Reference Books for Competitive Exam in Maharashtra.
विविध सरळ सेवा परीक्षेसाठी दर्जेदार संदर्भ पुस्तके पुढील प्रमाणे आहेत. सदर संदर्भ पुस्तकांचा वापर महाराष्ट्र राज्य मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा जसेकी तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक भरती, पशुसंवर्धन विभाग भरती, एमआयडीसी परीक्षा, एसटी महामंडळ, अशा विविध परीक्षे सोबतच एमपीएससी अंतर्गत होणाऱ्या विविध परीक्षेसाठी ही पुस्तके उपयुक्त आहेत.
दिलेल्या संदर्भ पुस्तकाला प्रमाणित मानून महाराष्ट्रामध्ये विविध परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण भरपूर आहे. म्हणून दिलेली पुस्तके संदर्भित व विश्वसनीय मानून तुम्ही त्याचा सखोल अभ्यास करू शकता.
महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी असे आहेत की कोणत्याही ठिकाणी क्लास न लावता स्वतःचा अभ्यास स्वतः करतात. अशा विद्यार्थ्यांना तर ही गुरुकिल्ली आहे.
ही पुस्तके तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता त्यासाठी दिलेल्या पुस्तकावरती फक्त क्लिक करून आपली मागणी नोंदवू शकता.
आता क्लास न लावता महाराष्ट्रातील सर्व परिक्षांची तयारी तुम्ही घर बसल्या करू शकता.
Reference Books for Competitive Exam
मराठी – सुगम मराठी व्याकरण व लेखन (मो. रा. वाळिंबे)
अंकगणित – संपूर्ण गणित (पंढरीनाथ राणे)
बुद्धिमत्ता – समग्र बुद्धिमत्ता चाचणी (फिरोज पठाण)
सामान्य ज्ञान – तात्यांचा ठोकळा
इंग्रजी व्याकरण
मार्गदर्शक पुस्तकांच्या सोबत स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने प्रश्नांचा सराव असणे गरजेचे असते. यासाठी एखादी सराव संच वापरणे व त्याचा नियमित सराव करणे हे स्पर्धा परीक्षा तयारीतील यशाचे गमक आहे.
यासाठी सराव प्रश्नपत्रिका संच येथे तुम्हाला मिळेल. सराव संग्रह – क्लिक करा.
कोणत्याही सरळसेवा परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे बेसिक विषय असतातच. म्हणून या विषयांसाठी वरीलप्रमाणे पुस्तकांचा वापर करणे यशदायी ठरू शकते. किंबहुना महाराष्ट्रातील बऱ्याच यशस्वी विद्यार्थ्यांच्या अनुभवातून स्वतःचा दर्जा वरील पुस्तकांनी सिद्ध करुन दाखवलेला आहे. म्हणूनच वरील पुस्तके आम्ही मार्गदर्शक म्हणून आपल्यासाठी सुचवू इच्छितो.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी दिलेली ही बेसिक पुस्तकांची सूची Reference Books for Competitive Exam मार्गदर्शक ठरेल.
आणखी वाचनीय लेख पुढील प्रमाणे….
Saralseva questions for exam preparation
UPSC information in Marathi । upsc 2022| कलेक्टर होण्यासाठी काय करावे
बँकेत नोकरी करण्यासाठी कोणता अभ्यास करा लागतो.
पि ओ,स ओ, क्लार्क,बँक मेनेजर