11 Admission Information in Marathi | 11th CET 2024 Information in Marathi

11 Admission Mumbai, 11 admission pune | Maharashtra 11th cet information in Marathi

महाराष्ट्र राज्य शासनाने कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली होती.  त्यामुळे विद्यार्थ्यांच्या इयत्ता अकरावी प्रवेशाचा प्रश्न 11 Admission उद्भवत होता.  यासाठी महाराष्ट्र शासनाने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राज्यामध्ये सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे. 

11 admission
11 admission 2021

सदर सामायिक प्रवेश परीक्षा 11 Admission CET महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary education (MSBSHSE) तसेच इतर शिक्षण मंडळ (C.B.S.E./C.I.S.C.E.)  द्वारे दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही देता येईल. 

सामायिक प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांना MHT CET प्रमाणे बंधनकारक नसून ऐच्छिक परीक्षा असणार आहे. म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा अकरावीला प्रवेश मिळणार आहे मात्र प्रथमतः ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार पहिल्या फेरीमध्ये करण्यात येणार आहे. 

 अकरावी सामायिक प्रवेश परीक्षेचे स्वरूप 11 admission exam pattern

 सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. (Multiple choice objective type questions)

सामायिक प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असेल तुझ्यासाठी वेळ दोन तास असणार आहे. 

क्र  विषय  गुण 
१  इंग्रजी २५
गणित २५
सामान्य विज्ञान २५
सामाजिक शास्त्रे २५
  एकूण  १००
11 admission

कोविड  प्रादुर्भावामुळे वगळण्यात आलेल्या २५%  भागावर प्रश्न नसतील. 

परीक्षा शुल्क 11 admission exam fee

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी (शैक्षणिक वर्ष २०२०-२१ )अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेले असल्याकारणाने त्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही पद्धतीचे परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही. 

    तथापि इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याद्वारे विहित करण्यात  येणारे परीक्षा शुल्क (१७८ रुपये) द्यावे लागेल. तसेच नियमित शैक्षणिक वर्ष वगळता इतर विद्यार्थ्यांना अर्ज करताना १७८ रुपये  इतकी परीक्षा शुल्क द्यावे लागेल. 

परीक्षेसाठी अर्ज 

 परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंकचा वापर करता येऊ शकतो. 

Apply Now

सामायिक प्रवेश परीक्षा दिनांक  11 Admission Exam date / 11 CET Exam date

सदर प्रवेश परीक्षा दिनांक २१ ऑगस्ट २०२१  रोजी सकाळी ११ ते १  या वेळेत घेण्यात येणार आहे.  

महाराष्ट्र राज्यामध्ये होणाऱ्या या अकरावीच्या प्रवेश परीक्षेसंदर्भातील सर्व महत्त्वाचे मुद्दे येथे मिळाले असतील अशी अपेक्षा  आहे.  याव्यतिरिक्त काही शंका/अडचणी असल्यास कमेंट द्वारे विचारू शकता. 

 हे ही वाचलात का? 

ITI कसे करायचे? ऍडमिशन,फी, पात्रात, आणि नोकरीची संधी… 

12 वी नंतर काय करावे? 12 vi nantar kay karave ? Best For You.

MPSC विषयक माहिती 

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment