Maha bed cet 2023 | महाराष्ट्र बी.एड. प्रवेश परीक्षा

पोस्ट शेअर करा.

Maha bed cet 2023 | महाराष्ट्र बी.एड. प्रवेश परीक्षा

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून शैक्षणिक वर्ष 2023 – 24 करिता B.A. B.Ed. आणि B.Sc. B.Ed. अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा Maha bed cet 2023 जाहीर करण्यात आलेली आहे.

Maha B. Ed. CET  Exam Date 2023

तपशीलदिनांक
ऑनलाइन रजिस्ट्रेशन03-03-2023  ते 14-03-2023
प्रवेश पत्र मिळण्याचा दिनांकलवकरच जाहीर करण्यात येईल.
ऑनलाइन परीक्षेचा दिनांक2 एप्रिल 2023
निकालाचा दिनांकजाहीर करण्यात येईल.
Maha B.Ed. Cet 2023 Time Table

 (महत्त्वाची टीप –  वरील दर्शवण्यात आलेले वेळापत्रक हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून सक्षम अधिकारी यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करू शकतात.)

Maha bed Cet –  शैक्षणिक पात्रता

  • सदर प्रवेश परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा भारतीय असावा.
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला 12 वी (एच.एस.सी.) आणि समतुल्य अभ्यासक्रमात किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक.
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान 45 टक्के गुण आवश्यक.

परीक्षा शुल्क

  • Maha B.Ed. cet 2023 साठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 800/- रुपये इतके आहे.
  • Maha B.Ed. cet 2023 साठी मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 600/- रुपये इतके आहे. 

(ज्या उमेदवारांचे नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट उपलब्ध नाही अशा उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.)

 परीक्षा केंद्र – 

महाराष्ट्र मधील काही निवडक शहरांमध्ये या परीक्षेचे आयोजन केले जाईल ज्या विद्यापीठ क्षेत्रामध्ये हा अभ्यासक्रम चालवला जातो त्या ठिकाणी.

महाराष्ट्रातील काही निवडक परीक्षा केंद्र – नाशिक, मुंबई, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर.

Maha Bed Cet Syllabus

अ.क्र.विषयप्रश्न संख्याप्रत्येक प्रश्नासाठी गुणएकूण गुण
1सामान्य ज्ञान (General Knowledge)40140
2बौद्धिक क्षमता (Mental Ability)30130
3शिकवण्याचा कल (Teaching Aptitude)30130
4एकूण 1001100

परीक्षेचे स्वरूप – सदर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

परीक्षेचे माध्यम – मराठी आणि इंग्रजी

प्रश्नांचे स्वरूप – सदर परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. (Multiple choice questions)

परीक्षेसाठी वेळ – 90 मिनिटे (एक तास तीस मिनीटे)

नकारात्मक गुण – या परीक्षेसाठी नकारात्मक गुणदान योजना लागू नाही.

Book for Maha B.Ed Preparation

maharashtra bed cet 2023 अभ्यासक्रमाचे स्वरूप 

1) सामान्य ज्ञान (General Knowledge) – 

  1. मूलभूत सामान्य ज्ञान – लेखक आणि त्यांची पुस्तके, विविध पुरस्कार महत्त्वाचे राष्ट्रीय दिवस चर्चेतील व्यक्तिमत्व महत्त्वाच्या चालू घडामोडी. 
  2. विज्ञान आणि तंत्रज्ञान – सामान्य विज्ञान (१०वी पर्यंतचे), विविध शोध, तंत्रज्ञान.
  3. इतिहास (१०वी पर्यंतचे),
  4. भूगोल (१०वी पर्यंतचे),
  5. नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र (१०वी पर्यंतचे),
  6. भारतीय राज्यघटना शिक्षणाशी संबंधित मुद्दे.

2) बौद्धिक क्षमता (Mental Ability) – या भागातून उमेदवाराची तर्क क्षमता आणि विचारातील अचूकता तपासली जाईल. या विभागामध्ये तर्क क्षमता विधान आणि निष्कर्ष अंक मालिका, अक्षर मालिका, सांखिक क्षमता यासारख्या घटकावरती प्रश्न विचारले जातील. 

3) शिकवण्याचा कल (Teaching Aptitude) – 

  • या भागामध्ये शिक्षण विद्यार्थी आणि शिक्षकी पेशा याविषयीचा दृष्टिकोन तपासण्यात येईल.
  • नेतृत्व गुणवैशिष्ट्ये
  • भावनिक आणि सामाजिक समायोजन
  • आंतर-वैयक्तिक संबंध आणि आंतर-वैयक्तिक कौशल्ये.
  • सामान्य जागरूकता (General awareness) आणि अध्यापना मधील स्वारस्य

How to apply for Maha B.Ed. cet 2023?

बीएड प्रवेश परीक्षेसाठी अर्ज कसा करावा?

खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही बीएड प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकता.

https://babscbed2023.mahacet.org/StaticPages/HomePage?did=475

maha bed cet

MAHA CET 2023 | MHT CET Exam 2023

Best Book For Talathi Exam 2023

MAHA Bed CET Book – Click Here

TAIT Exam Syllabus, Exam, Books Free Download


पोस्ट शेअर करा.

Leave a Comment