Maharashtratil Ghat in Marathi 2024 | महाराष्ट्रातील घाट

महाराष्ट्रातील घाट | Maharashtratil Ghat in Marathi 2024

महाराष्ट्रातील घाटांची माहिती: Maharashtratil ghat या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घाटा विषयी माहिती घेणार आहोत.  घाट आधारित विविध प्रश्न जे आपल्याला पडलेले असतात त्याची उत्तरे शेवटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

Maharashtratil Ghat in Marathi
Maharashtratil Ghat in Marathi

घाट म्हणजे काय ? 

पर्वतीय प्रदेश पार करण्यासाठी बनवण्यात आलेला सोयीस्कर मार्ग म्हणजे घाट होय. दुसऱ्या शब्दात घाट म्हणजे डोंगर ओलांडण्यासाठी बनवण्यात आलेला रस्ता म्हणजे घाट होय. आजच्या या लेखात  मी तुम्हाला माहिती नसलेल्या सर्व घाटांची माहिती, जिल्हा आणि मार्ग यांची माहिती दिली आहे. 

 महाराष्ट्रातील प्रमुख घाटांची यादीMaharashtratil Ghat in Marathi | महाराष्ट्रातील घाटांची माहिती

क्र. घाटाचे नाव जिल्हा मार्ग
1 दिवा घाट पुणे पुणे-बारामती
2 वरंधा घाट रायगड पुणे-महाड
3 शिर घाट  पालघर नाशिक-जव्हार
4 थळ घाट (कसारा घाट) ठाणे मुंबई-नाशिक
5 माळशेज घाट पुणे अहमदनगर-शहापूर
6 नाणेघाट पुणे जुन्नर-कल्याण
7 भीमाशंकर घाट पुणे नारायणगाव-पनवेल
8 बोरघाट रायगड मुंबई-पुणे
9 कात्रज घाट पुणे पुणे-सातारा
10 पारघाट रायगड महाड-महाबळेश्वर
11 कशेडी घाट रायगड महाड-दापोली
12 कुंभार्ली घाट रत्नागिरी कराड-चिपळूण
13 पसरणी घाट सातारा वाई-पाचगणी-महाबळेश्वर
14 खंबाटकी घाट सातारा पुणे-सातारा
15 आंबा घाट रत्नागिरी कोल्हापूर-रत्नागिरी
16 अनुस्कुरा घाट रत्नागिरी कोल्हापूर-राजापूर
17 करुळ घाट सिंधुदुर्ग कोल्हापूर-वैभववाडी
18 फोंडा घाट सिंधुदुर्ग कोल्हापूर- देवगड-पणजी
19 हनुमंते घाट सिंधुदुर्ग कोल्हापूर कुडाळ
20 आंबोली घाट सिंधुदुर्ग कोल्हापूर-सावंतवाडी
21 आंबोली घाट सातारा खेड-सातारा
22 कुंडी घाट सिंधुदुर्ग देवरुख-कोल्हापूर
23 चंदनपूरी घाट अहमदनगर पुणे-नाशिक
24 वीरा घाट अहमदनगर संगमनेर-शहापूर
25 तोरणमाळ घाट नंदुरबार शहादा-तोरणमाळ
26 चांद सेली घाट नंदुरबार शहादा-धडगाव
27 कोंडाईबारी घाट धुळे साक्री-नवापूर
28 पालघाट जळगाव यावल-इंदोर
29 चिखलदरा घाट अमरावती अमरावती-चिखलदरा
30 सरसा घाट चंद्रपूर सिरोंचा-चंद्रपूर
31 नारदाचा घाट सिंधुदुर्ग मालवण-कोल्हापूर
32 गगनबावडा घाट कोल्हापूर विजयदुर्ग-गगनबावडा
33 आंबेनळी घाट रायगड महाड-महाबळेश्वर
34 कांचन मंचन घाट नाशिक सुरगाणा-कळवण
35 ढवळा घाट रायगड पोलादपूर-भोर

महाराष्ट्रातील घाट रस्त्यांची माहिती घेत असताना हे लक्षात ठेवले पाहिजे की त्या रस्त्यावरील सुरवातीचे ठिकाण व अंतिम ठिकाण यामध्ये इतर बरीच ठिकाणे येतात. त्या वरुन ठिकाणांची नावे जरी बदलली तरी घाट समजून घेणे महत्त्वाचे आहे.

उदाहरणार्थ – पुणे ते बेंगलोर, किंवा पुणे ते कोल्हापूर, किंवा पुणे ते सातारा या मार्गावरती महाराष्ट्रात दोन घाट येतात. ते म्हणजे पुण्याजवळील कात्रज घाट आणि सातारा जवळील खंबाटकी घाट.

महाराष्ट्रातील घाट यांचा अभ्यास करताना अंतिम ठिकाण व प्रत्यक्ष घाटा जवळील ठिकाण यांचीही माहिती असावी.

MPSC Combined Exam Book List

UPSC Information in Marathi

Reference book

FAQ | Maharashtratil Ghat in Marathi

महाराष्ट्रातील अवघड घाट रस्ता कोणता?

महाराष्ट्रातील अवघड घाटरस्ता कशेडी घाट आहे. हा घाट महाड दापोली या मार्गावर ती आहे

महाराष्ट्रातील सर्वात लांब घाट रस्ता कोणता?

महाराष्ट्रातील सर्वात लांब घाट रस्ता आंबेनळी घाटाचा आहे. आंबेनळी घाट महाड-महाबळेश्वर या मार्गावर ती आहे.

फोंडा घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो?

फोंडा घाट कोल्हापूर व पणजी या दोन ठिकाणांना जोडतो

महाबळेश्वर महाड मार्गावर कोणता घाट आहे?

महाबळेश्वर महाड मार्गावर आंबेनळी घाट व पार घाट असे दोन घाट आहेत.

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment