सेवा क्षेत्र – सेवांचे वर्गीकरण,सेवा आणि परकीय गुंतवणूक Service Sector Basic

अर्थव्यवस्था आणि सेवा क्षेत्र

सेवाक्षेत्र – अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रीय रचनेतील तिसरे क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र होय.आर्थिक सेवा म्हणजे एक व्यक्ती किंवा संस्थेने दुसऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दिलेली सेवा याचा मोबदला दिला किंवा घेतला जातो. सेवा क्षेत्रामध्ये अशा आर्थिक कृतींचा समावेश असतो ज्या वस्तूंचे उत्पादन करत नाहीत मात्र उत्पादनासाठी व वस्तूंच्या वितरणासाठी मदत करीत असतात. उदा. वाहतूक, व्यापार, दळणवळण, बँकिंग, पोस्ट इत्यादी.

सेवा क्षेत्रांमध्ये वस्तूंच्या उत्पादनात मदत सेवाक्षेत्र करीत असले तरी इतर व्यवसायिक, प्रशासकीय, वैयक्तिक सेवा यांचा समावेश सुद्धा सेवा क्षेत्रात होतो. शिक्षक, वकील, डॉक्टर, धोबी, हॉटेल, इंटरनेट कॅफे, कॉल सेंटर, एटीएम अशा प्रकारच्या इतर सेवा आहेत. सेवा क्षेत्र हे व्यापक क्षेत्र असून यामध्ये आधुनिक व प्रगत सेवांचा सुद्धा समावेश होतो. 

सेवा क्षेत्राचे महत्व

कोणत्याही देशाच्या पायाभूत सुविधा या मूलभूत सेवा आहेत असं म्हणता येईल. विकसनशील राष्ट्रात अश्या मूलभूत सुविधा, सेवा पुरवण्याची जबाबदारी सरकारला पार पाडावी लागते. यामध्ये वाहतूक, प्रशासकीय कार्यालय, पोलिस स्टेशन्स, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, विमा कंपन्या यांचा समावेश होतो. प्राथमिक, द्वितीयक म्हणजे उद्योग क्षेत्राचा जसजसा विकास होत जातो तसतसे सेवांचा विकास ही आवश्यक असतो. किंबहुना औद्योगिक विकासासाठी सेवा पूरक असतात. म्हणून औद्योगिक विकासाबरोबर सेवांचा विकासही आवश्यक असतो.

सेवांचे वर्गीकरण

केंद्रीय सांख्यिकीय संघटनेच्या वर्गीकरणानुसार सेवांचे चार गट पुढीलप्रमाणे

  • 1) व्यापार सेवा –
  • 2) वाहतूक सेवा –
  • 3) व्यवसाय सेवा –
  • 4) सामुदायिक सेवा –

जागतिक व्यापार संघटनेने प्रसारित केलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये जागतिक जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 65.1% होता. जगातील प्रमुख देशांपैकी भारताचा जीडीपी बाबत सातवा क्रमांक होता मात्र सेवा जीडीपीमध्ये 13 वा क्रमांक होता. एकूण जीडीपी तील भारताचा सेवा क्षेत्राचा वाटा 2017 च्या आकडेवारीनुसार 48.9%  होता. आर्थिक पाहणी अहवाल 2017 18 मध्ये सेवा क्षेत्राबाबत पुढील माहिती दिलेली होती. संयुक्त राष्ट्राच्या नॅशनल अकाउंट स्टेटसटिक्स डाटा (national accounts statistics data) नुसार 2016  मध्ये जगातील सेवा क्षेत्राचा वृद्धीदर सर्वाधिक भारताचा (7.8%) त्यानंतर चीनचा (7.4%) होता.  CSO च्या 2018 अहवालानुसार सेवाक्षेत्राचा वृद्धीदर 7.9%  होता. 

सेवा क्षेत्र
सेवा क्षेत्र

भारताच्या जीडीपीमध्ये सेवाक्षेत्राचा वाटा 1950 51 मधे 30 टक्के होता तो 2016 17 मध्ये 53. 77 टक्के झाला. यावरून लक्षात येते भारताच्या जीडीपी मधील सेवा क्षेत्राचा वाटा वाढलेला आहे.देशाच्या एकूण जीडीपीच्या वार्षिक वाढीच्या दरापेक्षा सेवा क्षेत्राचा जीडीपी सतत वाढतच राहिलेला आहे.सेवा क्षेत्रापैकी सर्वाधिक वाटा व्यापार सेवांचा राहिलेला आहे.

देशातील राज्यांचा विचार करता चंदीगड, दिल्ली ,केरळ आणि महाराष्ट्र या चार राज्यांचा क्रमांक सेवा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. रोजगारातील सेवा क्षेत्राचा विचार करता प्राथमिक क्षेत्र रोजगार पुरवणारे मोठे क्षेत्र असले तरी त्यानंतर सेवाक्षेत्राचा क्रमांक लागतो. 

सेवा आणि परकीय गुंतवणूक

भारतात आलेल्या परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीत सर्वाधिक हिस्सा असलेली पहिली पाच सेवाक्षेत्र पुढील प्रमाणे१) वित्तीय व गैरवित्तीय सेवा – 18% २) सॉफ्टवेअर सेवा – 8% ३) दूरसंचार सेवा – 8% ४) बांधकाम विकास – 7% ५) व्यापार – 5% सर्वाधिक गुंतवणूक मॉरिशस या देशाकडून झाली तर त्यासोबत सिंगापूर, युनायटेड किंगडम, यूएसए व जपान या देशांचा क्रमांक लागतो.

सेवांची निर्यात भारतात मोठ्या प्रमाणात सेवांची निर्यात होत आहे.वस्तूंच्या निर्यातीपेक्षा सेवांच्या निर्यातीचा वृद्धीदर जास्त आहे. निर्यातीमध्ये सॉफ्टवेर सेवांचा पहिला क्रमांक लागतो त्यासोबत व्यवसाय सेवा व वाहतूक सेवा यांचा क्रमांक लागतो.

Service Sector Report of INDIA

रिझर्व बँक ऑफ इंडिया – भारताची मध्यवर्ती बँक

police bharti, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची सूची, Maharashtra Police Bharti Book List 2020

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment