Rivers in Maharashtra in Marathi | महाराष्ट्रातील नद्या, प्रमुख 3 नद्यांसह

List of Rivers in Maharashtra in Marathi | Longest River in Maharashtra in Marathi

rivers in maharashtra
Rivers in Maharashtra

महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे. महाराष्ट्रात नद्यांचे दोन प्रकार पडतात. पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या. 

पूर्ववाहिनी नद्या पेक्षा पश्चिम वाहिनी नद्यांचे जाळे महाराष्ट्रामध्ये विस्तृत आहे.  पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त भूक्षेत्र व्यापून घेतात. 

 पूर्व वाहिनी नद्या (Rivers in Maharashtra)-

गोदावरी, भीमा, कृष्णा या महाराष्ट्रातील प्रमुख पूर्व वाहिनी नद्या आहेत. 

 गोदावरी नदी

 महाराष्ट्रातील गोदावरी नदी, ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे.  दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी असल्यामुळे गोदावरीला ‘दक्षिणगंगा’ असे देखील म्हटले जाते.  गोदावरी नदी सह्याद्री पर्वतापासून ते पूर्व घाटापर्यंत दख्खनच्या पठारावर वाहते.  महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधून गोदावरी नदी वाहते.  गोदावरी नदीचा उल्लेख भारतीय पुराणग्रंथ महाभारत मध्ये देखील आढळतो.  या ग्रंथांमध्ये गोदावरी चा उल्लेख सप्त गोदावरी असे केला गेला आहे. 

गोदावरी काठावर हिंदू धर्मांचा सिंहस्थ कुंभमेळा नाशिक मध्ये दर बारा वर्षांनी भरतो. गोदावरी नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी असे देखील म्हटले जाते. त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वतामध्ये गोदावरी नदीचा उगम होतो. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे.

Longest River In Maharashtra ?

गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. Godavari is longest river in Maharashtra.

महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या दोन राज्य मधून ही नदी वाहते.  गोदावरी नदीची लांबी ६६८ किलोमीटर आहे. गोदावरी नदीचे खोरे महाराष्ट्रातील ४९ टक्के क्षेत्र व्यापले गेले आहे.

भारतातील पहिले मातीचे धरण गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यामध्ये बांधले गेले आहे.  गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प हा औरंगाबाद जिल्ह्यामधील एक महत्त्वाचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे.  पैठण मध्ये असणाऱ्या या प्रकल्पाच्या जलाशयास ‘नाथ सागर’ या नावाने ओळखले जाते. 

गोदावरी नदीच्या काठावर पैठण, राक्षसभुवन, नाशिक, कोपरगाव, गंगाखेड, नांदेड, यासारखी महत्त्वाची शहरे वसलेली आहेत. सिंदफणा, पैनगंगा, दारणा, काटेपूर्णा, कुंडलिका, पूर्णा, इत्यादी नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. Rivers in maharashtra.

 भीमा नदी

 महाराष्ट्रातील भीमा नदीची एकूण लांबी 451 किलोमीटर एवढी आहे. महाराष्ट्रामध्ये सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, बीड, अहमदनगर ही शहरे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतात.  भीमा नदी श्री कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे कर्नाटक राज्यामध्ये भीमा नदी ही रायचूर जवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते.

भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. मुळा,मुठा, भोगावती, घोड, सोन, निरा, भामा, इंद्रायणी, मान, वेळ इत्यादी नद्या या भीमा नदीच्या उपनद्या आहेत.  सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर उजनी धरण बांधले आहे. या धरणातील जलाशयास ‘यशवंत सागर’ या नावाने ओळखतात. भीमा नदीचा प्रवाह प्रथमतः सुरुवातीस पूर्वेस आणि नंतर आग्नेयेस आहे. 

 कृष्णा नदी

 कृष्णा नदी ही  महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यातून वाहते.  कृष्णा नदीची एकूण लांबी १४०० किलोमीटर एवढी आहे.  महाराष्ट्रातील लांबी २८२ किलोमीटर आहे.  म्हणजे कृष्णा नदीच्या एकूण लांबी पेक्षा खूप कमी भाग महाराष्ट्रामध्ये आहे.  कृष्णा नदी ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहते. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो.  कृष्णा नदीचा प्रवाह पश्चिमेकडून दक्षिणेकडे आहे. कृष्णा नदीच्या काठावर नरसोबाची वाडी, सांगली, औदुंबर, कराड, मिरज, वाई, इत्यादी शहरे आहेत. दुधगंगा, पंचगंगा, वेदगंगा, वारणा, कोयना, घटप्रभा, येरळा, नंदला या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. 

 पश्चिम वाहिनी नद्या Rivers in Maharashtra

 महाराष्ट्रामध्ये पश्चिम वाहिनी नद्यांचे जाळे विस्तृत नसले तरी त्याची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे.  पश्चिम वाहिनी नद्या मध्ये तीन महत्त्वाच्या नद्या महाराष्ट्रातून वाहतात त्या म्हणजे पूर्णा नदी, नर्मदा नदी आणि तापी नदी होय.

 नर्मदा नदी

 पश्चिम वाहिनी नद्या तील सर्वात मोठी नदी म्हणजे नर्मदा नदी.  नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेत मध्ये अमरकंटक येथे होतो या नदीची एकूण लांबी १२९० किलो मीटर आहे. यापैकी नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी फक्त५४ किलोमीटर इतकी आहे.  नर्मदा नदी तापी नदी ही अक्राणी टेकड्या मुळे वेगळ्या झालेल्या आहेत. सरदार सरोवर प्रकल्प हा नर्मदा  नदीवर बांधण्यात आलेला महत्वपूर्ण प्रकल्प आहे. नर्मदा नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडून वाहते पुढे वाहत जाऊन गुजरात राज्य मधून अरबी समुद्रास जाऊन मिळते. 

 तापी नदी

 तापी नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी दुसरी महत्त्वाची नदी आहे सातमाळा डोंगर व उत्तरेकडील सातपुडा पर्वत यांच्या मधून वाहणारी तापी नदी आहे.  महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमधून तापी नदी वाहते. तापी नदीने उत्तर महाराष्ट्राचा भाग व्यापला आहे. मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वत रांगेत मुलताई व बैतूल येथे तापी नदीचा उगम होतो.  अमरावती, अकोला, धुळे, बुलढाणा, नंदुरबार, वाशिम, जळगाव ही महाराष्ट्रातील महत्वाचे जिल्हे आहेत जे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये येतात.  भुलेश्वरी, पूर्णा,नळगंगा, मोरणा, गिरणा, शहानूर, पांजरा, नंदवान, हे तापी नदीच्या उपनद्या आहेत. 

 पूर्णा नदी

पूर्णा नदी ही धुळे-नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातून वाहते.  पूर्णा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. तापी व पूर्णा या नद्या जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे संगम करतात. 

 कोकणातील महत्त्वाच्या नद्या Rivers in Maharashtra

सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा जलविभाजक आहे. महाराष्ट्र मध्ये होणारे पाण्याचे वितरण हे या सह्याद्री पर्वतरांग यावर अवलंबून आहे.  सह्याद्री पर्वत रांगेच्या पश्चिमेकडील भागाला कोकण म्हणून ओळखले जाते.  कोकणातील नद्या rivers in Maharashtra Konkan या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. 

  उल्हास नदी ही कोकणातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते.  बोर घाट येथे या उल्हास नदीचा उगम होतो उल्हास नदीची लांबी 130 किलोमीटर आहे. 

 तेरेखोल ही कोकणातील किंवा दक्षिण कोकणातील महत्त्वाची नदी आहे असे म्हणता येईल. याशिवाय दमणगंगा, काजळी, सावित्री, शास्त्री, वशिष्ठी, दमणगंगा, वैतरणा, सूर्या, आंबा या कोकणातील महत्त्वाच्या नद्या आहेत. Rivers in Maharashtra

Maharashtra – भारतातील एक प्रगत व पुरोगामी राज्य

महाराष्ट्रातील एकूण जिल्हे व त्यांची निर्मिती Maharashtratil Jilhe latest 2021

FAQ

Longest River In Maharashtra ?

Godavari is longest river in Maharashtra.

कृष्णा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते?

कृष्णा नदी सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातून वाहते. पुढे ती कर्नाटकामध्ये प्रवेश करते.

कृष्णा नदी उगम स्थान कोणते?

कृष्णा नदी उगम स्थान महाबळेश्वर हे आहे.

कृष्णा नदी किती राज्यातून वाहते?

कृष्णा नदी तीन राज्यांमधून वाहते. महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश.

उल्हास नदीचा उगम कोठे होतो?

बोर घाट येथे या उल्हास नदीचा उगम होतो.

महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख जलविभाजक कोण आहे?

महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख जलविभाजक सह्याद्री पर्वत आहे. संगीत

गोदावरी नदीची लांबी किती?

गोदावरी नदीची लांबी ६६८ किलोमीटर आहे.

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “Rivers in Maharashtra in Marathi | महाराष्ट्रातील नद्या, प्रमुख 3 नद्यांसह”

Leave a Comment