Vakil Kase Hotat? LLB संपूर्ण रूप । वकील कसे बनवायचे

Vakil Kase Banayache? वकिल कसे बनावे?

 मित्रांनो आपली प्रत्येकाची ईच्छा असते की आपण आयुष्यात खुप मोठे व्हावे.यात कोणाची महत्वाकांक्षा असते डॉक्टर होण्याची तर कोणाची महत्वाकांक्षा असते इंजिनिअर तसेच वकिल होण्याची.अशा प्रकारे आज आपली प्रत्येकाची आपल्या भविष्याबाबत स्वताची काही स्वप्रे असतात.

vakil
Vakil Kase Hotat

आजच्या लेखात आपण ह्यातीलच एका महत्वाच्या विषयावर मुद्देसुद चर्चा करणार आहोत की आपण वकिल कसे बनावे? तसेच vakil वकिल बनण्यासाठी आपल्याला किती शिक्षण लागते?कोणती परिक्षा उत्तीर्ण व्हावी लागते.?वकिल कोण असतात? त्यांचे काम काय असते? अशा सर्व बाबींचा आपण आजच्या लेखात समावेश करणार आहोत.जेणेकरुन vakil / वकिल बनण्यासाठी काय पात्रता असणे आवश्यक असते?कोणती पुस्तके आपल्याला अभ्यासावी लागतात अशा सर्व गोष्टींची माहीती आपल्याला ह्या आजच्या लेखातुन मिळु शकेल. भविष्यात आपणही वकिल बनण्याच्या तयारीला लागु शकू.

  • १) वकिल कोण असतो? त्यांचे कार्य काय असते?
  • २) वकिल अणि अँडव्होकेट या दोघांमध्ये काय फरक असतो?
  • ३) एल- एल- बी काय असते?
  • ४) एल एल बी चे पुर्ण रुप काय असते?
  • ५) एल-एल बी कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आपली काय शैक्षणिक योग्यता तसेच पात्रता असावी लागते?
  • ६)वकिल बनण्यासाठी कोणती अणि किती पुस्तके आपल्याला अभ्यासावी लागतात तसेच आपण अभ्यासायला हवीत?
  • ७) आपण सरकारी वकिल कसे बनु शकतो?
  • ८) अंतिम निष्कर्ष:

१)vakil वकिल कोण असतो? त्यांचे कार्य काय असते?

  मित्रांनो एक वकिल हा एक असा व्यक्ती जो कोर्टात आपल्या आशिलाची बाजु मांडत असतो.त्याला योग्य तो न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करत असतो.न्यायाधिशांसमोर पुरावे सादर करुन आपल्या आशिलाला निर्दोष ठरवत असतो.अणि त्याची कोर्टातुन निर्दोषपणे मुक्तता करत असतो.आपल्याकडे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आलेल्यांना योग्य तो कायदेशीर सल्ला देखील तो vakil देत असतो.

2) वकिल अणि अँडव्होकेट या दोघांमध्ये काय फरक असतो?

  मित्रांनो वकिल अणि अँडव्होकेट हे दिसायला जरी दोन समान शब्द वाटत असले तरी या दोघांमध्ये खुप मोठा फरक आहे.अणि तो असा की vakil वकिल तो असतो ज्याच्याकडे कायद्याची पदवी असते अणि त्याने कायद्याच्या बाबतीत चांगले प्रशिक्षण घेतलेले असते.तसेच तो कायदेशीर बाबींत लोकांना योग्य तो सल्ला देत असतो.वेळोवेळी मदत देखील करत असतो.

 अँडव्होकेट हा एक असा व्यक्ती असतो जो कोर्टात आपल्या आशिलाची बाजु न्यायाधिशांसमोर मांडत असतो.त्यासाठी त्याला तो अधिकार प्राप्त करावा लागत असतो.अणि त्याचसाठी त्याला ए आय बी ई नावाच्या परिक्षेत उत्तीर्ण देखील व्हावे लागत असते. एआयबीई (अखिल भारतीय बार परीक्षा) ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे. हे बार कौन्सिल ऑफ इंडियाने (बीसीआय) आयोजित केले आहे. कायदेशीर व्यवसायातील “सराव प्रमाणपत्र” मिळवण्यासाठी एआयबीई ही पात्रता परीक्षा आहे. एआयबीई परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र उमेदवारांना हे प्रमाणपत्र दिले जाते.

3) एल- एल- बी काय असते?

   मित्रांनो एल-एल-बी हा एक कायद्यासंबंधी अभ्यासाचा कोर्स असतो. ज्याचे पुर्णरुप आहे – legum baccalaureus असे आहे. हा कोर्स आपण पदवीनंतरही करु शकत असतो. जर आपल्याला कायद्याची माहीती मिळवायची असेल कायद्याविषयी अधिक जाणुन घ्यायचे असेल तर हा एक अत्यंत चांगला कोर्स आहे. कायद्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी. भारतीय प्रदेशांमध्ये एक कायदा आधारित नोकरीसाठी उत्तम पर्याय असू शकतो.

4) एल एल बी चे पुर्ण रुप काय असते?

  मित्रांनो जसे की आपण आधीच्या परिच्छेदात पाहिले की एल-एल-बी चे पुर्ण रुप हे legum baccalaureus असे आहे.अणि baccalaureus हा एक लँटिन भाषेतील शब्द आहे.पण यालाच सर्वसामान्य पदधतीने कायद्याच्या अभ्यासाची बँचलर पदवी असे संबोधिले जात असते.

5) एल-एल बी कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आपली काय शैक्षणिक योग्यता तसेच पात्रता असावी लागते?

 मित्रांनो एल- एल बी हा एक असा कोर्स आहे जो आपण बारावीनंतरही करु शकतो तसेच पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतरही करु शकत असतो.

  एल.एल. बी. चे दोन प्रकार असतात एक बीए नंतर केली जाणारी बी-ए एल-एल-बी अणि दुसरा फक्त एल-एल-बी अणि जर आपल्याला बीए एल. एल. बी. करायची असेल तर आपल्याला 12 वीत कमीत कमी टक्के तरी असावे लागतात.अणि समजा जर आपल्याला फक्त एल-एल-बी च करायचे आहे तर मग ते आपण पदवीचे शिक्षण पुर्ण करुन करु शकत असतो.कारण तेथे पदवीधर असणे गरजेचे असते.

6) वकिल बनण्यासाठी कोणती अणि किती पुस्तके आपल्याला अभ्यासावी लागतात तसेच आपण ती अभ्यासायला हवीत?

 मित्रांनो वकिल बनण्यासाठी कोणती अणि किती पुस्तके आपल्याला अभ्यासावी लागतात.हा प्रश्न जर तुम्ही मला विचारला तर मी तुम्हाला एकच सांगेन की वकिल हा एक कायद्याचा अभ्यासक असतो.ज्याला कायद्याचे संपुर्ण ज्ञान असते.अणि समाजही वकिलाकडे एक कायदातज्ञ म्हणुन सन्मानाने बघत असतो.अणि जर आपल्याला कायद्याचे संपुर्ण ज्ञान जर मिळवायचे असेल तर आपल्याला वकिलीचे ज्ञान देणारी भरपुर पुस्तके वाचणे गरजेचे आहे.कोणत्याही एक किंवा दोन पुस्तकांवर आधारलेले राहुन आपल्याला अजिबात चालणार नाही.

   दररोज आपल्याला स्वताला नवनवीन कायदेविषयक माहीती प्राप्त करून अपडेट राहावे लागेल. तरच आपण इतरांना कायदेविषयक काही योग्य ते मार्गदर्शन करू शकू. तसेच योग्य तो सल्ला देऊ शकतो.म्हणुन माझे वैयक्तिक मत असे आहे की आपण भरपुर कायद्याचे ज्ञान देणारी पुस्तके वाचायला हवीत. त्यांचा नियमित अभ्यास देखील करायला हवा.जेणेकरुन आपल्याला आपल्या क्षेत्राविषयी नवनवीन माहीती प्राप्त होत राहील.

7) सरकारी वकिल (vakil) कसे बनु शकतो?

  तर मित्रांनो आत्तापर्यत आपण हे जाणुन घेतले की वकिल कसे बनावे आता आपण हे देखील जाणुन घेऊयात की सरकारी वकिल बनण्यासाठी आपण काय करू शकतो? तसेच आपल्याला काय करणे आवश्यक आहे?

     1)12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे:

मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला ह्यासाठी कोणत्याही एका शाखेतुन बारावी उत्तीर्ण करणे फार आवश्यक असते.

त्यातच जर आपले क्षेत्र कला विभाग असेल तर मग ते आपल्यासाठी अजुन जास्त लाभदायक असते.कारण याच्याने आपल्याला आपल्या क्षेत्रासंबंधिच विषयाचे अध्ययन करावयाचे असल्यामुळे आपल्याला अध्ययन करण्यात जास्त अडचण येत नसते.

     2) vakil वकिलीची प्रवेश परिक्षा द्यावी लागते:

वकिलीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी आपल्याला त्यासाठी एक प्रवेश परिक्षा द्यावी लागत असते.जिचे नाव सी-एल-ए-टी असे असते. कॉमन लॉ डमिशन टेस्ट (सीएलएटी) ही भारतातील बावीस राष्ट्रीय कायदा विद्यापीठांच्या (एनएलयू) प्रवेशासाठी केंद्रीयकृत राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा आहे. ही परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही कायदा महाविदयालयात प्रवेश घेता येत असतो. २०१६ पासून महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यस्तरीय  LAW – CET सुरू केलेली आहे. या सामायिक प्रवेश परीक्षेतून विधी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो.

     3) कायद्याचा पुर्ण अभ्यास झाल्यानंतर इंटर्नशिपसाठी अर्ज करावा लागतो:

 कायदयाचा अभ्यास पुर्ण केल्यानंतर इंटर्नशिपसाठी अर्ज आपल्याला एखाद्या ठिकाणी करावा लागत असतो.यात आपल्याला कायद्याविषयी विविध माहीती प्राप्त होते.प्रशिक्षण देखील प्राप्त होत असते.कोर्टात केस कशी लढायची एकमेकांचे मत कसे खोडुन काढायचे सगळे कायदेशीर डावपेच यात आपल्याला शिकावयास मिळतात.अणि हे नवोदितांसाठी जे ह्या क्षेत्रात नुकतेच आलेले असतात शिकाऊ असतात त्यांच्यासाठी फार फायदेशीर ठरत असते.

    4) स्टेट बार काऊंसिल मध्ये दाखला म्हणजेच प्रवेश देखील घ्यावा लागतो:

  मित्रांनो इंटर्नशिप पुर्ण केल्यानंतर आपल्याला स्टेट बार आँफ काऊंसिल येथे प्रवेश घ्यावा लागतो.याच्यानंतर आपल्याला एक परिक्षा देखील द्यावी लागत असते जी स्टेट बार आँफ काऊंसिल तर्फे घेतली जात असते.यात उत्तीर्ण झाल्यावर याच्यानंतर आपल्याला एक कागद दिला जातो ज्यात असे नमुद केलेले असते की आता आपण भारतातील कुठल्याही न्यायालयात वकिलीचा सराव करु शकतात.

अंतिम निष्कर्ष

  तर मित्रांनो अशा पदधतीने आपण येथे vakil वकिल कसे बनावे? तसेच वकिल बनण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागते?किती शिक्षण घ्यावे लागते?कुठली परिक्षा उत्तीर्ण व्हावी लागते ह्या सर्व गोष्टी जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.

  तरी सदर लेख आपणास आवडल्यास आपल्या जास्तीत जास्त मित्र मैत्रीणींपर्यत शेअर करा जेणेकरून त्यांनाही वकिल कसे बनावे?vakil वकिल बनण्यासाठी कोणती परिक्षा द्यावी लागते.किती शिक्षण करावे लागते इत्यादी याची माहीती कळेल.अणि त्यांनाही ह्या माहीतीचा लाभ उठवता येईल.

हे हि वाचा –

Post office job vacancy in Maharashtra 2021 |पोस्ट ऑफिस भरती 2021

न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग । Judicial Magistrate First Class (JMFC)

UPSC Book List In Marathi 2021 Free Download

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “Vakil Kase Hotat? LLB संपूर्ण रूप । वकील कसे बनवायचे”

Leave a Comment