Talathi bharti 2023 – Maharashtra talathi – तलाठी भरती 2023

अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, संदर्भ पुस्तके याविषयी. talathi bharti 2023

महाराष्ट्र शासनाच्या मेगाभरती प्रकल्पामध्ये सरळ सेवेच्या विविध भरती प्रक्रिया राबवण्यात येतात. त्यामध्ये तलाठी भरती 2023 प्रक्रिया ही एक आहे. talathi bharti 2023 महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी तलाठी परीक्षेची तयारी करीत आहेत. तलाठी भरती 2019 मध्ये राबविण्यात आलेली होती. यानंतरची तलाठी भरती अद्याप जाहीर झालेली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.

तलाठी भरती 2023 संदर्भात विस्तृत व सविस्तर विवेचनतलाठी भरती संदर्भात विस्तृत व सविस्तर विवेचन या ठिकाणी पाहणार आहोत. अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, संदर्भ पुस्तके, निकाल प्रक्रिया, याविषयी माहिती घेणार आहोत. talathi bharti 2023

विभागाचे नाव – महसूल विभाग, महाराष्ट्र शासन
पदाचे नाव – तलाठी
वेतन श्रेणी – 25500 – 81100
शैक्षणिक पात्रता – पदवी

तलाठी भरती 2023 अद्याप जाहीर झाली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होईल. महसूल विभागामध्ये तलाठी व मंडल अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यासाठी तलाठी भरती 2023 महत्त्वाची ठरू शकते.

  • तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते.
  • Talathi bharti posts / तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात.
  • तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही.
  • तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.

वयोमर्यादा talathi bharti age limit

talathi bharti / तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. तलाठी पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान अठरा वर्षाचा असलाच पाहिजे. जास्तीत जास्त उमेदवाराची वयोमर्यादा 43 असू शकते. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते. मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.

यापेक्षा अधिक माहिती येणाऱ्या संदर्भित जाहिरातीमध्ये व्यक्त केलेली असते. कारण तत्कालीन परिस्थितीनुसार विविध मुद्द्यांमध्ये बदल होत असतो. जसे की विविध भरती परीक्षेमध्ये कोरोना कालावधीमध्ये दोन वर्ष वयोमर्यादा शिथिल करण्यात आली होती. SEBC आरक्षणाचा मुद्दा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून कार्यवाहीत आणला गेलेला होता. त्यामुळे येणारी जाहिरात आपल्याला अधिक स्पष्ट माहिती देऊ शकते. नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण ती माहिती आम्ही अपडेट केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल.

शैक्षणिक पात्रता Talathi bharti 2023 qualification

तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे.

लेखी परीक्षा ही एकच असते. लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, अंक गणित हे विषय असतात. प्रत्येक विषयासाठी प्रश्न संख्या 25 असतात. आणि प्रत्येक विषयाला 50 गुण असतात. तर एकूण 100 प्रश्न व 200 गुण असतात. मराठी विषयाला स्तर व दर्जा 12 वीचा असतो. इंग्रजीसाठी पदवीचा अभ्यासक्रम असतो. लेखी परीक्षांची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते.

तलाठी भरती 2023 अभ्यासक्रम

Talathi Exam Syllabus 2023

अ. क्र. विषय प्रश्न संख्या गुण
1. मराठी 25 50
2. इंग्रजी 25 50
3. अंकगणित 25 50
4. सामान्यज्ञान 25 50
  एकुण 100 200
talathi bharti 2022 syllabus

Talathi bharti 2023 book list

मराठी अभ्यासक्रम
समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रिया विशेषण, क्रियापद विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्प्रचारांचा अर्थ, शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे सर्व व्याकरण मराठी विषयासाठी आहेत.

इंग्रजी अभ्यासक्रम
Vocabulary, similar words, opposite words, question tag, spilling mistake

यापूर्वीची तलाठी भरती 2019 मध्ये झालेली होती. तलाठी भरती 2019 चा निकाल लागून बऱ्याच दिवसानंतर आजही अनेक विद्यार्थी तलाठी भरती 2023 ची वाट पाहत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.

Best GK Book For Talathi

Refference Books for Competitive Exam

महापारेषण मध्ये 8500 जागांची भरती – महापारेषण भरती

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

35 thoughts on “Talathi bharti 2023 – Maharashtra talathi – तलाठी भरती 2023”

      • अजून आलेले नाहीत. आल्यानंतर आपल्या वेबसाईटवरती त्या संदर्भात माहिती मिळेल. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link and spread the love.

        Reply
        • माझ्या कडे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची पदवी आहे ,पण मी बारावी पास नाही. तर मी तलाठी परीक्षेस बसण्यास पात्र होऊ शकतो काय
          मुक्त विद्यापीठ तर्फे बारावी नापास विद्यार्थ्याला देखील पदवी चे शिक्षण मिळते तसे मी घेतले आहे.

          Reply
    • महिलांसाठी सवलत असते. तरीही अधिकृत आणि खात्रीशीर माहिती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कळेल. तोपर्यंत अभ्यास सुरू ठेवा. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link https://nitinsir.in/ and spread the love.

      Reply
  1. मी यापूर्वी कोणतीही स्पर्धा परीक्षा किंवा अभ्यास केला नाही.. माझ 10 th नंतर डिप्लोमा engineering झालेल आहे.. मी या परीक्षेसाठी अर्ज करू शकते का.? क्रुपया मार्गदर्शन करावे.. ..

    Reply
    • डिप्लोमा चालत नाही. कोणतीही असो पण डिग्री लागते. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link https://nitinsir.in/ and spread the love.

      Reply
  2. माझ्या कडे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची पदवी आहे ,पण मी बारावी पास नाही. तर मी तलाठी परीक्षेस बसण्यास पात्र होऊ शकतो काय
    मुक्त विद्यापीठ तर्फे बारावी नापास विद्यार्थ्याला देखील पदवी चे शिक्षण मिळते तसे मी घेतले आहे.

    Reply

Leave a Comment