ग्राफिक डिझाईनर कसे बनावे ? ग्राफिक डिझाईन | How to become graphic designer in Marathi

ग्राफिक डिझाईनर कसे बनावे?| How to become graphic designer in Marathi

आपण ग्राफीक डिझाईनर मध्ये  करिअर करण्यासाठी माहितीचा शोध घेत आहेत का? जर आपले उत्तर “हो”असेल तर, आपण योग्य प्लॅटफॉर्म वर आले आहेत. या लेखात आपण बघणार आहोत कि “ग्राफिक डिझाईनर कसे बनावे?” Graphic designer या सोबतच ग्राफिक डिझाईनर मध्ये कोणते कौशल्य (Skills) असावे, नौकरी आणि वेतन कसे, किती मिळू शकते, ई. सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला या लेखा मध्ये मिळणार आहे. 

graphic designer
Graphic Designer

ग्राफिक डिझाईन काय आहे आणि ग्राफिक डिझाईनर कोण असतो?

“ग्राफिक डिझाइन” ही एक व्यावहारिक कला आहे, जी संवाद साधण्यास मदत करते. व्हिज्युअल माहिती अशा प्रकारे तयार केली जाते जी संदेश देईल, इतरांचे लक्ष वेधून घेईल. अशा प्रकारे शब्द आणि चित्रे ठेवून ग्राफिकसी तयार केले जाते. आणि जे लोक अश्या प्रकारचे काम करतात त्यांना “ग्राफिक डिझाइनर” म्हणतात.

ग्राफिक डिझाईनर म्हणुन करिअर करण्यात स्कोप आहे का? Graphic Designer as Career

ग्राफिक डिझाईन / (Graphic Designer) ला वर्तमान आणि सोबत सोबत भविष्यात हि मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. कारण येत्या काळात मोठ्या प्रमाणावर ऑफलाईन व्यवसाय ऑनलाईन व्यवसायाकडे कूच करीत आहे. 

आज जवळपास सर्वच क्षेत्रांना त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ग्राफिक डिझायनरची मदत आवश्यक भासत आहे, मग ती प्रकाशन गृहे असोत, जाहिरात क्षेत्र असोत, मार्केटिंग एजन्सी असोत, किंवा PR फर्म असोत, प्रत्येकाला ग्राफिक डिझायनर्सची आवश्यक आहेच.

त्यामुळे ग्राफिक डिझाईनर साठी मोठ्या प्रमाणावर नवीन करिअर संधी निर्माण होंतील यात तिळमात्र शंका नाही. 

ग्राफिक डिझाईनर कसे बनावे? Graphic Designer

“ग्राफिक डिझाईनर” एक उत्तम करिअर माध्यम उदयास येत असल्याने युवातील मोठा वर्ग या कडे आकर्षिक होत आहे. ग्राफिक डिझाईनर बनण्याचे दोन माध्यमे आहेत. पहिला स्वत:शिकून बनणे आणि दुसरा म्हणजे ग्राफिक डिझाईनिंग शिकवणी देण्याऱ्या संथांकडून प्रशिक्षण घेउण बनणे. 

स्वत:शिकून “ग्राफिक डिझाईनर” बनण्यासाठी आपण canva सारख्या वेबसाईट वर काम करून शिकू शकता. यासोबतच आपण पुस्तके वाचून आणि यू-ट्युब वर व्हिडिओ पाहून सुद्धा ग्राफिक डिझाईनर बनू शकता, पण यात मोठा वेळ खर्च होईल. 

उत्तम ग्राफीक डिझाईनर बनण्यासाठी कोणते कौशल्ये असणे गरजेचे? Graphic Designer

ग्राफिक डिझाईनर बनण्याचं ठरले आहे तर मग आपल्याला हे हि माहिती असावं कि, उत्तम ग्राफीक डिझाईनर बनण्यासाठी कोणते कौशल्ये आपल्यात असणे गरजेचे?

उत्तम ग्राफिक डिझाईनर मध्ये खालील कौशल्य असणे गरजेचे आहे

  • सर्जनशील कौशल्ये
  • नाविन्यपूर्ण विचार करण्याचं कौशल्य
  • लिखाण कौशल्य असले पाहिजेत 
  • Typing यायला हवी 
  • IT कौशल्य असावे 
  • खोलात विचार करण्याची क्षमता 
  • समस्या सोडवण्याची क्षमता
  • वेळेचे व्यवस्थापन
  • illustrator software, Photoshop इत्यादींचे सामान्य ज्ञान. इत्यादी 

ग्राफीक डिझायनरचे प्रकार किती कोणकोणते आहेत?

ग्राफिक डिझाईनचे १० प्रकार आहेत जे तुम्हाला माहित असले पाहिजेत. ते प्रकार आहे-

  1. प्रॉडक्शन डिझाइन
  2. जाहिरात
  3. उत्पादन/पॅकेज डिझाइन
  4. पर्यावरणीय डिझाइन
  5. व्हिडीओ गेम आर्ट
  6. प्रकाशन
  7. वेब डिझाइन
  8. इंटरफेस
  9. कॉर्पोरेट डिझाईन्स
  10. साइनेज

ग्राफिक डिझायनिंगचे प्रमुख कोर्स कोणकोणते आहेत?

ग्राफिक डिझायनिंगचे प्रमुख कोर्सेस खालील प्रमाणे आहेत

  • ग्राफिक डिझाईनमध्ये ऍडव्हान्स डिप्लोमा.
  • ग्राफिक डिझाईन मध्ये प्रमाणपत्र.
  • ग्राफिक डिझाइनमध्ये पदवीधर डिप्लोमा प्रोग्राम.
  • ग्राफिक डिझाइनमध्ये पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम.
  • ग्राफिक डिझाइनमध्ये मास्टर ऑफ आर्ट्स.
  • ग्राफिक डिझाइनमध्ये मास्टर ऑफ डिझाइन.
  • ग्राफिक डिझाईन मध्ये डॉक्टरेट कार्यक्रम

ग्राफीक डिझाईनर बनण्यासाठी शिक्षणाची अट कोणती?

ग्राफीक डिझाईनर बनण्यासाठी शिक्षणाची अट खालील प्रमाणे आहेत

ग्राफिक डिझायनर्स यांच्याकडे औपचारिक शिक्षण आवश्यक असते. यासोबत ग्राफिक डिझाईनरला कॉम्पुटर हा चांगल्या प्रकारे वापर करता आल पाहिजेत. 

ग्राफिक डिझाईनरचे वेतन काय असते?

ग्राफिक डिझायनिंग ग्रॅज्युएटला मिळणारा अंदाजे सरासरी वार्षिकी पगार ३ ते ७ लाख रुपयांच्या दरम्यान असू शकतो. ग्राफिक डिझाईनिंग हे एक अत्यंत रोजगार क्षम करिअर आहे आणि सध्या हे ट्रेंडिंग मध्ये आहे . फ्रिलान्स ग्राफिक डिझायनर वर्षाला १२,००,००० रु. इतके कमवू शकतो. 

ग्राफिक डिझायनरचा पगार त्याला/तिला असलेल्या अनुभवावर आणि प्रकल्पांवर आधारित असतो. 

जॉब प्रोफाइलच्या वेगवेगळ्या टप्प्यांतील काही सापेक्ष पगाराचे आकडे खालीलप्रमाणे आहेत-

  1. एंट्री-लेव्हल पगार प्रतिवर्ष – रु. १,४३,००० 
  2. मिड-लेव्हल पगार प्रतिवर्ष – रु. २,९९,०००
  3. वरिष्ठ स्तरावरील पगार – रु. ६,१९,००० 

भारतातील ग्राफिक डिझाईनिंग शिकवत असलेल्या संस्थाकोर्सेस 

ग्राफिक डिझायनर होण्यासाठी,आपल्याला खालील कोर्सेस करणे आवश्यक– 

  1. ग्राफिक डिझाईन मध्ये B.Des
  2. B.Sc ग्राफिक डिझाईन
  3. ग्राफिक डिझाईन मध्ये B.A
  4. ग्राफिक डिझाईन मध्ये M.Des
  5. ग्राफिक डिझाइनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम
  6. ग्राफिक डिझायनिंग मध्ये डिप्लोमा

प्रख्यात ग्राफिक डिझाईनिंग संस्था

  • एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, पुणे
  • इंटरनॅशनल स्कूल ऑफ डिझाईन, पुणे
  • विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे.
  • अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठ, पुणे.
  • डी.वाय.पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, आकुर्डी.
  • पर्ल अकॅडमी, मुंबई.
  • कन्या महा विद्यालय, जालंधर
  • SAM ग्लोबल युनिव्हर्सिटी, भोपाळ
  • एलेन स्कूल ऑफ आर्ट अँड डिझाईन, जयपूर
  • UPES, डेहराडून
  • क्वांटम युनिव्हर्सिटी, रुरकी
  • JECRC विद्यापीठ, जयपूर
  • कोशीस ऍनिमेशन अँड मीडिया स्कूल, बंगलोर

ग्राफिक डिझाईनर ला कुठे आणि कोणत्या पदा वर नोकरी मिळू शकते?

ग्राफिक डिझायनरची आवश्यकता असलेल्या काही शीर्ष क्षेत्रे / उद्योगांची यादी खाली दिली आहे:

  • कॉर्पोरेट व्यवसाय
  • टेलिव्हिजन उद्योग
  • MNCs
  • पब्लिशिंग हाऊसेस
  • मल्टि-मीडिया कंपन्या
  • AD एजन्सी
  • वेब डिझायनिंग
  • मार्केटिंग फर्म्स
  • छपाई आणि प्रकाशन
  • डिझाइन स्टुडिओ
  • कमर्शियल पॅकेजिंग
  • प्रशिक्षण संस्था
  • टीव्ही आणि चित्रपट कंपनी

ग्राफिक डिझायनरसाठी टॉप रिक्रुटिंग कंपन्या

ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रातील काही आघाडीच्या भर्ती कंपन्या जेथे ग्राफिक डिझायनर रोजगाराच्या संधी शोधू शकतात खाली सूचीबद्ध आहेत:

  • कॉगव्हील स्टुडिओ
  • विप्रो तंत्रज्ञान, प्रा. लि
  • फिशये, नवी दिल्ली
  • जनरल मोटर्स डिझाइन प्रा. लि
  • एज स्टुडिओ, नवी दिल्ली
  • मँगोब्लॉसम डिझाइन, मुंबई
  • थिंक डिझाइन, हैदराबाद
  • ईस्टर्न सिल्क इंडस्ट्रीज प्रा. लि
  • डिझाईन फॅक्टरी इंडिया
  • मूनराफ्ट इनोव्हेशन लॅब्स प्रा. लि
  • SAP लॅब्स इंडिया प्रा. लि

फ्रिलान्स ग्राफीक डिझाईनर कसे बनावे?

२१व्या शतकात फ्रिलांसिन्ग चे काम करणे खूप सोपे झाले आहे. इंटरनेट वर सर्व प्रकारचे प्रॉडक्ट किंवा सेवा ग्रहांकांपर्यंत पोहोचवणे सुलभ होत आहे. फ्रिलान्स ग्राफीक डिझाईनर बनण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. जसे कि, ऑफलाईन आणि ऑनलाईन. या उभय प्रायांवर आपण थोडक्यात बघू या. 

ऑफलाईन फ्रिलान्स ग्राफीक डिझाईनर

ऑफलाईन फ्रिलान्स ग्राफीक डिझाईर ला आपली सेवा ग्रहांकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्ट्रॉंग नेटवर्क असणे गरजेचे आहे. यासाठी फ्रिलान्स ग्राफीक डिझाईनरने वेगवेगळ्या कंपनींसोबत संपर्क ठेवणे. त्यांच्या कडून ऑर्डर घेऊन त्यांच्या गरजेनुसार ग्राफिक डिझाईन करून देणे आणि मुबलग प्रमाणात फीस घेणे. 

ऑनलाईन फ्रिलान्स ग्राफीक डिझाईनर

ऑनलाईन फ्रिलान्स ग्राफीक डिझाईनर ला ग्राहकांचा शोध घेण्यासाठी इंटरनेट वर अनेक माध्यमे आहे. जसे कि, सामाजिक माध्यमे, वेबसाईट आहेत जेथे ग्राहक मिळू शकतात. जसे कि, 

  • www.upwork.com 
  • www.peopleperhour.com 
  • www.onsite.io
  • www.yunojuno.com
  • www.elance.com
  • www.toptal.com
  • www.freelancer.co.in
  • www.behance.net
  • www.ifreelance.com
  • www.project4hire.com इत्यादी. 

या वेबसाइट्स वर फ्रिलान्स ग्राफीक डिझाईनर ला अनेक ग्राहक सापडू शकतात. यासोबतच Facebook & LinkedIn वर अनेक अशे ग्रुप्स आहेत जिथे फ्रिलान्स ग्राफीक डिझाईनर ला काम मिळू शकतात. 

निष्कर्ष:-

ग्राफिक डिझाईनर बनण्यासाठी कोणत्या-कोणत्या बाबींची माहिती असणे गरजेचे आहेत, याची सविस्तर माहिती आपण या लेखात वाचली आहे. जसे कि, “ग्राफिक डिझाईन काय आहे आणि ग्राफिक डिझाईनर कोण असतो?, ग्राफिक डिझाईनर म्हणुन करिअर करण्यात स्कोप आहे का?, ग्राफिक डिझायनिंगचे प्रमुख कोर्स कोणकोणते आहेत?,  ग्राफिक डिझाईनर कसे बनावे?,  उत्तम ग्राफीक डिझाईनर बनण्यासाठी कोणते कौशल्ये असणे गरजेचे?, ग्राफिक डिझाईनरचे वेतन काय असते? &  ग्राफिक डिझाईनर ला कुठे आणि कोणत्या पदा वर नोकरी मिळू शकते?”

उमीद करतो कि आपल्याला लेख आवडला असेल. जर तरी आपल्या मनात काही संभ्रम असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपण आपले प्रश्न विचारू शकता. आमचा प्रयत्न असेल कि, आपल्या प्रश्नच उत्तर पोहोचवण्याचे. 

आणखी वाचा …

भारतातील पहिली महिला

Hotel Management Information In Marathi

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “ग्राफिक डिझाईनर कसे बनावे ? ग्राफिक डिझाईन | How to become graphic designer in Marathi”

Leave a Comment