Nivadnuk ayog Marathi Mahiti | भारतीय निवडणूक आयोग माहिती

Nivadnuk ayog Marathi Mahiti | Nivadnuk ayog information in Marathi

Election commission in Marathi-Nivadnuk ayog

Nivadnuk ayog – भारतातील निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोग सर्वोच्च संस्था आहे. ही संस्था घटनात्मक आहेत. घटनात्मक म्हणजे भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार स्थापन झालेली संस्था होय.

भारतीय राज्यघटनेने प्रातिनिधिक लोकशाहीचा पुरस्कार केलेला आहे. प्रातिनिधिक लोकशाही मध्ये लोकांना आपले प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून निवडून द्यावे लागतात. अशी निवडणूक घेण्याची जबाबदारी भारतीय राज्यघटनेचे कलम ३२४ अन्वये निवडणूक आयोगाला दिलेली आहे. हे निवडणूक आयोग केंद्र व राज्यांसाठी एकत्रितरीत्या कार्य करते. 

निवडणूक आयोग रचना | Nivadnuk ayog information in Marathi

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ मध्ये निवडणूक आयोगाच्या रचनेने संबंधित तरतुदी दिलेल्या आहेत.

१)निवडणूक आयोग खालील बाबींचे नियंत्रण पर्यवेक्षण व निर्देशन करेल.
संसद व राज्य विधान मंडळाच्या निवडणुका पार पाडणे मतदार याद्या तयार करणे.
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका पार पाडणे.

२) निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त व राष्ट्रपती निश्चित करतील एवढ्या संख्येचे अन्य निवडणूक आयुक्त यांचा बनलेला असेल. मुख्य निवडणूक आयुक्त व इतर आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती कडून केली जाईल.

३) मुख्य निवडणूक आयुक्त हा निवडणूक आयोगाचा अध्यक्ष म्हणून कार्य करेल.

४) निवडणूक आयोग प्रादेशिक आयुक्त देखील नियुक्त करू शकतील.

५) निवडणूक आयुक्त प्रादेशिक आयुक्त यांच्या सेवा शर्ती व पदावधी राष्ट्रपती नियमाद्वारे  निर्धारित केल्याप्रमाणे असतील.

६) राष्ट्रपती किंवा राज्यपाल निवडणूक आयोग किंवा प्रादेशिक आयुक्त यांना मदत करण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देईल.

१९५० मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली. १९८९ पर्यंत निवडणूक आयोगाने एक सदस्य आयोग म्हणून कार्य केले. यामध्ये फक्त मुख्य निवडणूक आयुक्त कार्यरत होते. 

१६ ऑक्टोबर १९८९ रोजी राष्ट्रपतींनी दोन अन्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली. मतदानाचे नागरिकांचे वय २१ वरुन १८ वर्षे असे असे करण्यात आल्यामुळे निवडणूक आयोग बहुसदस्यीय आयोग बनला. मात्र 1990 मध्ये पुन्हा निवडणूक आयोग एक सदस्य आयोग बनवण्यात आला.Nivadnuk ayog

१९९३ मध्ये राष्ट्रपतींनी पुन्हा दोन निवडणूक आयुक्तांची नेमणूक करून आयोगास बहुसदस्यीय आयोग बनविले आहे. तेव्हापासून आजपर्यंत निवडणूक आयोग हा बहुसदस्यीय आयोग म्हणून कार्यान्वित आहे. मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त यांना सारखेच अधिकार आहेत त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्यास बहुमताने निर्णय घेतला जातो.
निवडणूक आयुक्तांच्या सेवाशर्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश याप्रमाणे असल्याने त्यांचा पदावधी सहा वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षापर्यंत असतो.
निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींकडे राजीनामा देऊ शकतात.


निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य | Independence of Election Commission in Marathi


निवडणूक आयोगाला स्वातंत्र्य बहाल करण्याच्या दृष्टीने कलम ३२४ मध्ये पुढील तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.Nivadnuk ayog.
मुख्य निवडणूक आयुक्तांना पदाची सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने त्यांना केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश याप्रमाणेच पदावरून दूर करता येते.(संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने ठराव पारित केल्यासच) म्हणजे निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात मात्र ते राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करीत नाहीत. 

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती नंतर त्यांच्या सेवा शर्ती  मध्ये बदल करता येत नाही.
अन्य निवडणूक आयुक्त किंवा प्रादेशिक आयुक्त यांना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशींना पदावरून दूर करता येत नाही.

भारतीय घटनेमधील निवडणूक आयोगा संबंधित त्रुटी

  • १.निवडणूक आयोगाच्या सदस्यांसाठी कोणतीही पात्रता सांगितलेली नाही.
  • २.घटनेने पदावधी निश्चित केलेला नाही
  • ३.निवृत्त झालेल्या निवडणूक आयोगाच्या सदस्यांना निवृत्तीनंतर सरकारी नेमणुकी पासून प्रतिबंधित केले नाही.
निवडणूक आयोगाची अधिकार व कार्य
  • १.मतदार याद्या तयार करून वेळोवेळी त्या अद्ययावत करणे.
  • २.निवडणुकांच्या तारखा वेळापत्रक अधिसूचित करणे.
  • ३.निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी पाळावयाची आचारसहिता निश्चित करणे.
  • ४.राजकीय पक्षांना मान्यता देणे व त्यांना निवडणूक चिन्ह प्रदान करणे.
  • ५.राजकीय पक्षांच्या वादासंदर्भात न्यायालय म्हणून कार्य करणे.
  • ६.राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा राज्य पक्षाचा दर्जा प्रमाण प्रदान करणे.
  • ७.राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा राज्य पक्षाचा दर्जा प्रमाण प्रदान करणे.
  • ८.संसद सदस्यांच्या अपात्र ते शी संबंधित मुद्द्याबाबत राष्ट्रपतींना सल्ला देणे.
  • ९.राज्य विधान मंडळाच्या सदस्यांच्या अपात्र ते शी संबंधित मुद्दे याबाबत राज्यपालांना सल्ला देणे.
  • १०.निवडणुका पार पाडण्यासाठी आवश्यक कर्मचारी वर्गाची राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्याकडे मागणी करणे.
  • ११.राष्ट्रपती राजवट खाली असलेल्या राज्यात निवडणुका घेता येतील की नाही याबाबत राष्ट्रपतींना सल्ला देणे.
  • १२.देशातील मतदार संघाचे प्रादेशिक क्षेत्र निश्चित करणे तसेच त्यांची पुनर्रचना करणे.

भारतीय निवडणूक आयोग Nivadnuk ayog एक निवडणुकीबाबत सर्वोच्च संस्था आहे. लोकशाहीचे जतन करणारी व संवर्धन करणारी अशी प्रभावी संस्था आहे. सदर लेखांमध्ये भारतीय निवडणूक आयोग Nivadnuk ayog विषयी आपण सविस्तर माहिती घेतली.

Maharashtra common entrance test | MHT CET 2021

mpsc books list in marathi | mpsc exam 2021 book list

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “Nivadnuk ayog Marathi Mahiti | भारतीय निवडणूक आयोग माहिती”

Leave a Comment