कृषी क्षेत्रातील क्रांती | Krushi Kranti Information in Marathi

कृषी क्षेत्रातील क्रांती – कृषी उत्पादन क्रांत्या । Krushi Kranti Information in Marathi

    मित्रांनो आपण आजच्या या लेखात कृषी क्षेत्रातील क्रांती krushi kranti या विषया बद्दल माहिती पाहणार आहोत. भारतातील विविध पिके आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या क्रांत्या याविषयी माहिती या लेखातून मिळणार आहे.

कृषी क्षेत्रातील क्रांती खालीलप्रमाणे :- 

  1. हरित क्रांती
  2. श्वेत/धवल क्रांती 
  3. करडी क्रांती 
  4. तपकिरी क्रांती 
  5. गोल क्रांती 
  6. गुलाबी क्रांती 
  7. चंदेरी / रजत क्रांती 
  8. लाल क्रांती 
  9. सोनेरी/सुवर्ण क्रांती 
  10. अमृत क्रांती 
  11. नील क्रांती 
  12. सोनेरी तंतू क्रांती 
  13. चंदेरी तंतू क्रांती  
  14. पीत क्रांती

✴️ कृषी क्षेत्रातील क्रांती थोडक्यात पुढीलप्रमाणे: 

अनुक्रमणिका क्रांती उत्पादन
हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनात वाढगहू, तांदूळ इ.
श्वेत / धवल क्रांती  दुग्ध उत्पादनात वाढ, रेशीम उत्पादनात वाढ
करडी क्रांती खत उत्पादन
तपकिरी क्रांती चामडी किंवा कोकोचे उत्पादन
गोल क्रांती बटाटे चा उत्पादन 
गुलाबी क्रांती कोळंबी, कांदा इत्यादी.
चंदेरी / रजत क्रांती अंडी चे उत्पादन
लाल क्रांती टोमॅटो उत्पादन
सोनेरी क्रांती/सुवर्ण क्रांती फळांचा व मधाचा उत्पादन 
१० अमृत क्रांती नदी जोड प्रकल्प
११ निलक्रांती मत्स्य उत्पादन
१२ सोनेरी तंतू क्रांती ताग उत्पादन
१३ चंदेरी तंतू क्रांती कापूस उत्पादन
१४ पीत क्रांती तेलबिया उत्पादन 
krushi kranti

1) हरित क्रांती : 

        इ.स 1960 च्या दशकात शेतीचे संशोधन व विकास व तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतामध्ये कृषी उत्पादनात वाढ झाली. यामध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास , संकरित बियाणांचा , व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण , किटकनाशकांची व कृत्रिम खतांचे वितरण इत्यादी अशे अनेक मार्गावर भर देण्यात आला. यामध्ये अन्नधान्य उत्पादनात म्हणजेच गहू आणि तांदूळ उत्पादनात वाढ झाली. हरित क्रांतीची सुरुवात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली.

भारतीय हरितक्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन हे आहेत.

2) श्वेत/धवल क्रांती : 

      श्वेत क्रांती म्हणजे भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाला यालाच श्वेत क्रांती असे म्हणतात. किंवा यास दुग्ध क्रांती असेही म्हटले जाते. ह्या क्रांतीची सुरुवात 13 जानेवारी 1970 ला झाली. यामध्ये गाय, म्हैस, शेळी किंवा इतर काही अनेक प्रकारच्या पशुधनाच्या विकासासाठी ही काम केला जातो. मुख्यतः यामध्ये दुधाच्या उत्पादनात वाढ केला जातो. 

3) करडी क्रांती : 

       करडी क्रांती म्हणजे यामध्ये खतांचे उत्पादन वाढ केले जाते यास करडी क्रांती असे म्हणतात. 

4) तपकिरी क्रांती : 

       तपकिरी क्रांती म्हणजे यामध्ये चामडी किंवा कोकोचा उत्पादन वाढवला जातो यास तपकिरी क्रांती असे म्हणतात. 

5) गोल क्रांती : 

      यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात बटाट्याचा उत्पादनाचा वाढ केला जातो त्यास गोल क्रांती असे म्हणतात. 

6) गुलाबी क्रांती : 

      यामध्ये कोळंबी, कांदा इ. याचा उत्पादन केला जातो त्यास गुलाबी क्रांती असे म्हंटले जाते. 

7) चंदेरी / रजत क्रांती : 

      चंदेरी क्रांती म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणात अंडीचा उत्पादन केला जातो त्यास चंदेरी किंवा रजत क्रांती असे म्हणतात. 

8) लाल क्रांती : 

      लाल क्रांती म्हणजे यामध्ये टोमॅटोचा उत्पादन केला जातो. तसेच शेळी मेंढी यांच्या उत्पादनात सुद्धा वाढ केला जातो त्यास लाल क्रांती असे म्हणतात. 

9) सोनेरी/सुवर्ण क्रांती : 

       यामध्ये फळांचा व मधाचा उत्पादन केला जातो यालाच सोनेरी किंवा सुवर्ण क्रांती असे म्हणतात. 

10) अमृत क्रांती : 

       यामध्ये नदी जोड प्रकल्प ला महत्व दिले गेले आहे. 

11) नील क्रांती : 

      नील क्रांती मध्ये मत्स्य उत्पादन केला जाते. या क्रांतीमध्ये मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या या निलक्रांती योजनेला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्राने मत्स्य व्यवसायाला चालना किंवा उभारी देण्यासाठी ही निलक्रांती योजना सुरू केली. 

12) सोनेरी तंतू क्रांती : 

      यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात तागाचा उत्पादन केला जातो. यालाच सोनेरी तंतू क्रांती असे म्हणले जाते. 

13) चंदेरी तंतू क्रांती : 

      चंदेरी तंतू क्रांती म्हणजेच यामध्ये कापूस चा मोठ्या प्रमाणात उत्पादन केला जातो त्यालाच चंदेरी तंतू क्रांती असे म्हटले जाते. 

14) पीत क्रांती : 

       या क्रांतीची सुरुवात तेलबियांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी केली होती. विविध तेलबियांचा उत्पादन केला जातो त्यास पित क्रांती असे म्हणतात. 

     तर मित्रांनो तुम्हाला या लेखांमधून कृषी क्षेत्रातील क्रांती (krushi kranti) या बद्दल संपूर्ण माहिती मिळालेच असेल. तरी तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर आपण कॉमेंट बॉक्स (Comment Section) मध्ये विचारू शकता. 

     आमचा हाच प्रयत्न असतो की विद्यार्थ्याला हवी असणारी संपूर्ण विषयाबद्दलची माहिती आपणापर्यंत एकाच ठिकाणावरून पोहोचविणे हाच आमचा उद्देश असतो. तरी तुम्हाला krushi kranti हा लेख आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही कृषी क्षेत्रातील क्रांती याबद्दल माहिती मिळेल. 

हे हि वाचा

बी फार्मसी B Pharmacy कशी करायची ?

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment