Mega bharti 2021 ,महाराष्ट्रातील मेगाभरती लटकली का?

मेगाभरती
महाराष्ट्र मेगाभरती

महाराष्ट्रातील बहुचर्चित मेगाभरती Mega bharti लटकली का?

महाराष्ट्रातील मेगा भरती हा फारच चर्चेचा विषय झालेला दिसून येतो.कारण शासनाने मेगाभरती घ्यायचे ठरवलेलं आहे. ते ध्येय अजून साध्य झालेले दिसत नाही. मेगा भरती फडणवीस सरकार याची जाहीर केलेली होती. ज्यामध्ये 72 हजार पदे भरली जाणार होती.

सत्तेच्या बदलाबरोबर महाराष्ट्रातील मेगाभरती संकल्पनेने सुद्धा रूप बदलले आणि मेगाभरती ची महाभरती झाली. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत, विविध सरकारी विभागांतील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन मेगाभरती महापोर्टल द्वारे न घेता, नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नाव जरी बदलले असल तरी कार्यक्षमता मात्र बदलली नाही.कारण नुकताच आलेल्या बातमी नुसार निविदा प्रक्रियांमध्ये 19 वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

Maharashtra new GR about Direct Recruitment

मेगा भरती Mega bharti लटकण्याची तांत्रिक कारणे ?

मेगा भरती 2017-18 मध्ये जाहीर केली गेली आणि त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. विविध विभागाच्या माध्यमातून जागा भरण्यासाठी जाहिरातीत देण्यात आल्या. राज्यभरातील विविध विद्यार्थ्यांनी संबंधित शासकीय नोकरीसाठी अर्ज देखील केला. तेवढ्यात फडणवीस सरकारच्या काळातील महापरीक्षा पोर्टल वादग्रस्त ठरले.

जुलै 2019 मध्ये सांगली, कोल्हापूर मध्ये महापूर आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात अडचणी निर्माण झाल्या. यानंतर निवडणुकांचे बिगुल वाजले आणि राज्यामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता झाल्यानंतर निवडणुकांच्या निकालांमध्ये सत्ता बदल झालेला दिसून आला आणि मेगाभरती लटकली. कारण सत्तेत आलेल्या नव्या सरकारचे आश्वासन होते कि महापरीक्षा बंद केले जाईल. या सर्व गोंधळामध्ये मेगा भरती लटकत राहिली.

दोष कोणाचा ?

दोष कोणाचा या बाबींमध्ये आपण महा पोर्टल विषयी बोलणार नसून भरती प्रक्रियेवर एकंदरीत बोलत आहोत. वास्तविक पाहता मेगा भरती तटवण्यामध्ये दोष कोणाचाच नाही. कारण मेगा भरती 2019/20 लांबणीवर पडत गेली ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक कारणामुळे यामध्ये कोणाचाही दोष नाही.

नुकसान कोणाचे ?

या पूर्ण प्रकारांमध्ये दोष जरी कोणाला देता येत नसला तरी नुकसान मात्र परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे झाले असे खात्रीपूर्वक म्हणता येते. कारण रोजगाराचा कोणताही खात्रीशीर स्त्रोत नसणे, वाढते वय, मानसिक अस्थिरता यासारख्या अनेक प्रश्नांमुळे महाराष्ट्रातील युवक त्रस्त झाला हे नाकारता येत नाही.

मेगा भरती यशस्वी होण्यासाठी काय करता येईल?

सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले असले तरी परीक्षा प्रणाली राबवणारी संस्था निवडणे, विविध पदांच्या परीक्षेकरिता नियोजन करणे, यासारख्या गोष्टी शासकीय पातळीवर ती करता येतील. 

महाराष्ट्राच्या गृह विभागाने पोलीस भरती 2020 मध्ये सुद्धा जागा वाढवलेल्या आहेत. आरोग्य विभाग सक्षम असणे सद्यस्थिती ची गरज आहे. जेणेकरून भरती प्रक्रियेत पारदर्शकता टिकून राहील. एक चांगली संस्था महाराष्ट्रामध्ये भरती करण्यासाठी उभी राहील. यातून लटकलेली भरतीप्रक्रिया जी आहे ती तातडीने राबवून शासकीय विभागातील रिक्त जागा भरून जनतेला शासकीय सेवा आणि गरजू तरुणाला नोकरी मिळाली तर अखंड महाराष्ट्र अस्तित्वात असणाऱ्या सरकारचा ऋणी राहील.

जलद गतीच्या शासकीय सेवेमुळे जनता खूष होईल आणि मिळालेल्या नोकरीमुळे मराठी युवकाच्या चेहऱ्यावरती हास्य उमगेल.

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “Mega bharti 2021 ,महाराष्ट्रातील मेगाभरती लटकली का?”

Leave a Comment