शिक्षक होण्यासाठी काय करावे? New and latest 2021

पोस्ट शेअर करा.

शिक्षक होण्यासाठी काय कराव ?

शिक्षक
शिक्षक

समाजामध्ये सामाजिक मूल्य रुजवणारा एक मुल्यवान पेशा म्हणजे शिक्षकी पेशा. शालेय जीवनातून जात असताना शिक्षक व्हावे असं वाटत असते.

शिक्षक हा स्वतः राजा नसला तरी अनेक राजे निर्माण करण्याची क्षमता असणारा मार्गदर्शक असतो. व्यक्तीच्या जीवनातील शिक्षकाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
प्रत्येक व्यक्तीची काहीतरी बनण्याची इच्छा असते. तसेच काही व्यक्तींची शिक्षक बनण्याची इच्छा असते. शिक्षक बनण्यासाठी आवश्यक पात्रता, प्रक्रिया याठिकाणी आपण पाहणार आहोत.

अंगणवाडी पासून ते बारावीपर्यंत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना शिक्षक या संकल्पनेत गणता येईल. बारावी पुढीलअध्यापकांना प्राध्यापक म्हटले जाते.

 • शिक्षक पात्रता

आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. दर्जानुसार पात्रता असावी लागते.
डी.टी. एड(D.T.Ed.), बी. एड(B.Ed.), एम.एड(M.Ed.), SET,NET.

अंगणवाडी शिक्षक होण्यासाठी दहावीनंतर अंगणवाडी सेविका अभ्यासक्रम पुर्ण करावा लागतो. अंगणवाडी सेविका अभ्यासक्रम हा महिलांसाठी असून फक्त महिलांनाच अंगणवाडी सेविका होता येईल.

प्राथमिक स्तरावरती कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना डी.एड. अध्यापनशास्त्रीय पदवी धारण करणे गरजेचे असते. वर्ग इयत्ता पहिली पासून वर्ग आठवी पर्यंत डी.एड. (D.Ed.) पात्रता आवश्यक असते. बारावी नंतर करता येते.

माध्यमिक वर्गांसाठी बी.एड. (B.Ed.) ही पात्रता आवश्यक असते. B.ED पात्रता धारण करण्यासाठी प्रथम पदवी संपादन करणे आवश्यक असते. ही पदवी कला(Arts), वाणिज्य(Commerce), विज्ञान(Science) यापैकी कोणत्याही शाखेची असेल तरी चालते. उच्च माध्यमिक अध्यापक होण्यासाठी पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएशन) असणे गरजेचे आहे. बी.एड. प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य शासनाची MAH-B.Ed.-M.Ed.CET  ही परीक्षा द्यावी लागते.

अध्यापनशास्त्रीय पदवी धारण केल्यानंतर शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा (TET – Teachers Eligibility Test) जाहीर करण्यात आलेली आहे. ही पात्रता परीक्षा राज्यपातळीवर ती दरवर्षी होत असते. या परीक्षेला पात्र असणे आवश्यकच आहे.

अधिकृत संकेतस्थळ – https://mahatet.in

 • प्राध्यापक कसे व्हावे?

महाविद्यालयीन प्राध्यापकांना पदव्युत्तर पदवी नंतर नेट असणे आवश्यक आहे. यासाठी वर्षातून दोन वेळा नेट(NET- National Eligibility Test) परीक्षा घेतली जाते. नेट परीक्षेच्या धरतीवर राज्य शासना द्वारे सेट(SET- State Eligibility Test) परीक्षा घेतली जाते. नवीन 2020 च्या शैक्षणिक बदलानुसार अभ्यासक्रम M. Phil वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे महाविद्यालयीन प्राध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाने नेट अनिवार्य केले आहे.

नवीन शैक्षणिक धोरण 2020

 • नोकरीची संधी कोठे मिळते? 

महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद, खाजगी संस्था, आदिवासी कल्याण विभाग, समाज कल्याण विभाग इत्यादी शासकीय तसेच खाजगी विभागांमध्ये कार्यरत असतो. वरील संस्थांच्या  निवासी,अनिवासी, साखर शाळा यासारख्या विविध प्रकारच्या शाळांमध्ये कार्य करता येते.

MAHA TET । MAHA TET Exam 2021 बद्दल सर्व काही

डॉक्टर होण्यासाठी काय करावे लागते? how to become a doctor in Marathi


पोस्ट शेअर करा.

4 thoughts on “शिक्षक होण्यासाठी काय करावे? New and latest 2021”

  • हो, TAIT शिवाय नोकरी मिळत नाही.कृपया माहिती शेअर करा. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

   Reply
 1. खूप छान माहिती दिलीत

  Reply

Leave a Comment