कर्नाटक – राज्य एक दृष्टी अनेक | Karnataka
कर्नाटक राज्याच्या माहितीविषयक भागामध्ये आपण कर्नाटक राज्याचा सांगोपांग आढावा या ठिकाणी घेत आहोत.
कर्नाटक हे राज्य भारतातील दक्षिणेकडील महत्त्वाचे राज्य आहे. कर्नाटक राज्याला पूर्वी म्हैसूर स्टेट असे म्हणले जायचे.
1 नोव्हेंबर 1956 मध्ये भारतातील विविध राज्य अस्तित्वात आले होते त्याच्यामध्ये म्हैसूर राज्य देखील होते. 1973 मध्ये या राज्याचे नाव बदलून कर्नाटक असे करण्यात आले.
कर्नाटक राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. कर्नाटक राज्याच्या उत्तरेला गोवा आणि महाराष्ट्र ही राज्ये आहेत तर पूर्वेला तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही राज्य आहेत. कर्नाटक राज्याच्या दक्षिणेकडे केरळ आणि तमिळनाडू ही दोन राज्य आहेत.
कर्नाटक राज्याचे एकूण क्षेत्रफळ 1,91,976 चौरस किलोमीटर इतके असून देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 5. 83 दशांश टक्के इतके क्षेत्र कर्नाटक राज्याने व्यापलेले आहे.
कर्नाटकी हे भारतातील क्षेत्रफळानुसार सहावे मोठे राज्य आहेत तर लोकसंख्येनुसार आठवे मोठे राज्य आहे.
कर्नाटक राज्यामध्ये एकूण 31 जिल्हे अस्तित्वात आहेत. या जिल्ह्यांचे एकूण चार प्रशासकीय विभागामध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
- बेळगावी
- बेंगलुरु
- गुलबर्गा
- मैसूर
प्रशासकीय रचना
बेळगाव विभाग | बंगळुरू विभाग | गुलबर्गा विभाग | मैसूर विभाग |
बागलकोट | बंगळुरू ग्रामीण | बेल्लारी | चामराजनगर |
बेळगाव (मुख्यालय) | बंगळुरू शहर (मुख्यालय) | बिदर | चिकमंगळूर |
धारवाड | चिक्कबलपूर | गुलबर्गा (मुख्यालय) | दक्षिण कन्नड |
गदग | चित्रदुर्ग | कोप्पळ | हसन |
हवेरी | दावणगिरी | रायचूर | कोडागु |
उत्तर कन्नड | कोलार | विजयनगर | मंड्या |
विजापूर | रामनगर | यादगिर | म्हैसूर(मुख्यालय) |
शिवमोगा | उडपी | ||
तुमकुर |
कर्नाटक राज्यामध्ये प्रमुख बोलीभाषा कन्नड ही असून भारतातील सहा अभिजात भाषेपैकी एक आहे.
कन्नड भाषा या राज्याची कार्यालयीन भाषा आहे.
कन्नड या प्रमुख भाषे व्यतिरिक्त उर्दू, कोकणी, मराठी, तुळू, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कोडवा यासारख्या भाषा सुद्धा या ठिकाणी बोलल्या जातात.
कर्नाटक या नावाची उत्पत्ती कशी झाली?
कर्नाटक या शब्दांमध्ये करू आणि नाडू असे दोन शब्दाचे अर्थ व्यक्त केले जातात.
करू याचा अर्थ उत्कर्ष आणि नाडू याचा अर्थ भूमी असा होतो. यावरून उत्कर्षित राज्य म्हणजेच कर्नाटक असे होते.
दुसरा अर्थ असा सांगण्यात येतो की करू म्हणजे काळा रंग आणि नाडू म्हणजे भूमी. च्या भूमीमध्ये काळी माती आहे असा प्रदेश म्हणजे कर्नाटक.
कर्नाटक राज्य हे द्रविड प्रभावित राज्य असे आपण म्हणू शकतो. कर्नाटकाकडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान, साहित्य यांची परंपरा भारतीय राज्याला मिळालेली आहे. आणखी महत्त्वाचे म्हणजे स्वतंत्र भारतातील सर्वाधिक भारतरत्न पुरस्कारांचा मान कर्नाटक राज्याला मिळालेला आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कर्नाटक राज्याने विशेष प्रगती केलेली आहे. कर्नाटक राज्याचे प्रमुख शहर व राजधानी असलेल्या बंगळुरूला भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी समजले जाते.
कर्नाटक राज्य भौगोलिक दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहे. कर्नाटक राज्याचा समुद्र किनारा जो आहे त्याला कारवार म्हणून ओळखले जाते. कर्नाटक राज्यातील सर्वोच्च शिखर मलयगिरी असून त्याची उंची 1929 मीटर आहे. मेंगलोर हे कर्नाटक राज्यातील सर्वात मोठे बंदर आहे.
कर्नाटकचा एकूण 22 टक्के भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे. कर्नाटकातील अगुंबे हे सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण आहे.
कर्नाटक पर्यटन
कर्नाटकात 25 अभयारण्य आणि 5 राष्ट्रीय उद्याने आहेत. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, बाणेर कट्टा राष्ट्रीय उद्यान, नागरहोळ राष्ट्रीय उद्यान, आंशी राष्ट्रीय उद्यान, कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान. पर्यटनामध्ये कर्नाटकाचा भारतात चौथा क्रमांक आहे. हम्पी व बदामी येथील लेण्या व पट्टदकल येथील स्मारके प्रसिद्ध आहेत. भारतातील सर्वात मोठा धबधबा शरावती नदीवरील जोग धबधबा कर्नाटक राज्यामध्ये आहे. जो पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.
कर्नाटक आर्थिक
कर्नाटकचा आर्थिक विचार करता कर्नाटक हे आर्थिक दृष्ट्या विकसित राज्य आहे. कर्नाटकचे वार्षिक उत्पन्न (GDP)2.152 लाख कोटी रुपये इतके आहे.
भारतातील राज्यांचा आर्थिक आढावा घेता कर्नाटक हे आर्थिक दृष्टीने देशांमध्ये पाचव्या क्रमांकाचे राज्य आहे.
कर्नाटक राज्यामधील प्राचीन उद्योग म्हणून रेशीम उद्योग ओळखला जातो.
कर्नाटक राजकीय
कर्नाटक राज्यामध्ये 224 सदस्य संख्या असणारी विधानसभा अस्तित्वात आहे. कर्नाटक राज्यामध्ये विधानपरिषद सुद्धा अस्तित्वात आहे. कर्नाटक विधान परिषदेची सदस्य संख्या 75 इतकी आहे. नुकतेच मे 2023 मध्ये कर्नाटक विधानसभेसाठी सार्वत्रिक मतदान पार पडले आहे.
भारतातील एक प्रमुख राज्य म्हणून कर्नाटक या राज्याविषयी माहिती आपण या आजच्या लेखांमधून घेतली. विविध उद्देशाने जिज्ञासू प्रवृत्तीने जाणून घेणाऱ्याला, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला आणि जाणकार नागरिक म्हणून माहिती घेणाऱ्याला ही दिलेली माहिती उपयोगी ठरेल. आपल्या ज्ञानात भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.
कर्नाटकचा राज्य प्राणी कोणता?
कर्नाटकचा राज्य प्राणी हत्ती आहे.
कर्नाटकचे राज्य वृक्ष कोणते?
चंदन हे कर्नाटकाचे राज्य वृक्ष आहे.
कर्नाटक राज्याचे राज्यफूल कोणते?
कमळ हे कर्नाटकचे राज्य फुल आहे
कर्नाटक राज्याची राजधानी कोणती?
बंगळुरू किंवा बेंगलोर ही कर्नाटक राज्याची राजधानी आहे.
आमचे आणखी वाचनीय लेख…..
ग्रामसभा म्हणजे काय ? ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यातील फरक Grampanchayat