SAARC Full Form सार्क संघटना

पोस्ट शेअर करा.

सार्क (SAARC) सार्क म्हणजे काय? Saarc Full Form

saarc full form
Saarc Full Form

सार्क संघटना ही दक्षिण आशियाई देशांची प्रादेशिक सहयोग संघटना आहे.सहयोग म्हणजेच सहकार किंवा सहकार्य होय. याचा अर्थ असा होतो की एकमेकांना सहाय्य करणे.

याचे स्पष्टीकरण देण्याचे कारण असे की बऱ्याच ठिकाणी सहयोग दिसेल, सहकार दिसेल किंवा सहकार्य दिसेल. या सर्वांचा अर्थ एकच होतो.

SAARC FULL FORMSouth Asian Association for Regional Cooperation 

SAARC Full Form In Marathi

सार्क विस्तृत रूप – दक्षिण आशियाई प्रादेशिक सहयोग संघटना 

सार्क संघटना ही प्रादेशिक सहयोग संघटना असल्याने यामधील सहभागी देश एकमेकांना सहकार्य करतील.  सार्क एक आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि राजकीय सहयोगी संघटना आहे.

 सार्क संघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी –  

दक्षिण आशियाई देशांना एकत्रितपणे व्यापार व सहकार्य करण्याच्या उद्देशाने एक संघटनेची आवश्यकता 1970 च्या दशकात भासू लागली. दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करण्याच्या उद्देशाने या संघटनेचा उगम झाला.सार्क संघटनेच्या स्थापनेमध्ये तत्कालीन बांगलादेशचे अध्यक्ष जनरल इर्शाद यांनी पुढाकार घेतला होता. 

 सार्कची स्थापना कधी झाली?

8 डिसेंबर 1985 रोजी सार्क संघटनेची स्थापना बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाली.सुरुवातीला सार्क संघटनेच्या स्थापनेमध्ये सात देश होते.भारत,बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान, भूतान आणि नेपाळ हे सार्क घटनेचे प्रारंभिक सदस्य होते.यांनाच आपण संस्थापक सदस्य देखील म्हणू शकतो. 

 सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? 

सार्क संघटनेची स्थापना जरी बांगलादेश मध्ये झालेली असली तरी सार्क संघटनेचे मुख्यालय मात्र काठमांडू येथे आहे.काठमांडू ही नेपाळ देशाची राजधानी आहे.

सार्क संघटनेमध्ये किती देश आहेत? SAARC countries

सार्क संघटनेच्या स्थापनेत उपरोक्त सात देशांचा सहभाग होता. मात्र सन 2007 मध्ये आठव्या राष्ट्राची भर पडली.सार्क संघटने मधील आठवे राष्ट्र दुसरे तिसरे कोणते नसून अफगाणिस्तान हे आहे. 

 सार्क देश 

अनुक्रमांकदेश
1) भारत
2)बांगलादेश
3)पाकिस्तान
4)नेपाळ
5)  भूतान
6)मालदीव
7)श्रीलंका
8)अफगाणिस्तान (2007  पासून)
saarc countries

सार्क संघटनेची उद्दिष्टे 

  • दक्षिण आशियाई राष्ट्रांतील लोकांच्या जीवनमानाचा दर्जा  सुधारणे. 
  • दक्षिण आशियातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाला चालना देणे. 
  • दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये परस्पर सहकार्यातून स्वावलंबीत्त्व निर्माण करणे.
  • परस्परांमध्ये विश्वास निर्माण करून एकमेकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देणे. 
  • आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, तांत्रिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात सक्रिय सहकार्य आणि परस्पर मदतीला प्रोत्साहन देणे. 
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्परातील सहकार्य मजबूत बनवणे.

 सार्कची तत्वे – 

  1. सदस्य राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आदर करणे. 
  2. सदस्य राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे.
  3. एकमेकांच्या लाभासाठी सहकार्य करणे.

सार्कचे सहकार क्षेत्र कोणते?

1)  शेती 

2) पर्यटन 

3) शिक्षण 

4) व्यापार 

5) ऊर्जा

 म्हणजेच सार्क संघटना वरील विषयांना अनुसरून एकमेकांना सहाय्य करू शकतात. दुसरा प्रश्न मनात असा निर्माण होतो की वरील विषय या व्यतिरिक्त इतर विषयांना सहकार्य करत नाहीत का?  तर तसे बंधन नाही मात्र द्विराष्ट्रीय संबंधावरून ते निर्धारित होत असते. 

उदाहरणार्थ भारत-पाकिस्तान यांचे संबंध नेहमीच ताणलेले किंवा तणावपूर्ण असतात. अशा वेळी एकमेकांच्या सहकार्याची अपेक्षा फोल ठरते.  

 सार्क संघटनेपुढे असणाऱ्या समस्या?

1)सार्क संघटनेपुढे असणाऱ्या समस्या पैकी दारिद्र्य ही सर्वात मोठी समस्या आहे. 

2)नैसर्गिक आपत्ती –  सदस्य राष्ट्रांना भेडसावणाऱ्या समस्या पैकी दुष्काळ, महापूर, त्सुनामी, भूकंप यासारख्या काही महत्त्वाच्या नैसर्गिक समस्या आहेत.

3) विविध राष्ट्रांमध्ये असणारी दहशतवादाची समस्या

 सदर लेखामधून सार्क संघटनेचा सांगोपांग आढावा घेण्यात आलेला आहे. अपेक्षा आहे की आपल्या प्रश्नांची उत्तरे या लेखांमधून मिळाली असतील. 

 नसल्यास खाली कमेंट करून विचारू शकता.  इथपर्यंत लेख वाचल्याबद्दल आम्ही आपले अगदी मनापासून आभारी आहोत. सदर लेखाची लिंक शेअर करून सहकार्य करा  ही नम्र विनंती. 

आणखी वाचा…. 

भारतातील सर्वात उंच | सर्वात लांब | सर्वात पहिले | bhartatil sarvat unch

UPSC information in Marathi


पोस्ट शेअर करा.

Leave a Comment