MPSC Group C Answer Key 2022 Question Paper with Answer Key Solution

पोस्ट शेअर करा.

MPSC Group C Answer Key 2022 Question Paper with Answer Key Solution

Mpsc group c answer key 2022 And its question paper will be discussed here. As we know that the maharashtra public service commission conducted maharashtra group c exam 2022 on 3 April 2022.

“भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे” हा उल्लेख खालीलपैकी कोठे आले आहे ?

(1) संविधानाच्या उद्देशपत्रिकेत

(2) राज्यधोरणविषयक मार्गदर्शक तत्वांमधे

(3) मूलभूत अधिकारांच्या वर्णनात 

(4) मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात

राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधाने विचारात घ्या 

(a) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्या जवळ असणे आवश्यक असते.

(b) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेषाधिकार व फायदे संरक्षण त्यास मिळतात.

(c) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते.

(d) त्याचा कार्यकाळ पाच वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो. 

वरीलपैकी कोणते विधान / ने बरोबर आहेत ?

(1) फक्त (a)

(2) फक्त (b) 

(3) (a). (b) आणि (c) 

(4) .(b) (c) आणि (d)

खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली ?

(a) बाबूराव काळे समिती

(b) पी. बी. पाटील समिती

(c) बोगीरवार समितो

(d) वसंतराव नाईक समिती

पर्यायी उत्तरे

(1) फक्त (a)

(2) फक्त (b) 

(3) (b) आणि (c)

(4) (c) आणि (d)

उच्च न्यायालये कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात?

(1) कलम 220

(2) कलम 221 

(3) कलम 213

(4) कलम 226

ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही?

(1) पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतात.

(2) पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते.

(3) ग्रामसभेचे अधिकार केंद्रसरकार निर्धारित करते.

(4) त्याची ग्रामपातळीवरील अधिकार आणि कार्ये राज्यपातळीवरील राज्यविधीमंडळासारखे असतात. 

खालीलपैकी कोणते कलम केंद्रसरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानांशी संबंधित आहे ?

(1) कलम 270

(2) कलम 280

(3) कलम 275

(4) कलम 265

खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

(1) भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे.

(2) 42 व्या घटनादुरुस्तीन्वये ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द जोडण्यात आला.

(3) 42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली.

(4) भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्त्व रशियन (सोव्हिएट) राज्यघटनेतून पेठ आहेत.

खालील विधाने लक्षात घ्या

a) कलम 3 नुसार, संसद राज्यामधुन भुप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते.

(b) संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते.

(c) नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडतांना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. 

(d) असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधीमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारने बंधनकारक असते.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चिनचूक आहे/आहेत ?

(1) (a) offer (d)

(2) (a), (b) आणि (d) 

(3) (a). (b) आणि (c) 

(4) सर्व

खालील विधाने विचारात घ्या

(a) मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधान सभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. 

(b) मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये.

पर्यायी उत्तरे

(1) विधान (a) बरोबर

(2) विधान (b) बरोबर

(3) दोन्हीही विधाने बरोबर

(4) दोन्हीही विधाने चुकीची

जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे?

(1) 894

(2) 864

(3) 854

(4) 898

महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते?

(1) कळसूबाई 

(2) तोरणा

(3) साल्हेर

(4) घोडव

2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे ?

(1) अमरावती

(2) बीड

(3) जालना 

(4) नंदुरबार

(1) अमरावती – 83.1 

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते?

(1) वीर

(2) राधानगरी 

(3) कोयना

(4) खोपोली

जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे?

(1) औरंगाबाद

(2) जळगाव

(3) नांदेड

(4) यवतमाळ

खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता क्रम कोणता ?

(1) अंबोली, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान

(2) अंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा

(3) लोणावळा, अंबोली, महाबळेश्वर, माथेरान

(4) अंबोली, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर

महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला ‘विल्सन’ धरण आणि त्याच जलाशयाला ‘ऑर्थर’ सरोवर म्हणून संबोधले जाते?

(1) अप्पर वर्धा धरण

(2) लोअर वर्धा धरण

(3) ऊजणी धरण

(4) भंडारदरा धरण

आसाम येथे भारतातील सर्वात जास्त……. चे साठे उपलब्ध आहे.

(1) खनिज तेल

(2) लोह खनिज

(3) दगडी कोळसा

(4) वरीलपैकी नाही

खालील विधाने विचारात घ्या

(a) नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरीता कर्जाची सोय करून देते.

(b) नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्जपुरवठा करते.

(c) नाबार्ड शहरी उद्योगासाठी आर्थिक मदत करते.

(d) नावाई शहरी विकासासाठी आर्थिक मदत करते.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

(I) (a) फक्त

(2) (a) आणि (b)

(3) (a). (b) आणि (c)

(4) (a). (b) आणि (d)

समतोल अंदाजपत्रक म्हणजे :

(1) सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे.

(2) सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे. 

(3) सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे.

(4) वरीलपैकी एकही नाही.

ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते ?

(a) ब्राझील, रशिया भारत

(b) चीन, दक्षिण आफ्रीका

(c) जापान, जर्मनी, स्विझरलॅन्ड

(d) बेल्जियम, दक्षिण कोरीया

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

(1) फक्त (a)

(2) (a) आणि (b)

(3) (a) (b) आणि (c) 

(4) (a). (b) आणि (d)

कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते ?

(1) उज्ज्वला योजना

(2) सौभाग्य योजना

(3) जिवन ज्योती योजना

(4) जन-धन योजना

आयकरापासुन प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते ?

(1) राज्य सरकार

(2) केंद्र सरकार

(3) स्थानिक सरकार 

(4) केंद्रशासित प्रदेश

जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे ?

(1) सांस्कृतिक क्षेत्र

(2) पर्यटन क्षेत्र

(3) राजकीय क्षेत्र

(4) व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क

खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही?

(1) महामंडळ कर

(2) विक्री कर

(3) उत्पादन कर

(4) जकात कर

MPSC combine group C Answer key 2022


पोस्ट शेअर करा.

Leave a Comment