Nagpur Karar | नागपूर करार
महाराष्ट्राच्या निर्मिती वरून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये संभ्रम होता. संयुक्त महाराष्ट्राला समर्थन देणारे काँग्रेस व अन्य पक्षातील नेते एकत्र आले. डॉ. एस. एम. जोशी यांनी या सगळ्या विरोधी पक्षांचे नेतृत्व स्वीकारून संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापना केली.
संयुक्त महाराष्ट्रात ज्या ज्या विभागांना समावेश होणे गरजेचे आहे त्या त्या विभागातील प्रतिनिधींनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे हा विचार पुढे आला. त्यासाठी सप्टेंबर 1953 मध्ये सर्व प्रतिनिधी नागपूर येथे एकत्र आले. नागपूर येथील बैठकीत पूर्वीचा अकोला करार रद्द करून नागपूर करणार करण्यात आला.
28 सप्टेंबर 1953 मध्ये नागपूर करार झाला या कारणामुळे विशाल महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या आशा पल्लवीत झाल्या. धर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी नागपूर करारात महत्त्वाची भूमिका बजावली.
या करारादरम्यान संयुक्त महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या तिन्ही विभागातील खालील नेत्यांनी 28 सप्टेंबर 1953 रोजी नागपूर येथे एकत्र येऊन करारावर सह्या केल्या.
नागपूर करारावर स्वाक्षरी करणारे विभागनिहाय नेते
1. पश्चिम महाराष्ट्र- भाऊसाहेब हिरे,यशवंतराव चव्हाण, नाना कुंटे, देवकीनंदन नारायण.
2. महाविदर्भ- रा. कृ. पाटील,रामराव देशमुख,पंजाबराव देशमुख, शेषराव वानखेडे.
3.मराठवाडा – देवीसिंह चव्हाण, लक्ष्मण भाटकर,प्रभावतीदेवी जकातदार.
नागपूर करार
1.राज्याच्या पुनर्रचनेच्या संदर्भात विचार करण्यासाठी एक उच्च अधिकार समिती स्थापन केले जावे.
2. मुंबई मध्यप्रदेश,हैदराबाद प्रांतातील मराठी भाषिकांना एकत्र करून स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन करावं व त्याची राजधानी मुंबई असावी.
3.राज्यातील सरकारच्या प्रशासकीय सेवेसाठी राज्याचे तीन प्रशासकीय विभाग असावेत जसे महा विदर्भ व मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र असावा.
4. राज्याच्या उच्च न्यायालयाचे प्रमुख केंद्र मुंबई येथे असावे उपकेंद्र नागपूरला असावे.
5. राज्याच्या कायदेमंडळातील जनतेचे प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या प्रमाणात असावे.
6. शासकीय व निमशासकीय सेवेतील उमेदवारांची भरती करताना ती त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात करावी
नागपूर करारावर स्वाक्षरी करणारे विभागनिहाय नेते
1. पश्चिम महाराष्ट्र- भाऊसाहेब हिरे,यशवंतराव चव्हाण, नाना कुंटे, देवकीनंदन नारायण.
2. महाविदर्भ- रा कृ पाटील,रामराव देशमुख,पंजाबराव देशमुख, शेषराव वानखेडे.
3.मराठवाडा – देवीसिंह चव्हाण, लक्ष्मण भाटकर,प्रभावतीदेवी जकातदार.
नागपूर करारातील प्रमुख तरतुदी – (Major Provisions of the Nagpur Treaty)
- मुंबई मध्य प्रांत व हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषिकांचे एक राज्य म्हणून मुंबई ही त्यांची राजधानी बनवणे.
- या राज्याचे उच्च न्यायालय मुंबई व नागपुर येथे असावे.
- नागपूर ही नव्या राज्याची उपराजधानी करून दरवर्षी राज्य विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन येथे भरवावे.
- नव्या राज्यात समावेश करणारी खेडे हा घटक ग्राह्य मानावा.
- नागपूर करारानुसार भारतीय संविधानात 1956 च्या सातव्या घटनादुरुस्तीने कलम 371 (2)जोडण्यात आले.
नागपूर करारातील मुद्द्यांचा विचार करून डिसेंबर 1953 साली केंद्र सरकारने ठरवले की राज्याच्या पुनर्रचना करण्याकरिता ठोस असे काहीतरी केले पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून न्यायमूर्ती सय्यद फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1953 साली एक राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यात आला.
नागपूर करारामध्ये उल्लेख होता की एक उच्चाधिकार समिती स्थापन करावी आणि त्यामुळे काही ठिकाणी या समितीला उच्चाधिकार समिती असे देखील म्हटले जाते.
भारतामध्ये ज्या राज्यांची पुनर्रचना केली गेली ती पुनर्रचना 1953 मधे नेमलेल्या फाजल आली आयोगाच्या अहवालानुसार निर्माण केली होती. आणि भाषावार प्रांत रचना त्यावेळेस आपण विधीवत स्वीकारली होती. त्या आयोगाचा अहवाल जेव्हा पुढे आला ऑक्टोबर 1955 मध्ये त्यानंतर 1956 नंतर भाषावार प्रांतरचना आपल्याकडे लागू झाली.
भाषावार प्रांतरचना आधारावर देशभरामध्ये काही राज्यांची निर्मिती झाली पण महाराष्ट्र नावाचे एक मराठी भाषिक राज्य त्यावेळेस देखील निर्माण झाले नाही कारण महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न हा सुरुवात ती पासूनच गुंतागुंतीचे बनत गेलेला होता. नागपूर करार म्हणूनच महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा ठरतो.
नागपूर करार हा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमधील एक महत्त्वाचा करार होता असे आपण म्हणू शकतो. बदलत्या काळाच्या ओघात संयुक्त महाराष्ट्र मध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी होत असताना दिसून येते. वेगळ्या विदर्भाची मागणी मुख्यतः विकासाचा असमतोल या कारणांमुळे दिसून येते.
अपेक्षा आहे नागपुर करार विषयक महत्त्वाच्या बाबी तुम्हाला या लेखांमध्ये मिळाल्या असतील. याव्यतिरिक्त काही शंका असल्यास कमेंट मध्ये विचारू शकता. लेख आवडल्यास लिंक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!
आणखी पहा..
Rivers In India | भारतातील 10 प्रमुख नद्या
Maharashtra Police Bharti Book List
नागपूर करार केव्हा करण्यात आला?
नागपूर करार 28 सप्टेंबर 1953 मध्ये करण्यात आला.
नागपूर करारा वरती कोणी स्वाक्षरी केली?
नागपूर करारावर स्वाक्षरी करणारे विभागनिहाय नेते
पश्चिम महाराष्ट्र- भाऊसाहेब हिरे,यशवंतराव चव्हाण, नाना कुंटे, देवकीनंदन नारायण.
महाविदर्भ- रा कृ पाटील,रामराव देशमुख,पंजाबराव देशमुख, शेषराव वानखेडे.
मराठवाडा – देवीसिंह चव्हाण, लक्ष्मण भाटकर,प्रभावतीदेवी जकातदार.