New Vice President of India Information in Marathi | उपराष्ट्रपती मराठी माहिती

Vice President of India Information in Marathi | उपराष्ट्रपती मराठी माहिती

उपराष्ट्रपती (Vice President) पदासंदर्भात व्यवस्थित आणि संविधानात्मक माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे. भारतातील विविध महत्त्वाच्या पदांपैकी उपराष्ट्रपती हे एक महत्त्वाचे व घटनात्मक पद आहे. 

Vice President of India

ज्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेत कलम 52 मध्ये राष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे, त्याप्रमाणे कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती Vice President पदाची तरतूद करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती हे पद अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदानुसार घेण्यात आले आहे. अमेरिकेच्या पद्धतीप्रमाणे भारताचे उपराष्ट्रपती हे वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

Vice President निवडणूक | Vice President Election in Marathi

कलम 66 मध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पात्रता सेवाशर्ती याबद्दल तरतुदी देण्यात आलेल्या आहेत.

कलम 66 एक नुसार उपराष्ट्रपती ची निवडणूक राष्ट्रपती प्रमाणेच एक निर्वाचक गण कडून अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार गुप्त मतदान पद्धतीने होत असते. निर्वाचक गण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मिळून बनतो.

राष्ट्रपती च्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे केवळ निर्वाचित सदस्य भाग घेतात तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत निर्वाचित सदस्य बरोबर नामनिर्देशित सदस्य सुद्धा भाग घेत असतात.

राष्ट्रपतींच्या निवडणुकीत राज्य विधिमंडळाचे निर्वाचित सदस्य भाग घेतात मात्र उपराष्ट्रपती च्या निवडणुकीत त्यांचा सहभाग घेतला जात नाही.

उपराष्ट्रपतीपदाच्या सेवाशर्ती

कलम 66 दोन मध्ये उपराष्ट्रपतीपदाच्या सेवाशर्ती देण्यात आलेल्या आहेत. उपराष्ट्रपती संसदेचा सदस्य तसेच राज्य विधीमंडळाचे सदस्य असणार नाही. अशा सदस्याची उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली तर पदग्रहण केल्याच्या तारखेपासून संबंधित जागा रिक्त असल्याचे मानण्यात येईल.

पात्रता

कलम 66 3 व 4 मध्ये उपराष्ट्रपतीपदाच्या पात्रता देण्यात आलेले आहेत.

  • तो भारताचा नागरिक असावा.
  • त्यांनी वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत.
  • तू राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा.
  • त्याने भारत सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील कोणतीही लाभाचे पद धारण केलेले नसावे.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, केंद्राचा किंवा राज्याचा मंत्री ही पदे लाभाची मानली जात नाहीत.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज करताना २० मतदात्यांनी पाठिंबा आणि २० मतदात्यांनी अनुमोदन देणे गरजेचे असते. 

शपथ/ प्रतिज्ञा

कलम 69 नुसार उपराष्ट्रपती ना आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या समक्ष शपथ घ्यावी लागते.

या शपथेमध्ये पुढील बाबींचा समावेश असतो.

  • सविधाना प्रति खरी श्रद्धा व निष्ठा बाळगणे.
  • कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडणे.

Vice President पदावधी

कलम 67 नुसार उपराष्ट्रपती पदाचा पदावधी पाच वर्ष असतो.

राष्ट्रपतींना संबोधून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.

उपराष्ट्रपती यांना पदावरून दूर करण्यासाठी प्रयोगाची गरज नसते. उपराष्ट्रपती यांना पदावरून दूर करण्याचा औपचारिक ठराव प्रथम राज्यसभेत बहुमताने मंजूर झाल्यानंतर लोकसभेने संमती देणे गरजेचे आहे. ठराव मांडण्यापूर्वी 14 दिवसांची पूर्वसूचना देणे गरजेचे असते.

उपराष्ट्रपती पुनर निवडणुकीसाठी पात्र असतात व ते कितीही वेळा निवडून येऊ शकतात.

पद रिक्त होणे

पदाचा कालावधी पूर्ण होणे राजीनामा मृत्यू अशा कारणांनी राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास तात्काळ निवडणूक घेण्याची तरतूद आहे. नव्या राष्ट्रपती पदग्रहण केल्याच्या तारखेपासून पाच वर्ष उपराष्ट्रपती पद धारण करतो.

निवडणूक विवाद

कलम 71 मध्ये उपराष्ट्रपती यांच्या तसेच राष्ट्रपतींच्या निवडणुकीतून उद्भवणारे विवादाबद्दल तरतुदी आहेत.उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात विवाद फक्त सर्वोच्च न्यायालयाकडून सोडवता येतो याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय असेल.

जर एखाद्या सुपर राष्ट्रपतींची निवडणूक रद्दबातल ठरली तर त्यांची कोणतीही कृती अमान्य ठरत नाही.

कार्य व अधिकार

सामान्य परिस्थितीत उपराष्ट्रपती ना उपराष्ट्रपती म्हणून कोणतेही कार्य नसते. अशावेळी ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून कार्य करतात. राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य करतात.

1) उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. म्हणून राज्यसभेमध्ये लोकसभा अध्यक्षा प्रमाणे कार्य व अधिकार उपराष्ट्रपतींना प्राप्त आहेत. 

2)राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती नवीन राष्ट्रपती पदग्रहण करेपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. जास्तीत जास्त सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतात.

3) उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती असतात तेव्हा ते राज्यसभेचे सभापती असत नाहीत.

4) उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती असतात तेव्हा त्यांना राष्ट्रपती पदाचे सर्व अधिकार व उन्मुक्ती  प्राप्त असतात.

पगार व भत्ते

घटनेने उपराष्ट्रपती ना कोणतेही पगार व मध्ये प्रदान केलेले नाहीत त्यांना राज्यसभेचा सभापती या नात्याने पगार व भत्ते प्राप्त होतात. 2018 19 च्या अर्थसंकल्प पासून उपराष्ट्रपती यांचा पगार चार लाख रुपये प्रति महिना इतका करण्यात आलेला आहे. 

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. सलग दोन वेळा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती होते यांच्या नंतर डॉक्टर हमीद अन्सारी हे सलग दोन वेळा उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत असणारे व्यक्ती होते.

भारताचे उपराष्ट्रपती सध्या कोण आहेत?

सध्या भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर हे आहेत.

बारावी नंतर काय करावे याविषयी सविस्तर जाणून घ्या येथे 12 वी नंतर काय करावे?

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment