Maharashtra Post Office Exam 2021

Maharashtra Post office exam 2021 | Admit card | exam date

Maharashtra Post Office exam महाराष्ट्र राज्यातील पोस्ट विभागाअंतर्गत निघालेल्या सरळ सेवा भरती प्रक्रिया बाबत Maharashtra Postal Circle Admit card 2021 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत.  पाहुयात सविस्तर माहिती. post exam 2021, mts exam 2021,

 महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत 1371  पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली होती.  जाहिरातीमध्ये पोस्टमन, मेल गार्ड व मल्टिटास्किंग  स्टाफ या पदांसाठी अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या.  महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी  या पदांसाठी अर्ज केलेले आहेत.

Maharashtra Post Office Exam 2021

पोस्टमन, मेल गार्ड व मल्टी टास्किंग स्टाफ पदांचे परीक्षा प्रवेश पत्र व परीक्षा तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. post exam 2021, mts exam 2021,

वरील तीन पदांच्या परीक्षा मधील मल्टिटास्किंग स्टॉप पदाची परीक्षा आधी होणार आहे. 

मल्टी टास्किंग स्टाफ परीक्षेसाठी MTS exam 2021

प्रवेश पत्र मिळण्याचा कालावधी  –  27 डिसेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021

 प्रत्यक्ष परीक्षा कालावधी  –  5 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021

 पोस्टमन व मेल गार्ड परीक्षेसाठी postman exam 2021

प्रवेश पत्र मिळण्याचा कालावधी  – 5 जानेवारी 2021 ते 29 जानेवारी 2021

प्रत्यक्ष परीक्षा कालावधी  –   15 जानेवारी 2021 ते 29 जानेवारी 2021

परीक्षा विषयक महत्वाच्या सूचना

1)  उमेदवाराने त्यांच्या प्रवेश पत्रामध्ये दिलेली माहिती तपासली पाहिजे आणि जर त्यात काही विसंगती आढळल्यास परीक्षा दिनांक च्या दोन दिवस आधी आवश्यक कार्यवाही सह [email protected] या हेल्पडेस्क  ईमेल आयडी वर तसे कळवावे.

2) वाहतुकीची व्यवस्था कोरोना कालावधीमुळे विस्कळीत असल्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर ती उपस्थित राहावे उशीर झाल्यास हजर न राहिल्यास डिओपी जबाबदार असणार नाही.

3)  प्रवेश पत्राची मुद्रित प्रत प्रिंट आउट परीक्षा केंद्रात आणणे आवश्यक आहे नोंदणीच्या वेळी अपलोड केलेल्या फोटो प्रमाणे पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो चिकटवावा.

4)  उमेदवारांनी खालीलपैकी कोणतेही मूळ फोटो ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड/ इ-आधार प्रिंट आउट 
  • मतदार ओळखपत्र
  •  चालक परवाना 
  • पॅन कार्ड 
  • पासपोर्ट
  •  विद्यापीठ/ शाळा/ महाविद्यालयाने जारी केलेले ओळखपत्र 
  • केंद्र /राज्य शासनाने जारी केलेले अन्य कोणतेही फोटो असलेले ओळखपत्र 
  • संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले माजी सैनिकांसाठी चे डिस्चार्ज कार्ड

वरील पैकी कोणतेही ओळखपत्र आणून शकल्यास उमेदवाराला परीक्षेस बसू दिले जाणार नाही कोणत्याही आयडी कार्डची झेरॉक्स प्रत स्वीकारली जाणार नाही.

5)  सदर परीक्षा ऑनलाइन संगणक आधारित आहे शंभर प्रश्नासाठी परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे असेल प्रत्येक अचूक पर्यायासाठी एक गुण दिला जाईल चुकीच्या पर्यायासाठी गुणांची वजावट केली जाणार नाही.

6)  कॅल्क्युलेटर मोबाईल फोन्स इत्यादी वापरण्यास परवानगी नाही. कच्च्या कामासाठी कोरे कागद दिले जातील उमेदवारांनी  स्वतःचे पेन पेन्सिल आणावेत परीक्षा संपल्यानंतर उमेदवारांना वापरलेले कागद परीक्षा काकडे परत जमा करावे लागतील.

7)  उमेदवाराने कोणतीही आक्षेपार्ह वस्तू परीक्षा हॉलमध्ये बाळगण्यास सक्त मनाई आहे आणि त्यास अनुचित मार्ग म्हणून मानले जाईल.  उमेदवारांच्या सामानासाठी सेफ कीपिंग किंवा लोकरची कोणती व्यवस्था नाही या गोष्टींना सुरक्षित ठेवण्यास दिओपी जबाबदार राहणार नाही.

8)  सदरचे प्रवेशपत्र केवळ दिलेल्या तारखेसाठी आणि त्यावर दिलेल्या वेळे पुरतेच वैध आहे.ठरलेल्या शिफ्टमध्ये अनुपस्थित राहिल्यास उमेदवार इतर शिफ्टमध्ये हे उपस्थित राहण्यास पात्र ठरणार नाहीत.

9)  उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश पत्र फोटो ओळखपत्र अंड सॅनिटायझर पारदर्शक पेन पेन्सिल आणि पाण्याची बाटली उमेदवारांसाठी नेण्याची परवानगी आहे.

10) परीक्षा एकापेक्षा अधिक शिफ्टमध्ये घेतली जाणार असल्यामुळे गुणांचे प्रमाणीकरण केले जाईल.

11)  परीक्षा केंद्र मधील बदलांची कोणतीही मागणी कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतली जाणार नाही.

12)  परीक्षा संपल्यानंतर प्रवेशपत्रे परत गोळा केले जातील. 

 उमेदवारांना खालील परिस्थितीत परीक्षेसाठी मनाई केली जाईल. Maharashtra Post Office Exam 2021

  1.  गेट बंद झाल्यावर परीक्षा केंद्रावर येणारे उमेदवार
  2.  प्रवेश पत्राची छापील प्रत सोबत न बाळगणारे उमेदवार
  3.  मूळ ओळख पत्र न बाळगणारे उमेदवार
  4.  प्रवेशपत्रात उमेदवारांनी रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवलेला नाही असे उमेदवार 

Best Of Luck

आणखी माहिती आपल्यासाठी

Post Office Recruitment 2020 Maharashtra | Postman । MTS

रेल्वे भरती 2021 जाहीर | railway bharti 2021, railway bharti 2020

Visit Official Website

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment