12 jyotirlinga in marathi | bara jyotirling list in marathi
देवांचा देव महादेव आणि सगळ्यात भोला नाथ म्हणजे भगवान शंकर होय. भगवान शंकराची आराधना करण्यासाठी श्रावण महिना पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची आराधना करण्यासाठी सर्व लोक भगवान शंकराविषयी माहिती घेत असतात.
भगवान शंकराची बारा ज्योतिर्लिंगे कोणती? ती कुठे आहेत? यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत? महाराष्ट्रामध्ये कोण कोणती ज्योतिर्लिंगे आहेत? ती कोणकोणत्या ठिकाणी वसलेली आहेत? असे विविध प्रश्न आपल्याला पडलेले असतात. या प्रश्नांची उत्तरे देणारा हा माझा लेखन प्रपंच खास आपल्यासाठी.
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या संपूर्ण लेखांमधून मिळतील.आणि मनातील शंका दूर होतील याची खात्री आहे.
पुराणा मध्ये सांगण्यात आलेले आहे की भगवान शंकर जिथे जिथे प्रकट झाले त्या त्या स्थानावरती ही ज्योतिर्लिंगे निर्माण करण्यात आलेली आहेत. देशामध्ये अशी बारा ठिकाणे आहेत.
सर्व ठिकाणे 12 Jyotirlinga in Marathi एकत्रित पाहू नंतर त्याची वैशिष्ट्ये पाहू.
12 Jyotirlinga in Marathi
क्रमांक | ज्योतिर्लिंग | ठिकाण / राज्य |
1) | सोमनाथ | वेरावळ, (गुजरात) |
2) | मल्लिकार्जुन | श्रीशैल्यम, (आंध्र प्रदेश) |
3) | महाकालेश्वर | उज्जैन (मध्य प्रदेश) |
4) | ओंकारेश्वर | ओंकार मांधाता (मध्य प्रदेश) |
5) | वैजनाथ | परळी (महाराष्ट्र) |
6) | रामेश्वर | रामेश्वर (तामिळनाडू) |
7) | नागनाथ | हिंगोली (महाराष्ट्र) |
8) | विश्वेश्वर | वाराणसी (उत्तर प्रदेश) |
9) | घृष्णेश्वर | औरंगाबाद (महाराष्ट्र) |
10) | केदारेश्वर | केदारनाथ (उत्तराखंड) |
11) | त्र्यंबकेश्वर | नाशिक (महाराष्ट्र) |
12) | भीमाशंकर | भीमाशंकर पुणे (महाराष्ट्र) |
माथेरान – Matheran | Best places to visit
1) सोमनाथ – गुजरात राज्यातील प्रभापटनम येथे हे मंदिर आहे. प्रभा पटनम हे ठिकाण गुजरात मधील वेरावळ जिल्ह्यामध्ये येते. बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ हे आहे. प्राचीन ग्रंथानुसार सोम राजा अर्थात चंद्राने आपल्यावर असलेल्या शापाचे निराकरण याठिकाणी केले. सोम राजा भगवान शंकराच्या आशीर्वादाने शापातून मुक्त झाला. म्हणून या ठिकाणाला सोमनाथ हे नाव पडले अशी अख्यायिका आहे.
2) मल्लिकार्जुन – रागावून गेलेल्या कार्तिक यास भेटण्यासाठी मल्लिका म्हणजेच माता पार्वती व अर्जून म्हणजेच भगवान शंकर सोबत आले म्हणून या ठिकाणास मल्लिकार्जुन असे म्हणतात. श्रीशैल्यम पर्वतावर ती हे ठिकाण आहे. दक्षिणेचा कैलास म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते.
3) महाकालेश्वर – महेश म्हणजेच भगवान शंकराच्या मनामध्ये एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांची परीक्षा द्यावी असे आले. भगवान शंकराने ब्रह्मा आणि विष्णू यांना प्रकाशाचा अंत शोधण्यास सांगितले. यामध्ये आली विष्णू निहार मांडली तर ब्रम्हा यांनी खोटे उत्तर दिले. म्हणून या ठिकाणी शिवशंभुने महाकाल रूप धारण केले. यावरून याला महाकालेश्वर असे म्हटले जाते.
4) ओंकारेश्वर – उज्जैन पासून जवळच नर्मदेच्या काठावर हे मंदिर आहे. हा सर्व मंदिराचा भाग ओंकाराच्या आकाराचा असल्याने यास ओंकारेश्वर असे म्हटले जाते.
5) वैद्यनाथ – वैद्यनाथ म्हणजेच परळीचा वैजनाथ होय. हे ठिकाण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये आहे.
या ठिकाणी कुष्ट रोगापासून बरे होण्यासाठी अनेक रोगी येतात असे मानले जाते.
6) रामेश्वर – प्रभू श्रीरामाने लंकेत जाण्यापूर्वी स्वतः शिवलिंगाची स्थापना याठिकाणी केल्यामुळे या ठिकाणाला रामेश्वर असे म्हटले जाते.
7) नागनाथ – महाराष्ट्रातील हिंगोली जिल्हा मध्ये असणारे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणाला नागेश्वर असेदेखील म्हटले जाते.
8) विश्वेश्वर – बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पवित्र असे हे ज्योतिर्लिंग म्हणता येईल. कैलास पर्वतावर भस्म लावून राहणाऱ्या भगवान शंकरांची टिंगल सर्वांनीच केली तेव्हा माता पार्वतीने शिवशंभु ना विनंती केली की मला येथून कुठेतरी दूर घेऊन चला. तेव्हा भगवान शंकर काशी म्हणजेच वाराणसी या ठिकाणी येऊन राहू लागले.
9) घृष्णेश्वर – महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेरूळ लेण्या जवळ हे मंदिर आहे. येथे शिव कुंड नावाचे सरोवर देखील आहे. हिंदू धर्माचा आख्यायिकेनुसार घृष्णे च्या विनंतीवरून भगवान शंकर येथे तिथे झाले म्हणून या ठिकाणाला घृष्णेश्वर असे म्हणतात.
घृष्णा नावाची एक स्त्री होती. तिला पुत्रप्राप्ती भगवान शंकराच्या भक्तीने झालेली होती.
10) केदारेश्वर – केदारेश्वर म्हणजेच केदारनाथ हे ठिकाण हिमालयाच्या गडवाल रांगेमध्ये वसलेले एक ठिकाण आहे. उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यांमध्ये हे ठिकाण आहे. कार्तिक महिन्यापासून चैत्र महिन्यापर्यंत हे मंदिर बर्फाच्छादित असते.
11) त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वराचे ज्योतिर्लिंग मंदिर नाशिक पासून जवळच ब्रम्हगिरी पर्वतावरती आहे. याच ठिकाणी दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी नदीचा उगम होतो. गौतम ऋषींच्या विनंतीवरून गंगा येथे प्रकट झाली व भगवान शंकर लिंग रूपाने अवतरले अशी आख्यायिका आहे.
12) भीमाशंकर – कुंभकर्णाचा मुलगा भीम आणि भोलेनाथ यांच्यामध्ये या ठिकाणी युद्ध झाले म्हणून या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले.पुण्यापासून तुलनात्मक दृष्टीने जवळच असणारे हे ठिकाण आहे. सुमारे तेराशे वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे.
राज्यानुसार बारा ज्योतिर्लिंग ठिकाणांचे वर्गीकरण
क्रमांक | राज्य | ज्योतिर्लिंग ठिकाणे |
1) | आंध्र प्रदेश | 1 |
2) | गुजरात | 1 |
3) | मध्य प्रदेश | 2 |
4) | महाराष्ट्र | 5 |
5) | तामिळनाडू | 1 |
6) | उत्तर प्रदेश | 1 |
7) | उत्तराखंड | 1 |
एकूण | 12 |
अशा प्रकारची बारा ज्योतिर्लिंगे आपल्या भारत देशामध्ये आहेत. भारत देशांमधील या बारा ज्योतिर्लिंगांची नावे व त्यांची ठिकाणे आणि राज्य यासंदर्भात सविस्तर माहिती 12 Jyotirlinga in Marathi या भागातून आपण घेतलेली आहे.
अधिक जाणते होण्यासाठी माहितीने भरपूर आमचे इतर लेख वाचू शकता. वरील 12 Jyotirlinga in marathi या लेखात दिलेली माहिती उपयुक्त असून आपल्या मित्र मैत्रिणी पर्यंत शेअर करून सहकार्य करावे. धन्यवाद!
मालशेज | Malshej | प्राकृतिक सुंदरता का नैसर्गिक वरदान
Upsc Book List In Marathi 2022 Free Download
FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत?
महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. पूर्ण भारत देशामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत.
सर्वाधिक ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यामध्ये आहेत?
सर्वाधिक ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत.
रामेश्वर के ज्योतिर्लिंगाचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे?
रामेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण तमिळनाडू राज्यामध्ये आहे.