Maharashtra police bharti 2021 | महाराष्ट्र पोलीस भरती 2021

police bharti Maharashtra | महाराष्ट्र पोलीस भरती 2021

 महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच पोलीस भरती येऊ घातलेली आहे.  पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या असंख्य उमेदवारांना उपयुक्त अशी माहिती या ठिकाणी देत आहोत. maharashtra police bharti 2021

maharashtra police bharti
maharashtra police bharti 2021

maharashtra police bharti 2020 सुद्धा कोरोना कालावधीमध्ये होऊ शकली नाही. maharashtra police bharti 2021 मात्र होणार असे वाटते. कारण पोलीस आणि आरोग्य विभागाचे महत्व आता जास्तच अधोरेखित झाले आहे.

 काही उमेदवारांना प्रश्न पडतो की पोलीस भरतीची निवड सूची कशी लागते?  पोलिस भरतीमध्ये प्रतिक्षासुची असते का?  जर असेल तर किती कालावधीसाठी असते? भरती प्रक्रियेतील सर्वच जागा भरल्या जातात का?  काही जागा रिक्त असतात का?  जर जागा भरतीप्रक्रिया घेऊन ही रिक्त राहत असेल तर त्याचे होते काय?  या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मिळतील.

पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये निवड सूची किंवा प्रतीक्षा सूची तयार करण्यासंदर्भात कालमर्यादा निश्चित करण्यात येत आहे.  दिनांक 10 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार निवड सूची प्रतिक्षासुची संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

 महाराष्ट्र राज्यामध्ये पोलिस व कारागृह हे गृह विभागाच्या अखत्यारीत येणारे विभाग आहेत.  पोलीस विभागातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई ही पदे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 नुसार व यामध्ये वेळोवेळी केलेल्या बदलानुसार पदांची भरती केली जाते.

 राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई ही पदे राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2012 नुसार भरण्यात येतात. Maharashtra police bharti 2021

 या दोन्ही नियमावलीमध्ये भरती प्रक्रिया राबवत असताना निवड सूची चा वैद्य कालावधी प्रतिक्षासुची ची कार्यपद्धती इत्यादी बाबत स्पष्ट नाही.  म्हणून सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रक का मधील सूचनांनुसार कार्यवाही केली जाते. 

 पोलीस भरती प्रक्रिया राबवत असताना निवड सूचीतील निवड झालेले काही उमेदवार विविध कारणासाठी पोलीस शिपाई नियुक्ती नाकारतात.  काही उमेदवार वैद्यकीय कारणास्तव पोलिस शिपाई पदासाठी अपात्र ठरतात. अशा परिस्थितीत प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना पोलीस शिपाई पदावर नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येते.  काही उमेदवार कागदपत्र अभावी अपात्र ठरतात तर बरेच उमेदवार निवड झाल्यानंतर काही कालावधीत राजीनामा देतात. 

 या सर्व प्रकारामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवार सुद्धा कमी पडतात.  म्हणून भरती प्रक्रिया राबवून सुद्धा पोलीस शिपायांची पदे रिक्त राहतात त्यामुळे जेवढ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे तेवढी सर्व पदे भरण्यासाठी धोरण निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

याला अनुसरून पुढील प्रमाणे पोलीस भरती 2021 पासून शासन निर्णय घेण्यात येत आहे. Maharashtra police bharti 2021

1)  निवड सूची व प्रतीक्षा सूची

 पोलीस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई यांची निवड करताना पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. 

अनुक्रमांकप्रवर्ग निहाय रिक्त पदांची संख्यानिवड सूची मध्ये समाविष्ट करावयाची उमेदवारांची संख्या
113
22ते4रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 100 टक्के किंवा 15 यापैकी जे अधिक असेल ते
35ते9रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 50 टक्के किंवा 15 यापैकी जे अधिक असेल ते
410 ते 49रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 30 टक्के किंवा 15 यापैकी जे अधिक असेल ते
550 किंवा त्याहून अधिकरिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 25%
maharashtra police bharti 2021

2) दोन उमेदवारांना समान गुण मिळाल्यास काय करावे?

Maharashtra police bharti 2021 मध्ये आणि यापुढे  दोन किंवा दोनपेक्षा अधिक उमेदवारांना घेण्यात आलेल्या पोलिस शिपाई भरती परीक्षेमध्ये जर समान गुण मिळाले अशा उमेदवारांच्या गुणवत्ता यादी मधील प्राधान्यक्रम कसा असावा या संदर्भात मार्गदर्शन आपल्याला मिळते.  तो प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे.

1)  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील

2)  समान गुण मिळालेल्या उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यांना असेल तर वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

3)  वरील एक व दोन या दोन्ही अटी मध्ये देखील समान असेल तर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावा.

4)  वरील तीनही अटींमध्ये देखील समान ठरत असतील काही उमेदवार तर पदाच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक  पात्रते मध्ये जास्तीत जास्त गुण प्राप्त असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

3)  निवड सूची कालमर्यादा maharashtra police bharti 2021

  पोलीस भरती साठी निवड सूची निवड समितीने तयार केलेली एक वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांक पर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्यात दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील त्यानंतर ती निवड सूची आपोआप रद्द होईल.

वरील दिलेल्या पद्धतीप्रमाणे यापुढे होणाऱ्या पोलीस भरती मध्ये Maharashtra police bharti 2021 कार्यवाही केली जाणार आहे.  अपेक्षा आहे निवड सूची (Selection list) व प्रतीक्षा सूची (waiting list ) याविषयी मनात  असणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. 

माहितीपूर्ण पुढील लेखही वाचा

police bharti, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची सूची, Maharashtra Police Bharti Book List 2020

Maharashtra Direct Recruitment NEW GR

siac mumbai | प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र | Siac Entrance Exam

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

2 thoughts on “Maharashtra police bharti 2021 | महाराष्ट्र पोलीस भरती 2021”

  1. Same marks astil tar age bhagnar aahe aani ha niym magchya bhartit same hota ki dusra niym hota comment karun sanga plz

    Reply

Leave a Comment