भारतीय अर्थव्यवस्था | Bhartiy Arthvyavastha Information in Marathi

भारतीय अर्थव्यवस्था | Bhartiy Arthvyavastha Information in Marathi

अर्थशास्त्र म्हणजे काय?

अर्थव्यवस्थेतील उत्पादन, विभाजन, विनिमय व उपभोग या चार प्रकाराच्या व्यवहारांचा शास्त्रीय व पद्धतशीर अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र होय.
अर्थशास्त्रात मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजुंची चर्चा केली जाते. म्हणुनच अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र ठरते.

अर्थव्यवस्था म्हणजे काय ?

उत्पादन, विभाजन, विनीमय व उपभोग या चार आर्थिक व्यवहाराशी संबधित संस्थाच्या एकत्रिकरणातून अर्थव्यवस्था निर्माण होते.

अर्थव्यवस्थांचे प्रकार | Bhartiy Arthvyavastha

एखादया देशाची अर्थव्यवस्था ही वस्तु व सेवांच्या उत्पादन व वापराच्या पद्धतीवरून ठरते.

प्रकार-
उत्पादन साधनांच्या मालकीवरून-

1) भांडवलशाही अर्थव्यवस्था.
2) समाजवादी अर्थव्यवस्था.
3) मिश्र अर्थव्यवस्था.

1) भांडवलशाही अर्थव्यवस्था: उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. उत्पादन व किमती बाजार यंत्रणेद्वारे ठरतात. अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात.

वैशिष्टये 

1) उत्पादनाच्या साधनांचा खाजगी मालकी हक्क
2) ग्राहक हे सार्वभौम असतात.
3) बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते.
4) किंमत ठरण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते.

2) समाजवादी अर्थव्यवस्था: उत्पादनाची साधने सरकारी मालकिची असतात. व वस्तुंचे आणि सेवांचे उत्पादन, विभाजन सरकारमार्फत चालते. याला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात.

वैशिष्ट्ये 

1) उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात.
2) सर्व निर्णय सरकार घेते.
3) वस्तु व सेवांचे उत्पादन नफ्यासाठी होत नाही.
4) खाजगी भांडवलाला वाव नसतो.

3)मिश्र अर्थव्यवस्था: भांडवलशाही व समाजवादी या दोन्ही अर्थव्यवस्थेतील चांगल्या गुणवैशिष्टयांचा स्वीकार करून दोन्ही अर्थव्यवस्थांचे सहअस्तित्व दर्शविणारी अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था होय.

विकासाच्या अवस्थेनुसार –

1) विकसित अर्थव्यवस्था –
2) विकसनशील अर्थव्यवस्था –

भारतीय अर्थव्यवस्था –  bhartiy arthvyavastha

भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनसशील अर्थव्यवस्था आहे. भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्विकार केला आहे. मात्र – 1991 च्या आर्थिक सुधारणांपासून मुक्त अर्थव्यवस्था होत आहे. 

विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार –

1) विकसित अर्थव्यवस्था: दरडोई उत्पन्नाचे प्रमाण जास्त, साक्षरतेचे उच्च प्रमाण, जास्त औद्योगिकरण, घटता जन्म व मृत्यूदर अशी लक्षणे दिसून येणारे अर्थव्यवस्थेला विकसीत अर्थव्यवस्था म्हणतात.

उदा. जपान, अमेरीका, जर्मनी, इ.

2) विकसनशील अर्थव्यवस्था: ज्या अर्थव्यवस्थेमध्ये दरडोई उत्पन्नाचे प्रमाण कमी, साक्षरतेचे कमी प्रमाण, कमी औद्योगिकरण, उच्च जन्म व मृत्यूदर, कृषी आधारीत लोकसंख्या, अशी लक्षणे दिसून येतात त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था म्हणतात.
उदा. भारत, श्रीलंका, चीन, आफ्रिका, इ. 

अर्थव्यवस्थेची क्षेत्रे

व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची पाच प्रकारची क्षेत्रे आढळून येतात –
1) प्राथमिक क्षेत्र –
            नैसर्गिक साधन सामग्रीशी संबंधीत व्यवसाय या क्षेत्रात येतात.
उदा. शेती, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, खाणकाम, या व्यवसायांचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होतो.

2) व्दितीयक क्षेत्र –
            प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तुवर प्रक्रिया करून दुसय्रा प्रकारच्या वस्तु तयार केल्या जातात. त्यामुळे यास उद्योग क्षेत्र असेही म्हणतात.

उदा. कारखानदारी, बांधकाम, वीजनिर्मिती, या व्यवसायांचा समावेश व्दितीयक क्षेत्रात होतो.

3) तृतीयक क्षेत्र –
            प्राथमिक व व्दितीयक क्षेत्रांना पुरक सेवांचा समावेश तृतीयक क्षेत्रात होतो. याला सेवा क्षेत्र असेही म्हणतात.

व्यापार, वाहतुक, दळणवळण, संरक्षण, प्रशासन, यांचा समावेश तृतीयक क्षेत्रात होतो.

4) चतुर्थक क्षेत्र –
            उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर या क्षेत्रामध्ये होतो. उच्च ज्ञानाशी संबंधित संकल्पनाची निर्मिती, संशोधन व विकास, यांचा संबंध चतुर्थक क्षेत्राशी येतो.

उदा. सॉफ्टवेअर, माहिती तंत्रज्ञान, संशोधन व विकास इ.

5) पंचम क्षेत्र –
        पंचक क्षेत्रात समाजातील व अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रिये चा समावेश होतो.

उदा. सरकार, विज्ञान, विद्यापीठे, आरोग्य सेवा या क्षेत्रातील उच्च स्तरीय संचालक व अधिकारी यांचा समावेश होतो.

मालकीनुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे 

1) सार्वजनिक क्षेत्र-
2) खाजगी क्षेत्र-
3) संयुक्त क्षेत्र-
4) सहकारी क्षेत्र-

भारतीय अर्थव्यवस्थेची bhartiy arthvyavastha

वैशिष्टे –
1) कमी दरडोई उत्पन्न-
                  देशाचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या आर्थिक स्थितीचे महत्वाचे निर्देशांक आहे. दरडोई उत्पन्नात वेगाने वाढ घडवून आणणे हे भारतीय नियोजनाचे महत्वाचे उद्दीष्ट आहे, मात्र त्याचा स्तर कमीच राहीला. bhartiy arthvyavastha

2) उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी –
                                            भारताचे दरडोई उत्पन्न कमी आहेच मात्र त्याबरोबरच त्याच्या वाढीचा दरही कमीच आहे. 
3) कृषी क्षेत्राचे प्राबल्य-
                    कृषी हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे, मात्र कृषी क्षेत्राचा GDP मधील वाटा कमी आहे. bhartiy arthvyavastha
    2013 – 14 :– 17.5 %
    2015 – 16 :- 15.4 %
    2017 – 18 :- 14.8 %

4) आर्थिक विषमता –
            भारतात उत्पन्नाची मोठया प्रमाणात आर्थिक विषमता दिसून येते. श्रीमंत अधिक श्रीमंत व गरीब अधिकच गरीब दिसून येतो. 

5) लोकसंख्या विस्फोट –
                  1901 साली भारताची लोकसंख्या 23.84 कोटी झाली. 2011 मध्ये 121 कोटी झाली. या आकडेवारीतूनच लोकसंख्या विस्फोट झालेला दिसून येतो. 2011 च्या जनगणनानुसार भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 17.5 टक्के एवढी आहे. मात्र भारताचे क्षेत्रफळ जागतिक क्षेत्रफळांच्या फक्त 2.42 टक्के एवढेच आहेत.

6) गरीबी व बेरोजगारी –
                  दारीद्रयाचे मोजमाप करताना विविध मुद्दे विचारात घेऊन विविध समित्या नेमल्या गेल्या. त्यानुसार दारिद्रयाची आकडेवारीही वेगवेगळी ठरते तरीही भारतातील दारिद्रय जास्तच आहे.
                भारतातील लोकसंख्या विस्फोटामुळे बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. 15 ते 60 वयोगटातील कार्यक्षम लोकांचे प्रमाण जास्त मात्र त्या प्रमाणात रोजगार नाही.

7) भांडवल कमी –
            व्यवसायात गुंतवणूक करून मालमत्ता निर्माण करणे. म्हणजे भांडवल निर्मिती होय.
                बचतीतून भांडवल निर्माण होते. मात्र अशा भांडवल निर्मितीचा दर भारतात खूप कमी आहे.

8) औदयोगिकरण कमी –
                    साहजिकच भांडवल कमी असल्याने व्यवसाय व औदयोगिकरण कमी असणे किंबहूना आहे. म्हणून अर्थव्यवस्थेत आर्थिक वृद्धीसाठी औदयोगिकरणाचा अभाव जाणवतो.

9) पायाभूत सुविधांचा अभाव –
                      रस्ते, विमान, जलमार्ग, दळणवळण सुविधा यांचा अभाव भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करताना दिसून येतो. म्हणून पायाभूत सुविधांचा अभाव हे भारतीय अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्टयच म्हणावे लागेल.

10) कमी दर्जाचे तंत्रज्ञान –
                    कमी दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे कृषी व औदयोगिक विकासात अडचण निर्माण होते.

राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे |margdarshak tatve 36-51

Maharashtra new GR about Direct Recruitment

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “भारतीय अर्थव्यवस्था | Bhartiy Arthvyavastha Information in Marathi”

Leave a Comment