पायाभूत संरचना – जल वाहतूक,बंदरे, सागरमाला प्रकल्प

जल वाहतूक,बंदरे, सागरमाला प्रकल्प,विमान वाहतूक – पायाभूत संरचना

पायाभूत संरचना

पायाभूत संरचना देशाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत घटकांना पायाभूत घटक म्हणतात. पायाभूत सुविधा देशाच्या आर्थिक सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पायाभूत सुविधा ही व्यापक संकल्पना आहे यामध्ये अनेक आर्थिक कार्यांचा समावेश होतो. पायाभूत सुविधा हा दोन प्रकारच्या असतात.

  • १) भौतिक पायाभूत सुविधा
  • २) सामाजिक पायाभूत सुविधा

१) भौतिक पायाभूत सुविधा – ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, व्यापार, बँकिंग, विमा, इंटरनेट, पोस्ट या सर्व सुविधांना भौतिक पायाभूत सुविधा असे म्हणतात.

२) सामाजिक पायाभूत सुविधा – शिक्षण, आरोग्य, पेयजल, सामाजिक सेवा, स्वच्छता या सुविधांचा समावेश सामाजिक पायाभूत सुविधा यामध्ये होतो.

पायाभूत संरचना – जल वाहतूक

पायाभूत संरचना

कमी खर्चाची वाहतूक व जास्त वजनाचा माल अधिक क्षमतेने वहन करण्यासाठी सागरी जलवाहतूक महत्वाची आहे.खर्चाचा विचार करता रस्ते मार्गाने प्रतिकिलोमीटर साठी १.५ रुपये खर्च येतो, लोहमार्गाने एक रुपये तर जलमार्गाने केवळ 20 पैसे येतो. देशाच्या परकीय व्यापार पैकी 95 टक्के व्यापार जलवाहतूक मार्गाने होतो. भारताकडे सर्वात मोठा व्यापारी जहाजांचा ताफा आहे. जगामध्ये याबाबत अठरावा क्रमांक लागतो. मार्च 2017 रोजी भारताकडे एकूण 1297 जहाजे होती. किनाऱ्याजवळील वाहतूक हा भारतीय वाहतुकीचा एक ऊर्जा कार्यक्षम, पर्यावरणवादी आणि स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे. 

बंदरे

भारताचा समुद्रकिनारा 7517 किलोमीटर लांबीचा आहे. यामध्ये 13 राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. या सागरी किनाऱ्याला 13 मोठी बंदरे व 200 लहान बंदरे कार्यरत आहेत. मोठ्या बंदरांचे विकास व प्रशासन केंद्र सरकार अंतर्गत असणाऱ्या पोर्ट ट्रस्ट द्वारे केले जाते तर लहान बंदरांचे प्रशासन राज्य सरकार मार्फत चालवले जाते. सर्वाधिक लहान बंदरे महाराष्ट्रात आहेत सर्वात मोठे लहान बंदर मुंद्रा गुजरात येथे आहे. सर्वाधिक माल वाहतूक गुजरातमधील कांडला या मोठ्या बंदरातून होते.देशातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट न्हावाशेवा बंदर आहे.

सागरमाला प्रकल्प 

बंदराच्या विकासासाठी सागरमाला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्रसरकारने राबवला आहे. ‘बंदर आधारित सुबत्ता’ असे या प्रकल्पाचे घोषवाक्‍य आहे. सागर माला प्रकल्पाचा उद्देश भारतीय बंदरांचा विकास करून त्यांची क्षमता वाढविणे हा आहे. सागर माला परीयोजनेचे चार घटक आहेत. यामध्ये बंदराचे आधुनिकीकरण, बंदर जोडणी वर्धन, बंदरलगत औद्योगीकरण, किनाऱ्या लगत सामुदायिक विकास.

सागरमाला प्रकल्प 

पायाभूत संरचना – सागरी प्रशिक्षण (Maritime Training)

सागरी प्रशिक्षणासाठी सरकारने चार प्रशिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत.

  • १)प्रशिक्षण जहाज चाणक्य, नवी मुंबई
  • २)मरीन इंजीनियरिंग अँड रीसर्च इन्स्टिट्यूट, कोलकाता
  • ३)मरीन इंजीनियरिंग अँड रीसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई
  • ४)एल बी एस कॉलेज ऑफ ऍडव्हान्स मेरीटाइम स्टडीज अँड रिसर्च, मुंबई

केंद्रीय शिपिंग मंत्रालयाने 14 नोव्हेंबर 2008 रोजी चेन्नई येथे केंद्रीय विद्यापीठ म्हणून भारतीय सागरी विद्यापीठाची स्थापना केली आहे.

अंतर्गत जलवाहतूक

नद्या, कालवे, बॅकवॉटर्स इत्यादीतून होणाऱ्या वाहतुकीस अंतर्गत जलवाहतूक म्हणतात. भारतात सुमारे 14 हजार किलोमीटर लांबीचे अंतर्गत जलमार्ग आहेत.अंतर्गत जल मार्गांच्या विकास आणि नियमनासाठी सरकारने भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरण ची स्थापना केली आहे.राष्ट्रीय जलमार्गभारतामध्ये पाच मार्गांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आले.
केंद्रीय अंतर्गत जलवाहतूक महामंडळ(Central inland water transport corporation)स्थापना 1997 मुख्यालय कोलकता गंगा, भागीरथी, हुगळी, ब्रह्मपुत्रा नद्या वरील अंतर्गत यांचे लोहमार्गावरून मालवाहतुकीच्या प्रत्यक्ष कार्यात कार्यरत संस्था आहे.

जल वाहतुकीचे प्रश्न

  • 1)जलवाहतूक क्षमता भारताचे गरजेपेक्षा खूप कमी आहे.
  • 2)जुन्या जहाजांना चालवण्यासाठी खूप खर्च येतो.
  • 3)परकीय देशांच्या जलवाहतुकीशी सतत स्पर्धा करावी लागते.
  • 4)बंदरावरती मालाची चढ-उतार करण्यास आधुनिक यंत्रणा नाही.

mpsc exam book list in marathi

पायाभूत संरचना – विमान वाहतूक

विमान वाहतूक जलद असली तरी खर्चिक आहे. यामध्ये अवजड वाहनांची वाहतूक करणे अवघड आहे. भारतात जुलै 1932 मध्ये टाटा एअरलाईन्स कंपनीने भारतातील पहिल्या विमान वाहतुकीची सुरुवात केली. जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांना भारतीय हवाई वाहतुकीचे जनक म्हणतात. 1946 मध्ये टाटा एअरलाइन्स चे नाव एअर इंडिया असे करण्यात आले.1948 मध्ये एअर इंडिया मधील 49 टक्के शेअर्स भारत सरकारने खरेदी केल्यामुळे इंडिया चे राष्ट्रीयीकरण झाले.

भारतीय विमानतळ प्राधिकरण(Airports authority of India AAI) – या प्राधिकरणाची स्थापना 1 एप्रिल 1995 रोजी झाली. विमानतळांचे नियोजन विकास बांधणी व देखभाल इत्यादी कार्य हे प्राधिकरण करते. हे प्राधिकरण पुढील प्रशिक्षण केंद्रे चालवते.

  • सिव्हिल एव्हिएशन ट्रेनिंग कॉलेज अलाहाबाद
  • नेशनल इंस्टीट्यूट ऑफ एविएशन मॅनेजमेंट अँड रिसर्च दिल्ली
  • फायर सर्विस ट्रेनिंग स्कूल नारायणपूर
  • फायर ट्रेनिंग सेंटर दिल्ली

विमान वाहतूक सेवा पुरवणाऱ्या कंपन्या

  • एअर इंडिया
  • इंडियन एअरलाइन्स
  • पवान हांस हेलिकॉप्टर लिमिटेड(पेट्रोलियम क्षेत्राला मदत पुरवण्यासाठी)
  • खाजगी विमान कंपन्या.

राष्ट्रीय एव्हिएशन प्रशिक्षण व व्यवस्थापन संस्था(National institute of aviation training and management)विमान देखभाल अभियांत्रिकी व इतर उडान विषयक प्रशिक्षणासाठी ही संस्था गोंदिया येथे स्थापन केली जात आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमीया संस्थेची स्थापना 1985मध्ये झाली. ही संस्था फुरसत गंज उत्तर प्रदेश येथे आहे. उच्च दर्जाचे वैमानिक प्रशिक्षण दिले जाते.
आंतरराष्ट्रीय विमानतळ

  • छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई
  • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली
  • नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोलकाता
  • चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ, चेन्नई
  • बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ, देवणाहल्ली, बंगलोर
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, शमशाबाद, हैदराबाद

या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळास सोबत एकूण 17 आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतात आहेत. 

पाणीपुरवठा

भारतामध्ये पर्जन्य वितरण असमान असल्यामुळे पाण्याचा प्रश्न कित्येक भागात निर्माण होतो. पाणीपुरवठा ही एक सामाजिक पायाभूत सुविधा (पायाभूत संरचना) आहे. केंद्र सरकारने 20 कलमी कार्यक्रम राष्ट्रीय किमान गरजा कार्यक्रम पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा संदर्भात राबवलेले आहेत. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत पेयजल पुरवठा विभाग पेयजलचा प्रश्न सोडवण्यासाठी विविध योजना राबवत असते.

गतीमान ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम खेडेगाव पेयजलाच्या योजना चालवण्यासाठी 1972/73 मध्ये राबविण्यात आला.1986 87 मध्ये पेयजल तंत्रज्ञान अभियान सुरू करण्यात आले. 1999 मध्ये पेयजल पुरवठा विभाग स्थापन करण्यात आला. 2010 मध्ये त्याचे नामकरण पेयजल व स्वच्छता विभाग असे करण्यात आले.2011 मध्ये या विभागाला स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला आहे.

स्वच्छता

स्वच्छता ही सुद्धा एक सामाजिक पायाभूत संरचना आहे. केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम 1986 मध्ये सुरू करण्यात आला. ग्रामीण गरिबांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.  संपूर्ण स्वच्छता अभियान 2002 मध्ये सुरू करण्यात आले केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाची पुनर्रचना करून संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाचा मुख्य उद्देश उघड्यावरील सरकारची पद्धत बंद करणे हा होता. या अभियानामुळे घरगुती सौचालय यांची संख्या वाढली.या अभियानाच्या यशस्वी प्रयत्नांमुळे निर्मल काम ग्राम अभियान सुरु करण्यात आले.या अंतर्गत निर्मल ग्राम पुरस्कार योजना 2003 पासून राबवली गेली.

2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली.ग्रामीण तसेच शहरी भागात स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्याचा एक व्यापक कार्यक्रम असून 2019 पर्यंत उघड्यावरील विसर्गा ची पद्धत पूर्णपणे थांबविणे हे त्याचे व्यापक उद्दिष्ट आहे. या अभियानाचे घोषवाक्य एक कदम स्वच्छता की ओर आहे.

Police Bharti 2021 guide

Talathi bharti 2021 – Maharashtra talathi – तलाठी भरती 2021

12 वी नंतर काय करावे? 12 vi nantar kay karave ?

Vice President of India,उपराष्ट्रपती

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment