MPSC RECRUITMENT – 2022 | MPSC Exam Date 2022
महत्वाचे मुद्दे
राज्यसेवा पूर्व परीक्षा -2022
MPSC Exam Date 2022 – MPSC Recruitment 2022 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे. त्यापैकी एक जाहिरात 11 मे, 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता व अनुभव, एकूण पदसंख्या, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा स्वरूप, महत्त्वाच्या तारखा, इत्यादी घटकांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एमपीएससीतर्फे राज्य सेवा अंतर्गत विविध जागा भरण्यात येणार आहेत.
MPSC – राज्यसेवा अंतर्गत पदभरती चा तपशील- महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण 161 पदावरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंदर्भात आयोगाच्या वेबसाईटवर जाहिरात (जाहिरात क्रमांक 045/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
उपलब्ध पदसंख्या – 161
प्रस्तुत परीक्षेतून भरावयाच्या विविध पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
अ. क्र. | पद | एकूण पदे |
1 | सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट -अ | 09 |
2 | मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट -अ | 22 |
3 | बालविकास प्रकल्प अधिकारी, गट -अ व तत्सम पदे | 28 |
4 | सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट -ब | 02 |
5 | उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट -ब | 03 |
6 | कक्ष अधिकारी, गट – ब | 05 |
7 | सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट – ब | 04 |
8 | निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे | 88 |
MPSC Exam Date 2022
MPSC Preliminary Exam 2022 / राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 रविवार दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :-
1) पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
2) विद्यमान परीक्षा योजनेनुसार राज्यसेवा परीक्षामधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केली आहेत. विद्यमान संवर्गाव्यतिरिक्त काही नवीन संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे.
3) महिला, खेळाडू तसेच अनाथांसाठीचे समांतर आरक्षण शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.
4) कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी याचा भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा 1950 च्या कलम 20 अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.
वेतनश्रेणी :-
गट – अ व गट – ब सुधारित वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तरानुसार.
पात्रता :-
- भारतीय नागरिकत्व.
- वयोमर्यादा – वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 01 सप्टेंबर, 2022 असेल. MPSC age limit
अ. क्र. | प्रवर्ग | कमाल वयोमर्यादा |
1 | आ. दु. घ./ अमागास | 38 |
2 | अनाथ / मागासवर्गीय / प्राविण्य प्राप्त खेळाडू / माजी सैनिक / अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी | 43 |
विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.
शैक्षणिक अर्हता :-
1)उपलब्ध पदसंख्येतील, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ तसेच सहाय्यक प्रादेशिक अधिकारी, गट- ब या संवर्गातील पदे वगळून इतर पदांसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता.
2) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट- अ पदासाठी खालील प्रमाणे अर्हता आवश्यक –
- सांविधिक विद्यापीठाची, किमान 55 टक्के यासह वाणिज्य शाखेची स्थानक पदवी किंवा
- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
- इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखा शास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
- सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा
- अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए.)
3) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी आवश्यक आहे.
शारीरिक मोजमापे/ अर्हता :-
वरील अर्हतेसोबत खालील संवर्ग/पदाकरिता त्यांच्यासमोर दर्शविल्याप्रमाणे उमेदवारांची शारीरिक मोजमापे/अर्हता असणे आवश्यक आहे.
1)सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब :-
पुरुष उमेदवार | स्त्री उमेदवार |
1)उंची – 163 सें.मी.(अनवणी)(कमीत कमी) 2)छाती – न फुगवता 79 सें.मी (कमीत कमी) 3)फुगावण्याची क्षमता किमान 5 सें.मी.आवश्यक. चष्मासह अथवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आणि रातांधळेपणा नसावा. | उंची – 163 सें.मी.(अनवानी)(कमीत कमी) चष्मासह अथवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आणि रातांधळेपणा नसावा. |
2)उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट – ब :-
पुरुष उमेदवार | स्त्री उमेदवार |
1)उंची – 165 सें.मी.(अनवाणी)(कमीत कमी). 2)छाती – न फुगवता 79 सें. मी. 3)फुगावण्याची क्षमता – किमान 5 सें.मी.आवश्यक. | उंची – 155 सें.मी.(अनवाणी)(कमीत कमी) |
अर्हता/पात्रता गणण्याचा दिनांक :-
मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
परीक्षेच्या संधी :-
आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा खालील प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.
1)अराखीव (खुला) – कमाल सहा संधी.
2)अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती – संधीची मर्यादा लागू नाही.
3)अराखीव (खुला)/आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील दिव्यांग व अनाथ – कमाल नऊ संधी.
4)उर्वरित मागासवर्ग प्रवर्ग – कमाल नऊ संधी.
निवड प्रक्रिया :-
1)जाहिरातीमध्ये नमूद अर्हता /पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखत/शिफारसीसाठी पात्र असणार नाही. 2)सेवा भरती बाबतची संपूर्ण प्रक्रिया संबंधित प्रवर्ग/पदाच्या सेवाप्रवेश नियम आणि या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, आरक्षणासंदर्भातील शासनाचे प्रलंबित धोरण तसेच आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.
परीक्षेचे टप्पे :- दोन
1) प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येईल.
- पूर्व परीक्षा गुण – 400
- मुख्य परीक्षा गुण – 800
- मुलाखत गुण – 100
2)मुख्य परीक्षेस प्रवेश –
i) राज्य सेवा पूर्व परीक्षा – 2022 च्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या आणि पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता व अन्य अटींची विहित दिनांकास किंवा त्यापूर्वी पूर्तता करणाऱ्या उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.
ii) पूर्व परीक्षेच्या दोन पेपर्सपैकी पेपर क्रमांक दोनचे गुण अर्हताकारी(qualified) स्वरूपाचे असून सदर पेपरमध्ये किमान 33 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचा पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी गुणांची किमान सीमारेषा निश्चित करण्यात येईल.
भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे तसेच पद/संवर्गाचा पसंतीक्रम सादर करणे :-
पद भरतीकरिता “भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे” तसेच “पद/संवर्गाचा पसंतीक्रम” सादर करणे याबाबतची कार्यवाही फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे विहित कालावधीमध्ये करणे अनिवार्य आहे. यासंदर्भातील इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या तसेच नंतरच्या टप्प्यावर पर्याय रद्द करण्यासंदर्भात केलेल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही.
पूर्व परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत :-
अर्ज सादर करण्याचे टप्पे –
1)आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते (Profile) तयार करणे.
2) खाते तयार केलेले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे. 3)विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.
4) परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे.
5)जिल्हा केंद्र निवड करणे.
सर्व साधारण :-
1)अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
2) अर्ज सादर करण्याकरता संकेतस्थळ :- https://mpsconline.gov.in
3) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4) आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
अर्ज सादर करण्याचा कालावधी :- MPSC Exam Date
दिनांक 12 मे, 2022 रोजी 14:00 वाजल्यापासून दिनांक 01 जून, 2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत.
MPSC fee शुल्क (रुपये) :-
1)अमागास – रु. 544/-
2)मागासवर्गीय/आ. दु. घ./अनाथ – रु.344/-
3) परीक्षा शुल्क ना-परतावा आहे.
🔹 ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याकरिता विहित अंतिम दिनांक 01 जून, 2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत.
🔹 भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणे याकरता विहित अंतिम दिनांक 03 जून, 2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत.
🔹 चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 04 जून, 2022 बँकेच्या कार्यालयीन वेळेत.
प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील स्पर्धा परीक्षाअंतर्गत ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ तसेच ‘परीक्षा योजना’ विभागातील ‘राज्य सेवा परीक्षा’ मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे अवलोकन करावे.
आशा करतो की, सदरची माहिती तुम्हाला आवडली असेल.
महाराष्ट्रातील मृदा प्रकार संपूर्ण माहिती | माती
महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग संपूर्ण माहिती