Questions on Fundamental Rights in Marathi | मूलभूत हक्क MCQ Quiz in मराठी

Questions on Fundamental Rights in Marathi | मूलभूत हक्क MCQ Quiz in मराठी

This previous year’s questions will give you an idea of questions. so that you will study properly. Questions on Fundamental Rights.

अ)भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याचा योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही.

ब)भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20 (2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही.

क)भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही.

वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर नाही? (S.S.2019)

a) अ

b) ब

c) क

d) वरीलपैकी एकही नाही

उत्तर – a) अ

  • कारण – कलम 21 मध्ये कायद्याच्या योग्य प्रक्रिये शिवाय (process of law) या शब्दाऐवजी विधीद्वारे स्थापित प्रक्रियेशिवाय(process established by law) हे शब्द आहेत.

2) घटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंध स्थानबद्ध ते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते?

a) दोन महिने

b) तीन महिने

c) चार महिने

d) सहा महिने

उत्तर – b) तीन महिने 

  • कारण – कलम 22 नुसार अंतर्गत सुरक्षा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सार्वजनिक सुव्यवस्था देशाची सुरक्षा व परराष्ट्र संबंध विषयक बाबी व संरक्षणासाठी संसदेला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.

3) खालीलपैकी कोणता हक्क भारतीय संविधानाचे मूलभूत हक्कात नाही? (STI 2012)

a) समानतेचा हक्क

b) स्वातंत्र्याचा हक्क

c) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क

d) मालमत्तेचा हक्क

उत्तर – d) मालमत्तेचा हक्क

  • कारण – संपत्तीचा हक्क 44 व्या घटनादुरुस्तीने 1978 मध्ये मूलभूत हक्काचे यादीतून वगळण्यात आला आणि तो भाग 12 मधील प्रकरण 4 मधील कलम 301 मध्ये टाकून एक कायदेशीर हक्क म्हणून घोषित करण्यात आला.

4) योग्य कथन/ कथने ओळखा.

अ) नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात.

ब) नागरिक राज्यांमध्ये सर्व राजकीय अधिकार यांचा उपभोग घेतात. 

क)परकीय व्यक्ती राज्यांमध्ये सर्व नागरी अधिकार यांचा उपभोग घेतात.

ड) परकीय व्यक्ती राज्यांमध्ये सर्व राजकीय अधिकार यांचा उपभोग घेतात.

A) फक्त अ, ब आणि क

B) फक्त अ, ब आणि ड

C) फक्त अ आणि ब

D) फक्त अ, क आणि ड

उत्तर – A) फक्त अ, ब आणि क

  • कारण – कलम 15, 16, 19, 29,30 मधील तरतुदी फक्त भारतीय नागरिकांना उपभोगण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीयांना राज्यांमध्ये सर्व राजकीय व नागरी अधिकार आहेत. परंतु परकीय व्यक्तींना कलम 15, 16, 19, 29 आणि 30 मधील राजकीय अधिकार उपभोगता येत नाहीत. Questions on Fundamental Rights.

5) भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे? (PSI 2016)

  1. कलम 21 सी
  2. कलम 21 ए
  3. कलम 51 ए
  4. कलम 25 सी

उत्तर – कलम 21 सी

  • कारण – 86 वी घटनादुरुस्ती 2002 नुसार 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आली.या घटनादुरुस्तीने कलम 21 A समाविष्ट केले तसेच मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 45 मध्ये सहा वर्षापर्यंतच्या बालकांचे संगोपन करणे व शिक्षण देणे यासाठी राज्य प्रयत्न करेल असा बदल करण्यात आला. कलम 21 A नुसार संसदेने बालकांचा निशुल्क व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 संमत केला 2009 चा कायदा 1 एप्रिल 2010 पासून अमलात आला.

6) न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत खालील विधाने विचारात घ्या.

  1. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे विधिमंडळाने केलेल्या कायद्याची आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यकारी आदेशांचे घटनात्मक तपासून पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार.
  2. संघराज्य समतोलपणा साधने आणि राज्यघटनेची सर्वोच्चता या तत्वाचे रक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्विलोकन याचे उद्दिष्ट असते.
  3. कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीपेक्षा कायद्याचे योग्य पद्धत हे तत्व सर्वोच्च न्यायालयाची नागरिकांचे मूलभूत हक्क रक्षणासाठी अधिक व्याप्ती वाढते.

वरील पैकी कोणते/ कोणती विधान /विधाने बरोबर आहे/ आहेत?

  1. फक्त A
  2. फक्त A आणि ब
  3. वरील सर्व
  4. वरीलपैकी एकही नाही.

उत्तर – C

  • कारण – भारतीय राज्यघटनेच्या कलम 13 नुसार न्यायालयीन पुनर्विलोकन दिले आहे.
  • न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे विधिमंडळाने केलेल्या कायद्याची आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यकारी आदेशांचे घटनात्मक तपासून पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार.
  • संघराज्य समतोलपणा साधने आणि राज्यघटनेची सर्वोच्चता या तत्वाचे रक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्विलोकन याचे उद्दिष्ट असते.
  • कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीपेक्षा( process established by law)कायद्याची योग्य पद्धत (due process of law) तत्व सर्वोच्च न्यायालयाची नागरिकांचे मूलभूत हक्क रक्षणासाठी अधिक व्याप्ती वाढते.
  • कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीमध्ये कायदा करण्याची पद्धत योग्य रीतीने झालेली आहे.एवढेच पाहिले जाते हे तत्त्व जपानच्या राज्यघटनेमध्ये नमूद आहे त्यामुळे जरी एखाद्या कायद्याचा हेतू उद्देश चुकीचा असला तरी तू कायदा घटनाबाह्य ठरत नाही परंतु कायद्याची योग्य पद्धत यामध्ये हेतू उद्देश चुकीचा असेल तर तो कायदा रद्द केला जातो त्यामुळे या पद्धतीने मूलभूत हक्काचे संरक्षणाची व्यक्ती वाढते हे तत्व अमेरिकन घटनेपासून घेण्यात आलेले आहे.Questions on Fundamental Rights.

7) मूलभूत अधिकारातील खाजगीपणा चा अधिकार कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे?(ASO2017)

  1. जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार
  2. समानतेचा अधिकार
  3. शोषणाविरुद्धचा अधिकार
  4. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार

उत्तर – A

  • कारण – कलम 21 मध्ये जीवनाचा व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार या मूलभूत अधिकारात खाजगी जीवनाचा अधिकार समाविष्ट आहे.

8) खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषणे व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19 (1)(A)वाजवी बंधने घालू शकते? (Combine 2018)

  • अ) न्यायालयाचा अवमान 
  • ब)अल्पसंख्यांकाचा चे संरक्षण 
  • क) परदेशांशी मित्रत्वाचे संबंध 
  • ड)भारताचे सार्वभौमत्व अखंडत्व 
  • ई)सभ्यता अथवा नीतिमत्ता
  1. अ ब क इ
  2. बकड
  3. अकड इ
  4. वरील सर्व

उत्तर – 3

  • कारण – कलम 19 1 ए भाषण व अभिव्यक्ती अथवा मत प्रदर्शनाचे स्वतंत्र.

भाषण आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुढील बाबींचा समावेश केला आहे.

  • स्वतःच्या किंवा इतरांच्या दृष्टीकोनाचा प्रचार करण्याचा हक्क 
  • वृत्तपत्र स्वातंत्र्य 
  • व्यवसायिक जाहिरातींचे स्वातंत्र्य 
  • दूरध्वनीवरील संभाषण ऐकण्या विरोधातील हक्क 
  • प्रसारण करण्याचा हक्क म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यमावर शासनाची मक्तेदारी असणार नाही 
  • राजकीय पक्ष किंवा संघटनेने आवाहन केल्यास बंद विरोधात हक्क 
  • शासनाच्या कृतींची उपक्रमांची माहिती घेण्याचा हक्क *शांततेचे स्वातंत्र्य 
  • वर्तमानपत्रावर मुद्रण पूर्व निर्बंध लादण्यात विरोधातील 
  • निदर्शने किंवा निरोधन करण्याचा हक्क मात्र संप करण्याचा हक्क नाही.
  • कलम 19 (2) मध्ये कलम 19 (1)(A) वरील स्वातंत्र्यावरील बंधने देण्यात आले आहेत. यामध्ये न्यायालयाचा अवमान, सभ्यता, नैतिकता, भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व, परदेशांशी मैत्रीत्वाचे संबंध या बाबींचा समावेश होतो.Questions on Fundamental Rights.

Questions on Fundamental Rights will give you hint to study. This part of Indian polity gives you surety of marks.

Previous Years Questions of various MPSC exam

MPSC exam question | PSI/STI/ASO

MPSC Exam Book List In Marathi

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment