भारताचे पंतप्रधान मराठी माहिती | Prime Minister Information in Marathi 2024

भारताचे पंतप्रधान हे भारतीय संसदीय व्यवस्थेचे शासन प्रमुख असतात.  भारताचे पंतप्रधान या विषयी सविस्तर चर्चा करू.

भारताच्या घटनेत कलम 74 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. राष्ट्रपति आपली कार्ये पार पाडताना त्या सल्ल्यानुसार वागेल.राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख आहेत तर पंतप्रधान हे शासन प्रमुख आहेत.

नियुक्ती – Prime Minister Information in Marathi

  • घटनांमध्ये पंतप्रधानांच्या निवडीसाठी नियुक्तीसाठी कोणतीही विशेष पद्धत सांगितलेली नाही. 
  • कलम 75 मध्ये केवळ एवढेच सांगण्यात आले आहे की राष्ट्रपती पंतप्रधान यांची नियुक्ती करतील.
  • राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करू शकतात मात्र संसदीय शासन पद्धती च्या संकेतांनुसार लोकसभेतील बहुमतातील पक्षाच्या नेत्यालाच पंतप्रधान म्हणून नियुक्त करावे लागते.

या निवडीबाबत पुढीलप्रमाणे राष्ट्रपती स्वेच्छाधिकाराचा वापर करू शकतात. 

जेव्हा लोकसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसते तेव्हा लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या किंवा युतीच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून शपथ देतात आणि एक महिन्याच्या आत लोकसभेत विश्वासाचा ठराव घेण्याचे सांगितले जाते. संबंधित व्यक्तीने हा ठराव जिंकला तर ते पंतप्रधान म्हणून कायम राहतो. अशा अधिकारांचा वापर राष्ट्रपतींनी पहिल्यांदाच 1979 मध्ये केला होता. मोरारजी देसाई सरकार पडल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी चरण सिंग यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले होते. 1980 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने असा निकाल दिला की एखाद्या व्यक्तीस पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यापूर्वी त्याने लोकसभेत आपले बहुमत सिद्ध करावेच अशी तरतूद घटनेमध्ये करण्यात आलेली नाही.

जेव्हा पंतप्रधानांचा पदावर असताना अचानक मृत्यू होतो व कोणताही स्पष्ट उत्तराधिकारी नसतो तेव्हासुद्धा राष्ट्रपती पंतप्रधानांची निवड नेमणूक करताना आपल्या वैयक्तिक स्वेच्छाधिकाराचा वापर करू शकतात.

घटनात्मकदृष्ट्या पंतप्रधान कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू शकतात.ब्रिटनमध्ये मात्र पंतप्रधान कनिष्ठ सभागृहाचा सदस्य असावा लागतो.

Prime Minister Information in Marathi- शपथ

पंतप्रधान आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती त्यांना वृत व गोपनीयतेची शपथ देतात. मात्र त्यांना केंद्रीय मंत्री म्हणूनच शपथ दिली जाते.

Prime Minister Information in Marathi – पदावधी

पंतप्रधानांचा कालावधी घटनेने निश्चित केलेला नाही पंतप्रधान आपले पद राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत धारण करतात. याचा अर्थ असा होत नाही राष्ट्रपती पंतप्रधानांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात. जोपर्यंत पंतप्रधानांना लोकसभेत बहुमत असते तोपर्यंत राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकत नाहीत.

Prime Minister Information in Marathi – पगार व भत्ते

पंतप्रधानांचे पगार व भत्ते संस्थेद्वारे कायद्याने वेळोवेळी निश्चित केल्या जातात.पंतप्रधानांना संसदेच्या सदस्य इतकाच पगार व भक्ती प्राप्त होतात त्याव्यतिरिक्त त्यांना खाजगी खर्च फक्त मोफत निवास प्रवास भत्ता वैद्यकीय बघता इत्यादी सुविधा मिळतात.

पंतप्रधानांचे अधिकार व कार्य

मंत्रिमंडळाच्या संदर्भात

  • केंद्रीय मंत्रिमंडळाचा नेता या नात्याने पंतप्रधानांना पुढील अधिकार असतात.
  • *केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्री राष्ट्रपती कडून पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून नियुक्त केले जातात. राष्ट्रपती केवळ अशाच व्यक्तीची नियुक्ती मंत्री म्हणून करू शकतो यांच्या नावाची शिफारस पंतप्रधानांनी केलेली असते.
  • *पंतप्रधान मंत्र्यांमध्ये खातेवाटप करतात आणि आवश्यकतेनुसार बदल करतात.
  • *पंतप्रधान एखाद्या मंत्र्याला राजीनामा देण्यास सांगू शकतात व त्याने राजीनामा दिला नाही तर राष्ट्रपतींना त्याला मंत्रिपदावरून दूर करण्याचा सल्ला देऊ शकतात.
  • *पंतप्रधान मंत्री मंडळाच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवतात
  • *पंतप्रधान सर्व मंत्र्यांच्या कृती कार्यांचे मार्गदर्शन दिशादर्शन समन्वयन घडवून आणतात. शासनाच्या धोरणांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर असते.
  • *पंतप्रधान राजीनामा देऊन मंत्रिमंडळाचा पाडाव घडवून आणू शकतात पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो.
  • *पंतप्रधानांचा राजीनामा किंवा मृत्यू यामुळे मंत्रीमंडळ विसर्जित होऊन राजकीय खंड किंवा पोकळी निर्माण होते.

राष्ट्रपतींच्या संदर्भात पंतप्रधानांची कार्य

  • पंतप्रधान हे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील संपर्काचे माध्यम आहेत. त्यानुसार कलम 70 मध्ये पंतप्रधानांची कार्य पुढील प्रमाणे सांगण्यात आली आहेत. *संघराज्याच्या कारभाराच्या प्रशासनाशी संबंधित मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय व विधानाची सर्व प्रस्ताव राष्ट्रपतींना कळविणे.
  • *संघराज्याच्या कारभाराचे प्रशासन व विधानाचे प्रस्ताव याबाबत राष्ट्रपती मागतील की माहिती ती पुरविणे. आणि ज्या बाबीवर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला आहे पण मंत्रिमंडळ त्याचा विचार केला नाही अशी कोणतीही बाब राष्ट्रपतीने आवश्यक केल्यास मंत्रिमंडळाच्या विचारार्थ सादर करणे.
  • पंतप्रधान राष्ट्रपतींना पुढील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी सल्ला देतात. भारताचे महान्यायवादी भारताचे लेखापाल, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, मुख्य व अन्य निवडणूक आयुक्त, वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य इत्यादी.

संसदेच्या संदर्भात पंतप्रधानांची कार्य

  • पंतप्रधान राष्ट्रपतींना संसदेचे अधिवेशन बोलवणे आणि स्थगित करणे याबाबत सल्ला देतात.
  • पंतप्रधान राष्ट्रपतींना केव्हाही लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला देऊ शकतात.
  • पंतप्रधान संशोधित सरकारी धोरणांची घोषणा करतात संसदेत चालणाऱ्या चर्चेत योग्य वेळी हस्तक्षेप करून शासनाची बाजू त्यांना मांडता येते.

Prime Minister Information in Marathi – इतर अधिकार व कार्य

  • पंतप्रधानांना पुढील आयोग व परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्य करावे लागते. निती आयोग, राष्ट्रीय एकात्मता परिषद, आंतरराज्य परिषद, राष्ट्रीय जलसंपदा परिषद.
  • पंतप्रधान देशाच्या परकीय धोरणाचा आकार देण्याचे महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
  • पंतप्रधान केंद्र सरकार चे प्रमुख प्रवक्ता म्हणून कार्य करतात.

पंतप्रधान पदाविषयी राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी पुढीलप्रमाणे वर्णन केलेले आहे. 

समानातील पहिला- लॉर्ड मोर्ले

शासन संस्थेच्या जहाजाचा कॅप्टन – मन्रो

भारताचे आतापर्यंतचे पंतप्रधान आणि त्यांचा कालावधी

Prime Minister Information in Marathi – list / list of indian prime minister

  • पंडित जवाहरलाल नेहरू – १९४७ ते १९६४
  • लाल बहादूर शास्त्री – १९६४ ते १९६६
  • इंदिरा गांधी – १९६६ ते १९७७
  • मोरारजी देसाई – १९७७ ते १९७९
  • चौधरी चरण सिंग – १९७९ ते १९८०
  • इंदिरा गांधी – १९८० १९८४
  • राजीव गांधी – १९८४ १९८९
  • v.p. सिंग – १९८९ १९९०
  • चंद्रशेखर – १९९० १९९१
  • पी. व्ही. नरसिंह राव – १९९१ ते १९९६
  • अटल बिहारी वाजपेयी – १९९६ ते १९९६
  • एच.डी. देवेगौडा – १९९६ ते १९९७
  • आय. के. गुजराल – १९९७ ते १९९८
  • अटल बिहारी वाजपेयी – १९९८ ते २००४
  • डॉ. मनमोहन सिंग – २००४ ते २०१४
  • नरेंद्र मोदी – २०१४ ते आज

Maharashtra Police Bharti 2021

UPSC information in Marathi । upsc 2021 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment