज्ञानपीठ पुरस्कार काय आहे ? (What is Dnyanpeeth Award in Marathi)

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार आहे जे भारतीय संविधानात मान्यता प्राप्त असलेल्या “२२ अनुसूचित भाषां पैकी कोणत्याही” भाषे मधील लेखकांना सर्वोत्तम सर्जनशील साहित्यिक लेखनासाठी दरवर्षी हा  पुरस्कार दिला जातो

रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि विद्येची देवी वाग्देवी (सरस्वती) ची कांस्य प्रतिकृती असे या पुरस्काराचे स्वरूप असते. 

भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संस्थेने ते प्रायोजित केले आहे. ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1961 मध्ये करण्यात आली आणि पहिला पुरस्कार 1965 मध्ये देण्यात आला

1982 पर्यंत तो विशिष्ट कार्यासाठी दिला जात होता; त्यानंतर, लेखकाच्या साहित्यातील एकूण योगदानासाठी हा पुरस्कार चालू करण्यात आला आहे. तेव्हा पासून, हा पुरस्कार दरवर्षी एका लेखकाला दिला जातो, तसेच सद्यस्थितीत हा पुरस्कार संयुक्त पणे दोघांना ऑफर केला जातो. 

१९८२ पूर्वी हा सन्मान लेखकाच्या कोणत्याही एका कार्यासाठी दिला जात होता, परंतु तेव्हापासून हा सन्मान भारतीय साहित्यातील आजीवन योगदान यासाठी देण्यात आला.

ज्ञानपीठ पुरस्कार समिती (Dnyanpeeth Award Committee in Marathi)

ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्कारासाठी नामांकने विविध साहित्य तज्ञ, शिक्षक, समीक्षक, विद्यापीठे आणि असंख्य साहित्यिक आणि भाषा संघटनांकडून प्राप्त होतात. दर तीन वर्षांनी प्रत्येक भाषेसाठी एक सल्लागार समिती स्थापन केली जाते. 

अली कडील प्राप्त कर्त्याच्या कामाची भाषा पुढील दोन वर्षांसाठी विचारात घेतल्या जातात नाही व ती भाषा पुरस्कारासाठी प्राप्त नसते. 

जी समिती स्थापन केली जाते त्या प्रत्येक समितीमध्ये तीन साहित्यिक समीक्षक आणि आपापल्या भाषेतील अभ्यासक असतात. समिती द्वारे सर्व नामांकनांची छाननी केली जाते आणि त्यांच्या शिफारशी ज्ञानपीठ पुरस्कार निवड मंडळाकडे (प्रवर परिषद) सादर केली जाते

निवड मंडळामध्ये “उच्च प्रतिष्ठा आणि सचोटीचे” सात ते अकरा सदस्य असतात. प्रत्येक सदस्य तीन वर्षांच्या कालावधीसाठी समितीचा भाग असतो जो आणखी दोन टर्मसाठी देखील वाढविला जाऊ शकतो. 

सर्व भाषा सल्लागार समित्यांच्या शिफारशींचे मूल्य मापन बोर्डा द्वारे प्रस्तावित लेखकांच्या निवडक लेखनाच्या हिंदी किंवा इंग्रजी मध्ये पूर्ण किंवा आंशिक भाषांतराच्या आधारे केले जाते. विशिष्ट वर्षासाठी प्राप्तकर्ता निवड मंडळा द्वारे घोषित केला जातो, ज्याला निवडीचे अंतिम अधिकार असतात.

पहिला ज्ञानपीठ पुरस्कार | First Dnyanpeeth Award in Marathi 2024

२९ डिसेंबर १९६५ रोजी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरुप यांना त्यांच्या कवितासंग्रह ओडोकवुघल (बासरी) प्रकाशन साल (१९५०) साठी त्यांना प्रदान करण्यात आला. 

आता पर्यंत ५३ ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आले आहेत. मात्र, पाचवेळा पुरस्काराचे विभाजन झाल्याने ५८ लेखकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

देशातील एकूण २२ अधिकृत भाषां पैकी मराठी भाषेचा चार वेळा गौरव झाला आहे, हि गोष्ट विशेष आहे. १९७४ मध्ये मराठी कादंबरीला प्रथमच ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. वि. स.खांडेकर यांच्या ‘ययाती‘ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

वि. स. खांडेकरांची अभिजात आणि अर्थपूर्ण ययाती कादंबरी मराठी साहित्य क्षेत्रासाठी वरदान ठरली. त्यांच्या ‘ययाती‘ कादंबरीसाठी १९६० मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. ‘ययाती’ या कादंबरीत खांडेकरांनी अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी पद्धतीने जीवनातील अंतिम सत्य आणि परम सत्य उलगडनारी  आहे. 

१९८७ मध्ये शिरवाडकर यांनी लिहलेल्या ‘नटसम्राट‘ या नाटकाला ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून देखील ओळखले जाते. कुसुमाग्रजांच्या कविता मराठी भाषेचा अलंकार आहेत. म्हणूनच कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 

शिरवाडकर लिखित नटसम्राट हे नाटक चिरंतन नाटक ठरले आहे. तसेच या नाटकावर एक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. विंदा करंदीकर यांच्या ‘अष्टदर्शने’ या काव्यसंग्रहाला २००३ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

या काव्यसंग्रहात करंदीकर यांनी सात युरोपियन आणि एका भारतीय तत्त्वज्ञांच्या लेखनावर आधारित कविता स्वरूपात एक पुस्तक लिहिले आहे. विंदा करंदीकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला हे विशेष. 

विंदांच्या रंगीत आणि वैचारिक कविता लोकांना खूप आवडतात. त्यांच्या कविता मध्ये वास्तवाचेही तितकेच भान असते. शालेय अभ्यासक्रमातदेखी कुसुमाग्रज व विंदा करंदीकर यांच्या कविता व धडे आपल्याला दिसून येतात.

मराठी, तामिळ, तेलगू , बंगाली अशा विविध भाषेतील साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केल्या गेले आहे व त्यांच्या साहित्य हे अतिशय कौतुकास्पद आहे. 

२०१६ चा ज्ञानपीठ पुरस्कार आधुनिक बंगाली साहित्यातील प्रख्यात बंगाली कवी शंख घोष यांना देण्यात आलेला आहे. दोन दशका नंतर एका बंगाली लेखकाला देशातील सर्वोच्च साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

दिल्लीत जारी केलेल्या प्रकाशनात असे सांगण्यात आले होते की, विद्वान, समीक्षक आणि लेखक डॉ. नामवर सिंह यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या ज्ञानपीठ निवड मंडळाच्या बैठकीत शंख घोष यांना २०१६ सालचा ५२ वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. 

शंख घोष हे आधुनिक बंगाली साहित्यातील एक प्रसिद्ध कवी आहेत. पुरस्काराच्या स्वरूपात शंखा घोष यांना वाग्देवीची मूर्ती, ११ लाख रुपये आणि सन्मानपत्र देण्यात आले होते. यापूर्वी १९९६ मध्ये बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता.

या अर्थाने, तब्बल १९ वर्षांनंतर देशाचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार मिळालेले ते बंगाली लेखक आहेत. घोष यांच्या प्रमुख कामांमध्ये आदिम लता-गुलमोमय, मूर्ख बारो, सामाजिक नॉय, बाबोरेर प्रार्थना, डिंगुली रातगुली आणि निहिता पाताळछाया यांचा समावेश होतो. त्यांचा जन्म १९३२ मध्ये झाला आणि ते कवी, समीक्षक आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात. 

या पूर्वी बंगाली लेखक तारा शंकर, विष्णू डे, सुभाष मुखोपाध्याय, आशापूर्णा देवी आणि महाश्वेता देवी यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. 

पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम लेखक जी शंकर कुरूप यांना १९६५ साली आणि शेवटचा ज्ञानपीठ पुरस्कार २०१५ मध्ये गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांना प्रदान करण्यात आला होता. 

आता पर्यंत दहा हिंदी लेखकांना हा सन्मान देण्यात आला असून त्यापाठोपाठ आठ कन्नड लेखकांनाही हा सन्मान देण्यात आला आहे. बंगाली आणि मल्याळम भाषेतील लेखकांना प्रत्येकी पाच-पाच वेळा हा सन्मान देण्यात आला आहे. 

मल्याळम भाषेतील प्रख्यात भारतीय कवी-लेखक ९२ वर्षीय अक्कितम अच्युथन नंबूथिरी यांनी प्रतिष्ठित ५५ वा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकला आहे. त्यांना हा पुरस्कार २०१९ साली देण्यात आलेला आहे.  सेच त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. 

या पुरस्काराचे काही पैलू व महत्वाच्या गोष्टी त्या अश्या आहेत कि, ज्ञानपीठ पुरस्काराने देशातील सर्वोच्च साहित्य पुरस्काराची ओळख प्राप्त झाली आहे. 

हा पुरस्कार फक्त भारतीय नागरिकांसाठी खुला आहे आणि दरवर्षी दिला जातो. पुरस्कारासाठी इंग्रजी सोबतच इतर भारतीय भाषांचाही विचार केला जातो.

१९६५ मध्ये मल्याळम लेखक जी शंकरा कुरूप हे त्यांच्या ‘ओडक्कुझल’ (द बांबू फ्लूट) या कादंबरी साठी प्रथम पुरस्कार प्राप्त करणारे होते. 

१९७६ मध्ये बंगाली लेखिका आशा पूर्णा देवी या पुरस्काराने सन्मानित झालेल्या पहिल्या महिला लेखिका होत्या. हा पुरस्कार देणाऱ्या संस्थेची स्थापना उद्योगपती आणि समाजसेवी साहू शांती प्रसाद जैन यांनी १९४४ मध्ये केली होती.

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संस्थेने प्रायोजित केला आहे. हा पुरस्कार देणाऱ्या संस्थेची स्थापना उद्योगपती आणि समाज सेवी साहू शांती प्रसाद जैन यांनी १९४४ मध्ये केली होती. 

मराठी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते – dnyanpeeth puraskar marathi list

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखकांची नावे व साहित्यकृती

क्र. पुरस्कार वर्ष लेखकांची नावे साहित्यकृती
१९७४ वि.स. खांडेकर ययाति
१९८७ वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) नटसम्राट
२००३ विंदा करंदीकर अष्टदर्शने
२०१४ भालचंद्र नेमाडे हिंदू : एक समृद्ध अडगळ
मराठी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते dnyanpeeth puraskar Marathi list

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखकांची सूची (List of Dnyanpith Award Winning Authors in Marathi)

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखकांची सूची खालील प्रमाणे – dnyanpeeth puraskar Marathi list

वर्ष सम्मानित लेखक कृति भाषा
1965 जी. शंकरकुरूप ओदक्कुझल (Odakkuzhal) मलयालम
1966 ताराशंकर बंदोपाध्याय  गणदेवता बंगाली
1967 कुप्पली वेंकटप्पा पुटप्पा (कुवेम्पु) श्रीरामायण दर्शनम कन्नड़
  उमाशंकर जोशी निशीथ गुजराती
1968 सुमित्रानंदन पंत चिदंबरा हिंदी
1969 फ़िराक गोरखपुरी गुलनगमा उर्दू
1970 विश्वनाथ सत्यनारायन रामायण कल्पवृक्षमू तेलगू
1971 बिष्णु डे स्मृतिसत्ता भविष्यत बंगाली
1972 रामधारी सिंह दिनकर उर्वशी हिंदी
1973 दत्तात्रेय रामचन्द्र बेंद्रे नाकुतंती कन्नड़
  गोपीनाथ मोहंती मटिमातल ओडिया
1974 विष्णु सखाराम खांडेकर ययाति मराठी
1975 पी. वी. अकीलन चित्तरपवई तमिल
1976 आशापूर्णा देवी प्रथम प्रतिश्रुति बंगाली
1977 के. शिवरामकरन्थ मूक ज्जिया कनासुगलू कन्नड़
1978 सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन ‘अज्ञेय’ कितनी नावों में कितनी बार हिंदी
1979 बीरेंद्र कुमार भट्टाचार्य मृत्युंजय असमिया
1980 एस. के. पोत्तेक्कत ओरुदेसथिंते कथा मलयालम
1981 अमृता प्रीतम कागज ते कैनवास पंजाबी
1982 महादेवी वर्मा यामा हिंदी
1983 मस्ती वेंकटेश अयंगर चिक्का वीरा राजेंद्र (कोडावाकेराजा चिक्कावीराराजेंद्रकाजीवनएवंसंघर्ष ) कन्नड़
1984 तकजि शिवशंकर पिल्लै कयार मलयालम
1985 पननलाल पटेल मानवीनी भावई गुजराती
1986 सचिदानंद रौतेरा ओडिया
1987 विष्णु वामन सिरवाडकर मराठी साहित्यात योगदानासाठी मराठी
1988 सी. नारायण रेड्डी विश्वंभरा तेलगू
1989 कुर्तलुएन हैदर आखिरी शब के हम सफर उर्दू
1990 विनायक कृष्ण गोकक भारथ सिंधु रश्मि कन्नड़
1991 सुभाष मुखोपध्याय पदातिक (पैदलसैनिक) बंगाली
1992 नरेश मेहता हिंदी
1993 सीताकांत महापात्र भारतीय साहित्य मध्येअतुलनीय योगदानसाठी, 1973–92 ओडिया
1994 यू. आर. अनंतमूर्ति कन्नड़ साहित्य मध्येअतुलनीय योगदानसाठी  कन्नड़
1995 एम. टी. वासुदेवननायर रंडामूझम (Randamoozham) मलयालम
1996 महाश्वेतादेवी हजार चौरासी रमाँ बंगाली
1997 आली सरदार जाफरी उर्दू
1998 गिरीश कर्नाड कन्नड़ साहित्य & रंगमंच (ययातिमध्ये अतुलनीय योगदानसाठी कन्नड़
1999 निर्मल वर्मा हिंदी
  गुरदयाल सिंह  पंजाबी
2000 इन्दिरा गोस्वामी दातल हातिर उन्ये खुवा हौदाह (Datal Hatir Unye Khuwa Howdah) असमिया
2001 राजेंद्र शाह ध्वनि गुजराती
2002 डी. जयकान्तन तमिल
2003 विन्दा करंदीकर मराठी साहित्य मध्ये अतुलनीय योगदानसाठी मराठी
2004 रहमानराही सुभुक सोदा,कलमी राहीआणि सियाह रोडे जरेन मंज (Subhuk Soda, Kalami Rahi and Siyah Rode Jaren Manz) कश्मीरी
2005 कुँवर नारायण हिंदी
2006 रविन्द्र कालेकर कोंकणी
  सत्य व्रतशास्त्री संस्कृत
2007 ओ. एन. वी. कुरूप मलयालम साहित्य मध्ये अतुलनीय योगदानसाठी मलयालम
2008 अखलाक मोहम्मद खान ‘शहरयार’ उर्दू
2009 अमर कांत हिंदी
  श्रीलाल शुक्ल  हिंदी
2010 चन्द्रशेखर कंबरा कन्नड़ साहित्य मध्ये अतुलनीय योगदानसाठी कन्नड़
2011 प्रतिभारे यज्ञसेनी ओडिया
2012 रावुरी भारद्वाज पाकुदुरल्लू तेलगू
2013 केदारनाथ सिंह अकालमेंसारस हिंदी
2014 भालचन्द्र नेमाड़े हिन्दू: जगण्याची समरुद्ध अडगल (Jagnyachi Samrudhha Adgal) मराठी
2015 रघुवीर चौधरी अमृता (उपन्यास) गुजराती
2016 शंख घोष मूखरेबारो, सामाजिक नोय बंगाली
2017 कृष्णा सोबती जिंदगी नामा,डारसे बिछुड़ी, मित्रोमर जानी हिंदी
2018 अमिताव घोष  इंग्रजी
2019 अक्कीतम मल्याळम
2021 नीलमणी फुकन आसामी
2022 दामोदर मावजो कोकणी
dnyanpeeth puraskar Marathi list

(टीप – १. अलीकडील कालावधीमध्ये संपूर्ण जीवन कालातील साहित्यकृतींचा विचार करून ज्ञानपीठ पुरस्कार दिला जात असल्याकारणाने साहित्यकृती रकान्यामध्ये माहिती दिसणार नाही.

२. ज्या वर्षी दोन व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेल्या आहे यावर्षी पुरस्काराचे वर्ष हा रकाना रिक्त आहे.)

आजच्या या लेखात आपण “ज्ञानपीठ पुरस्कार (Dnyanpeeth Award in Marathi)” बाबत विस्तारामध्ये माहिती अभ्यासली. जर आपल्याला dnyanpeeth puraskar Marathi list सोबत इतर महत्वाच्या टॉपिक बद्दल माहिती अभ्यासाची असेल तर आमच्या वेबसाईट वर नियमीत व्हिजिट करा. 

हेही पहा

महाराष्ट्रातील जिल्हे

भारतातील पहिली महिला

FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?

मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांना मिळाला.

पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?

पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जी. शंकरकुरूप यांना मिळाला.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक

वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर, डॉ. भालचंद्र नेमाडे

ज्ञानपीठ पुरस्कार 2014 कोणास मिळाला?

ज्ञानपीठ पुरस्कार 2014 भालचंद्र नेमाडे यांना मिळाला.

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment