डॉक्टर होण्यासाठी काय करावे लागते? | How to become a doctor in Marathi

डॉक्टर कसे व्हावे? डॉक्टर कसे बनावे? Doctor in marathi

शाळेत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला असता की भविष्यात तुम्हाला काय व्हायचे आहे. याचे उत्तर ठरलेले असते.  किमान महाराष्ट्रातल्या शिक्षण पद्धतीत तरी दोन नमुनेदार उत्तरे तयार असतात. ते म्हणजे डॉक्टर आणि इंजिनिअर. शंभर विद्यार्थ्यांपैकी किमान 80 टक्के विद्यार्थ्यांचे उत्तर हेच असते. how to become a doctor in Marathi.

काही विद्यार्थी असेही असतात की त्यांना भविष्यात जाऊन एक चांगला डॉक्टर व्हायचं असतं.  अशा विद्यार्थ्यांना डॉक्टर कसे व्हावे how to become a doctor in Marathi याचे मार्गदर्शन मिळावे यासाठी हा लेखनप्रपंच.

डॉक्टर कसे व्हावे या प्रश्नाचे उत्त्र बरेच विद्यार्थी शोधत असतात. यासाठी खरी तयारी इयत्ता अकरावी पासून करावी लागते असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. 

इयत्ता अकरावी मध्येच आपण विज्ञान शाखेला  प्रवेश घेणे गरजेचे असते.  लक्षात ठेवा इतर शाखेच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर होता येत नाही.  विज्ञान शाखेला  प्रवेश घेतल्यानंतर अभ्यास विषयांमध्ये जीवशास्त्राचा (Biology)अभ्यास असणे गरजेचे आहे. म्हणजे जीवशास्त्र विषय तुम्ही निवडावा.  अकरावी मध्ये जे अभ्यास विषयाचे दोन गट असतात त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र  म्हणजेच (P.C.B.) असणे गरजेचे आहे. 

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र मधून किमान 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे असते.  

 बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर  नीट परीक्षा देणे गरजेचे असते.  नीट म्हणजेच NEET- NATIONAL ELIGIBILITY ENTRENCE TEST. देशपातळीवर ती वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी होणारी ही एक प्रवेश परीक्षा असते.

 नीट परीक्षेमधून  गुणानुक्रमांकाच्या आधारावर  देशभरातील महाविद्यालयांमध्ये आपण डॉक्टर होण्यासाठी प्रवेश घेऊ शकता.

यामधून प्रवेश घेत असताना आपल्या पुढे पर्याय असतात. MBBS, BDS, BAMS,BHMS,BUMS  पैकी एका अभ्यासक्रमाला आपण प्रवेश घेऊ शकतो.  चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट मध्ये चांगले गुण मिळणे आवश्यक असते. 

 डॉक्टर होण्यासाठी किती वेळ लागतो? doctor in Marathi

 वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यापासून साडे पाच वर्षांमध्ये तुम्ही डॉक्टर होऊ शकता. यामध्ये साडेचार वर्षांचे शिक्षण आणि एक वर्षाची आंतरवासिता असा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. आंतरवासिता करावीच लागते. आंतरवासिता शिवाय वैद्यकीय कोर्स अपूर्ण समजला जातो.

वैद्यकीय महाविद्यालयांचे शिक्षण शुल्क किती असते? (Education Fees)

 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दोन प्रकारचे महाविद्यालय असतात.  एक म्हणजे शासकीय महाविद्यालय आणि दुसरे खाजगी महाविद्यालय.  शासकीय महाविद्यालयां चे  शिक्षण शुल्क दोन हजार पासून तीस हजारापर्यंत असते. महाविद्यालया नुसार यामध्ये फरक असतो.  खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाची फी  पाच लाखाचा पासून ते तीस लाखापर्यंत असते. doctor in Marathi

डॉक्टर

full form of mbbs

  • M.B.B.S. – Bachelor of medicine and bachelor of surgery

MBBS – Bachelor of medicine and bachelor of surgery

   यात साडे चार वर्षाचा  शैक्षणिक अभ्यासक्रम आणि एक वर्षाची आंतरवासिता (Internship)असा एकूण साडेपाच वर्षाचा अभ्यासक्रम असतो. doctor in Marathi

full form of bds 

B.D.S. –  Bachelor of dental surgery

चार  वर्षाचे वैद्यकीय शिक्षण आणि एक  वर्षाची आंतरवासिता असा एकूण पाच वर्षाचा हा अभ्यासक्रम असतो.  

full form of bams

BAMS –  Bachelor of Ayurvedic medicine and surgery

    या अभ्यासक्रमाला सुद्धा प्रवेश नीट परीक्षेद्वारे मिळतो. BAMS  अभ्यासक्रम साडेचार वर्षांचे वैद्यकीय शिक्षण  आणि एक वर्षाची आंतरवासिता. असा एकूण साडेपाच वर्षाचा अभ्यासक्रम आहे.

full form of bhms

BHMS –  Bachelor of  Homiopathic medicine and surgery

    या अभ्यासक्रमाला सुद्धा प्रवेश नीट परीक्षेद्वारे मिळतो. BAMS  अभ्यासक्रम साडेचार वर्षांचे वैद्यकीय शिक्षण  आणि एक वर्षाची आंतरवासिता. असा एकूण साडेपाच वर्षाचा अभ्यासक्रम आहे.

full form of bpt

BPT –  Bachelor of physiotherapy

    हा अभ्यासक्रम चार वर्षाचा आहे.  यामध्ये साडे तीन वर्षाचे वैद्यकीय शिक्षण आणि सहा महिन्याची आंतरवासिता पूर्ण करावी लागते.

full form of bums

BUMS –  Bachelor of Unani medicine and surgery

  BUMS हा वैद्यकीय  अभ्यासक्रम एकूण साडेपाच वर्षाचा असतो.  यामध्ये साडेचार वर्षे वैद्यकीय शिक्षण आणि एक वर्षाची आंतरवासिता असते. 

वरील सर्व  अभ्यासक्रम हे वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम मानले जातात. यानंतर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम वैद्यकीय क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. 

वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी (Master courses) how to become a doctor in Marathi

वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये MD  व  MS  हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 

  • MD –  Doctorate of medicine
  • MS –  master of surgery

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुद्धा नीट परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेच्या गुणानुक्रम अंकानुसार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.  हे अभ्यासक्रम पदवीनंतर  तीन – तीन वर्षाचे आहेत. 

 अशा पद्धतीने वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश करायचा असेल तर त्याने उपरोक्त पद्धतीप्रमाणे आपले नियोजन करावे.  कोणता अभ्यासक्रम निवडावा?  हे आपल्याला यावरून ठरवता येऊ शकते. अपेक्षा करतो डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असणारी माहिती आपल्याला या लेखाद्वारे मिळाली असेल. how to become a doctor in Marathi

  • MBBS – Bachelor of medicine and bachelor of surgery
  • BHMS –  Bachelor of  Homeopathic medicine and surgery
  • BAMS –  Bachelor of Ayurvedic medicine and surgery
  • BDS –  Bachelor of dental surgery
  • BPT –  Bachelor of physiotherapy
  • BUMS –  Bachelor of Unani medicine and surgery
  • MD –  Doctorate of medicine
  • MS –  master of surgery

Maharashtra Teacher Recruitment 2020 महाराष्ट्र शिक्षक भरती 2020

12 वी नंतर काय करावे? 12 vi nantar kay karave ?

PSI Exam Syllabus in Marathi 2020, PSI

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

10 thoughts on “डॉक्टर होण्यासाठी काय करावे लागते? | How to become a doctor in Marathi”

  1. नर्स कसे बनावे याची संपूर्ण माहिती
    shorturl.at/dgDKV

    Reply

Leave a Comment