UPSC Exam 2021 Notification Download and Apply

How To Apply UPSC Exam 2021 Notification

महाराष्ट्रामधील बऱ्याच विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग घेत असलेली यूपीएससी  परीक्षा द्यायची असते.  मात्र या परीक्षेची जाहिरात कशी असते? या जाहिराती मध्ये कोणकोणते मुद्दे असतात?  यूपीएससी परीक्षा देण्यासाठी वय किती असावे लागते?  या व यासारख्या इतर असंख्य प्रश्नांचा मागोवा घेऊया या लेखामध्ये.

UPSC Exam 2021

Upsc Exam 2021 Notification नुकतेच आलेले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिनांक 4 मार्च 2021 रोजी यु पी एस सी पूर्व परीक्षेबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.  वरील सर्व मुद्दे या जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहेत.  तुम्हाला ऑनलाईन अप्लाय सुद्धा कसे  करायचे हे या मध्ये सांगितलेले आहे. 

यूपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सांगितलेले आहे.  त्याच्याशी संबंधित मुद्दे पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहेत? 

 UPSC Exam 2021 ऑनलाइन अर्ज कसा करावा?

 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://upsconline.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन दिलेल्या सूचना व्यवस्थित भरायच्या आहेत. 

UPSC Exam 2021  अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?

  अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 24 मार्च 2021 असून 24 मार्च रोजी संध्याकाळी 6:00  पर्यंत अर्ज करता येईल.  (काही उमेदवारांना अर्ज करताना दिवस संपतो तेव्हा म्हणजे रात्री 12 पर्यंत वेळ आहे असे वाटण्याची शक्यता आहे त्यामुळे संध्याकाळी 6 हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो.) 

ऑनलाइन अर्ज करत असताना अडचण/ शंका असल्यास मदत केंद्र कोणते? 

उमेदवारांना परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करताना अडचण आल्यास सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पुढे दिलेल्या दूरध्वनी क्रमांक वरती संपर्क साधता येईल. हा संपर्क क्रमांक कार्यालयीन कामकाजात दिवशी कार्यान्वित असेल. म्हणजे सुट्टीच्या दिवशी आपल्याला प्रतिक्रिया मिळणार नाही.

UPSC Exam Helpline Number 

  •      011 – 23385271
  •      011 – 23381125
  •      011 – 23098543

UPSC Exam Centres in Maharashtra

Upsc exam 2021 साठी महाराष्ट्र मध्ये कोणकोणती  परीक्षा केंद्रे आहेत?

महाराष्ट्रातील एकूण सहा परीक्षा केंद्रावर ती ही परीक्षा होणार आहे.असे परीक्षा केंद्र पुढे दर्शवली आहेत.

UPSC Exam Centres in Maharashtra
UPSC Exam Centres in Maharashtra

यूपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा काय आहे?

यूपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा किमान 21 वर्ष अशी आहे.  कमाल वयोमर्यादा 32 वर्षे आहे.   

  • अनुसूचित जाती व जमातीसाठी वयोमर्यादा पाच वर्ष शिथिल आहे.
  • इतर मागास वर्ग उमेदवारांसाठी वयोमर्यादा तीन वर्ष शिथिल आहे
  •  माजी सैनिकांना वयोमर्यादा पाच वर्ष शेतीतील आहे.

शैक्षणिक पात्रता

परीक्षेसाठी किमान शैक्षणिक पात्रता कोणती? 

 परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक आहे. 

आवेदन शुल्क

परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवेदन शुल्क किती  आहे?

परीक्षेसाठी आवेदन शुल्क मात्र शंभर रुपये इतके आहे. विशेष बाब म्हणजे महिला व SC/ST  उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क नाही.

यु पी एस सी परीक्षा कोणत्या भाषेत देता येते? 

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी असणारी प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये असते.  दिलेल्या दोन भाषे व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय भाषेमध्ये प्रश्न विचारलेले नसतात. आपल्या प्रादेशिक भाषेमध्ये उत्तरे लिहिण्याची मुभा मुख्य परीक्षेमध्ये असते.  मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्ही आपल्या प्रादेशिक भाषेमध्ये किंवा मातृभाषेमध्ये बोलू शकता. 

यूपीएससी परीक्षा 2021 किती गुणांसाठी असणार आहे? 

 प्रत्येकी दोनशे गुणांचे दोन पेपर यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी असतात. या पेपर्समध्ये नकारात्मक गुणदान योजना लागू असते.  म्हणजे तुमच्या चुकीच्या उत्तरांसाठी बरोबर उत्तर दिलेल्या प्रश्नांचे गुण वजा होत असतात.

 यूपीएससी परीक्षेत संदर्भात विस्तृत माहितीसाठी पुढील लेख पाहू शकता.

UPSC information in Marathi । upsc 2021 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे

 यूपीएससी परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी आदर्श संदर्भ ग्रंथ सूची पुढील लिंक मध्ये पाहून डाऊनलोड करू शकता.

UPSC Book List In Marathi 2021 Free Download

तुम्हाला माहित आहे का स्पर्धापरीक्षेची तयारी करून घेणारे महाराष्ट्र शासनाचे सहा केंद्र महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित आहेत.या केंद्रांमध्ये नि:शुल्क प्रशिक्षणाची सोय उमेदवारांना उपलब्ध आहे. याची माहिती खाली दिलेली आहे.

SIAC Training Centre प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment