mpsc exam information in marathi, MPSC राज्यसेवा परीक्षा

पोस्ट शेअर करा.

mpsc exam information in marathi

mpsc exam information in marathi

महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा एक संविधानात्मक आयोग असून राज्यामधील सनदी सेवकांची भरती प्रक्रिया या आयोगाच्या माध्यमातून पार पाडले जाते. राज्यातील विविध विद्यार्थ्यांची प्रामाणिक इच्छा असते की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायला आणि भविष्यामध्ये अधिकारी पदावरती कार्य करावे.

mpsc परीक्षेची तयारी करणार असाल तर यापुढे दिलेली प्रश्नोत्तराच्या स्वरूपात दिलेली माहिती आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. 

नवोदित उमेदवारांना पडणाऱ्या काहीच पण महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध या लेखाच्या माध्यमातून घेतलेला आहे. mpsc exam information in marathi.

महाराष्ट्राचा रहिवासी नसलेला व्यक्ती राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा देऊ शकतो का?

खुल्या सर्वसाधारण पदावरील म्हणजे आरक्षण नसलेल्या पदांसंदर्भात महाराष्ट्राचा रहिवासी नसलेली व्यक्ती सुद्धा परीक्षा देऊ शकतो.

मराठी भाषेचे ज्ञान नसलेला व्यक्ती आयोगाची परीक्षा देऊ शकतो का ?

नाही. आयोगाची परीक्षा देण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यकच आहे.

mpsc राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप कसे असते?

MPSC राज्यसेवा परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत असे तीन टप्पे या परीक्षेचे असतात.

महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा कोण देऊ शकतो?

महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा किमान पदवी पात्रता असणारा विद्यार्थी देऊ शकतो.पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात मात्र मुख्य परीक्षा देत असताना पदवी पूर्ण असणे गरजेचे असते. कला वाणिज्य विज्ञान याव्यतिरिक्त अभियंता किंवा वैद्यकीय व व्यावसायिक अभ्यासक्रमातील पदवी सुद्धा मान्य केली जाते. mpsc exam information in marathi

पुढील लेखांमध्ये राज्यसेवा परीक्षा आयोजित करणाऱ्या लोकसेवा आयोगा संदर्भात सविस्तर माहिती वाचा.

mpsc राज्यसेवा परीक्षेद्वारे कोण कोणत्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते ? mpsc exam information in marathi.

राज्यसेवा परीक्षेद्वारे २७ प्रकारची पदे भरली जातात. काही महत्त्वाची पदे पुढील प्रमाणे.

 • उपजिल्हाधिकारी
 • पोलीस उपाधीक्षक
 • विक्रीकर आयुक्त
 • निबंधक सहकारी संस्था
 • उपमुख्य कार्यकारी अधिकारी
 • सहाय्यक संचालक (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा)
 • राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक
 • तहसीलदार
 • गटविकास अधिकारी
 • महानगरपालिका उपायुक्त
 • सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी
 • नगरपालिका मुख्याधिकारी
 • लेखाधिकारी
 • भुमी अधिक्षक
 • नायब तहसीलदार

राज्य लोकसेवा आयोगामार्फत कोणकोणत्या परीक्षा होतात?

 • राज्यसेवा परीक्षा
 • महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) — यामध्ये राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, व सहाय्यक कक्ष अधिकारी या तीन पदांचा समावेश असतो.
 • महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा — यामध्ये दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, विक्रीकर विभागातील कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक या पदांचा समावेश होतो.
 • या व्यतिरिक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोग विविध परीक्षा आयोजित करत असते. JMFC विधी सेवा, शासकीय महाविद्यालयातील अधिव्याख्याता इत्यादी.

राज्यसेवा परीक्षेची तयारी कधीपासून करावी?

राज्यसेवा परीक्षेची तयारी दहावी बारावी पासून तुम्ही करू शकता. काही विद्यार्थी पदवी शिक्षण घेत असतानाच या परीक्षेची तयारी करतात. मात्र पदवी प्राप्त झाल्यानंतर या परीक्षांची तयारी करण्यात जास्त योग्य ठरते.

mpsc राज्यसेवा परीक्षेसाठी गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे काय महत्त्व?

परीक्षांचे स्वरूप आणि परीक्षेची तयारी करण्यासंदर्भात हुकमी एक्का म्हणून गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका कडे पहावे. अभ्यासामध्ये मागील वर्षांमध्ये झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा संदर्भ महत्त्वाचा ठरतो.

mpsc अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर अर्ज सादर करता येऊ शकतो का?

आयोगाकडून मुदत वाढ दिल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत मुदत संपल्यानंतर अर्ज करता येऊ शकत नाही. mpsc exam information in marathi.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत प्रतीक्षायादी जाहिर केली जाते का?

आयोगाच्या असलेल्या सर्व परीक्षांची गुणवत्ता यादी हीच प्रतीक्षा यादी असते.

परीक्षांची तयारी करण्यासाठी क्लास लावावा लागतो का?

mpsc च्या कोणत्याही परीक्षेची तयारी करताना क्लास लावणे आवश्यक नसते. मात्र अनुभवी, तज्ञ यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी क्लास उपयोगी ठरू शकतो. कमीत कमी किमतीमध्ये ऑनलाईन क्लास सुद्धा करू शकता. एका दर्जेदार क्लास ची लिंक याठिकाणी देत आहे. क्लिक करा. mpsc exam information in marathi

mpsc राज्यसेवा वर्षातून किती वेळा होते?

राज्यसेवा आयोग तीन प्रकारच्या परीक्षा घेते. प्रत्येक परीक्षा वर्षातून एकदा होते.

संदर्भ ग्रंथ म्हणून कशाचा वापर करावा?

संदर्भ ग्रंथ म्हणून त्या त्या विषयांच्या आदर्श पुस्तकांचा वापर करावा.

मित्रांनो वरील लेखांमध्ये आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विविध प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा आहे की आपल्या प्रश्नाचे mpsc exam information in marathi उत्तर येथे मिळाले असेल. जर याव्यतिरिक्त काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. होय, तुमच्या कमेंटच्या आम्ही वाट पाहतोय.

MPSC Books List In Marathi for mpsc exam 2021

police bharti, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची सूची, Maharashtra Police Bharti Book List 2021


पोस्ट शेअर करा.

26 thoughts on “mpsc exam information in marathi, MPSC राज्यसेवा परीक्षा”

  • Mpsc mdhe ashe konte pad ahet jyat physical test/criteria nsto

   Reply
   • पोलिस सोडलं तर कोणत्याच पोस्ट ला physical नसत

    Reply
 1. Mi art student aahe majhe age 33 aahe mi kay karu shakte

  Reply
 2. नमकार सर मी कला शिक्षक असुन मी ए टी डी , जी डी आर्ट ए यम आर्ट मास्टर टिचर डिलोमा अशा प्रकारचे शिक्षण कलासंचालनालय महाराष्ट राज्य मुंब ई मान्यता प्राप्त कलामहाविद्ालयातुन चित्रकलेचे शिक्षण पुर्ण केले असुन मी स्पधा परिषा देण्यासाठी पात्र आहे का? वय किती असावे लागते प्रकल्पग्रस्त यांना आरक्षण असते का?

  Reply
 3. मि 12 चि परीक्षा दिली आहे मग मि ही परीक्षा देण्यास पात्र आहे का

  Reply
  • पदवी असावी लागते. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

   Reply
  • नाही पदवी असणे आवश्यक आहे

   Reply
 4. मी 12 वी ची परीक्षा दिली आहे. मी ही परीक्षा देण्यास पात्र आहे का….

  Reply
  • graduation असावे लागते. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

   Reply
 5. Hii sir mpsc mdhe ase konte pad ahe jyat hight important nahi

  Reply
 6. majha graduation zal aahe aani mala aata mpsc chi pariksha deyaychi aahe tar mala mpsc exam sathi addmission bhetal ka

  Reply
 7. Mpsc madhe jaga nigachi vat pahavi lagt nahi n apan tahsil dar sathi darvaeshi exam getali jate ka

  Reply
 8. मी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे . वय 43 वर्षे . मी पात्र आहे का

  Reply
 9. Maz b.com 3rd year clear ahe but 2nd year che 2 subject rahile ahe tar me exam deu shakto ka…

  Reply
  • देऊ शकता. लिंक शेअर करून सहकार्य करावे ही अपेक्षा..आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

   Reply
 10. Mi LLB karat aahe mi law chya kitvya Year la Mpsc deu shakte

  Reply
  • Final Year
   आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link and spread the love.

   Reply
 11. सर मी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील (बेळगाव जिल्हा बेळगाव तालुका )रहिवासी आहे. पण मी कोल्हापूर येथे कृषी पदवीचे शिक्षण घेत आहे. माझी मातृभाषा मराठी व जात हिंदू मराठा आहे. मी MPSC परीक्षा देऊ शकते का??? कृपया मला मार्गदर्शन करा.

  Reply
  • महाराष्ट्राचा रहिवासी नसलेला व्यक्ती राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा देऊ शकतो का?
   खुल्या सर्वसाधारण पदावरील म्हणजे आरक्षण नसलेल्या पदांसंदर्भात महाराष्ट्राचा रहिवासी नसलेली व्यक्ती सुद्धा परीक्षा देऊ शकतो.
   https://www.nitinsir.in/mpsc-exam-information-in-marathi/
   आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link and spread the love.

   Reply
 12. Mi b com zaleli ahe Ani maze age 35 yrs he mi eligible he ka? Ani konatya group sathi?

  Reply
  • आपण या परीक्षा देण्यासाठी पात्र आहात का हे फक्त वय आणि शिक्षण यावर अवलंबून नसून आपला सामाजिक प्रवर्ग, आरक्षण, देऊ इच्छित असणारी परीक्षा, परीक्षेची तत्कालीन येणारी जाहिरात, तत्कालीन परिस्थिती अशा विविध मुद्द्यांवरती आधारित असते. कृपया आपल्याला विनंती आहे की हे सर्व मुद्दे आपण तपासून पहावेत. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. या माहितीची लिंक शेअर करून सहकार्य करा.

   Reply

Leave a Comment