Manav Vikas Ahaval 2022 मानव विकास निर्देशांक

Manav Vikas Ahaval 2022 मानव विकास निर्देशांक

नुकताच संयुक्त राष्ट्र संघाचा मानव विकास निर्देशांक Manav Vikas Ahaval 2021-2022  जाहीर करण्यात आलेला आहे. या मानव विकास निर्देशांकामध्ये 191 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक 132 वा आहे. 

मानव विकास निर्देशांक (Human Development Index) – मानव विकास अहवाल 1990 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम,  यू.एन.डी.पी. ( United Nations Development Programme)  ने पहिल्यांदाच जाहीर केला. मानव विकास निर्देशांकाची संकल्पना महबुब उल हक आणि अमर्त्य सेन यांची होती. महबुब उल हक यांना मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हणून ओळखले जाते. महबुब उल हक हे पाकिस्तानचे अर्थतज्ञ होते.  

पुढील तीन निकषांच्या आधारे मानव विकास निर्देशांक काढला जातो. 

  • 1) आरोग्य, 
  • 2) शिक्षण, 
  • 3) जीवनमानाचा दर्जा.

1) आरोग्य – देशाच्या आरोग्याचा स्तर मोजण्यासाठी जन्माच्या वेळचे आयुर्मान हा निर्देशक वापरला जातो . कमाल आयुर्मान 85 तर किमान आयुर्मान 20 वर्षे समजले जाते.

2) शिक्षण – शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांनी किती वर्षे शिकणे अपेक्षित आहे हे विचारात घेतले जाते. कमाल शिक्षण अठरा वर्षे व किमान शिक्षण शून्य वर्ष समजले जाते.

3) जीवनमानाचा दर्जा – जीवनमानाचा दर्जा मोजण्यासाठी क्रयशक्ती उत्पन्न मोजले जाते. कमाल उत्पन्न 75 हजार डॉलर किमान उत्पन्न $100 समजले जाते. या निर्देशांकाची किमान व कमाल मूल्य ठरवून प्रत्येक देश या मूल्याच्या दरम्यान कोठे आहे यावरून देशाचे निर्देशक काढतात त्यांच्या सरासरी वरून देशाचा मानवी विकास निर्देशांक ठरवतात याचे मूल्य शून्य ते एक दरम्यान व्यक्त केले जाते एक च्या जवळ असलेले मूल्य मानवी विकासाचा उच्चस्तर दर्शवतो.

(HDI)निर्देशांक = प्रत्यक्ष मूल्य – किमान मूल्य / महत्तम मूल्य – किमान मूल्य

2022 च्या सांख्यिकी अहवालात 191 देशांचा 2021 मधील मानव विकास निर्देशांक दिला आहे. यापैकी स्विझर्लांड प्रथम क्रमांकावर असून दक्षिण सुदान हा देश शेवटच्या क्रमांकावर आहे.

Manav Vikas Ahaval 2022  ची थीम

“अनिश्चित काळ, अस्थिर जीवन: परिवर्तनाच्या जगात आपले भविष्य घडवणे”

 मानव विकास  निर्देशांकातील पहिले पाच देश. Manav Vikas Ahaval 2022

  • 1)स्वित्झर्लंड 
  • 2) नॉर्वे 
  • 3) आइसलँड 
  • 4) हॉंगकॉंग 
  • 5) ऑस्ट्रेलिया

 मानव विकास निर्देशांकातील शेवटचे पाच देश. 

  • 191) साउथ सुदान 
  • 190) चाड 
  • 189) नायजर  
  • 188) सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (CAR) 
  • 187) बुरुंडी

जगाचा सरासरी मानवी विकास निर्देशांक 0.732 आहे. भारताचा या यादीत 132 वा क्रमांक असून भारताचा मानव विकास निर्देशांक 0.633 आहे. यावरून ही गोष्ट लक्षात येते की एकूण जागतिक विकासापेक्षाही भारताचा विकास या कालावधीमध्ये कमी झालेला आहे. 

2021 च्या मानव विकास अहवालामध्ये भारत 131 व्या क्रमांकावर होता. Manav Vikas Ahaval 2022  मध्ये भारत एका अंकाने घसरला आहे.  याचे प्रमुख कारण म्हणजे सरासरी आयुर्मानात झालेली गट होय.  दिलेल्या सर्वेक्षण कालावधीतील आयुर्मानातील घट 69.7 वर्षावरून 67.2 वर्षे इतकी झाली आहे.

वरील आकडेवारीनुसार भारतात मध्यम विकसित देशांच्या यादीत बसतो. भारताने स्वतः 2001मध्ये मानव विकास अहवाल तयार केला होता. 2011 मध्ये दुसरा मानव विकास अहवाल भारत शासनाने प्रकाशित केला या अहवालाचा विषय सामाजिक समावेशनाकडे असा होता.

Manav Vikas Ahaval 2022  मधील भारताच्या शेजारील देशांची स्थिती

  अ.क्र.देशअहवालातील स्थिती
1)श्रीलंका73
2)चीन79
3)बांगलादेश129
4)भूटान127
5)पाकिस्तान161
6)नेपाळ143
7)  म्यानमार149

Economic Growth and Development

Upsc Book List In Marathi 2022 Free Download

UNDP

मानव विकास निर्देशांक कोण जाहीर करते?

 मानव विकास निर्देशांक संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP)जाहीर करते.

मानव विकास अहवाल कधी पासून सुरू करण्यात आला? 

मानव विकास अहवाल 1990 पासून सुरू करण्यात आला.

मानव विकास निर्देशांक ही संकल्पना कोणी मांडली?

मानव विकास निर्देशांक ही संकल्पना पाकिस्तानचे अर्थतज्ञ मेहबूब उल हक यांनी मांडली.

भारताचा पहिला मानव विकास अहवाल कधी प्रकाशित झाला?

भारताचा पहिला मानव विकास अहवाल 2001 मध्ये प्रकाशित झाला.

मानव विकास कोणत्या घटकावर अवलंबून आहे?

मानव विकास आरोग्य, शिक्षण आणि जीवनमानाचा दर्जा या घटकावर अवलंबून आहे.

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “Manav Vikas Ahaval 2022 मानव विकास निर्देशांक”

Leave a Comment