Maharashtra Police Bharti 2022 Latest

Maharashtra Police Bharti 2022 | महाराष्ट्र पोलीस भरती

Maharashtra Police Bharti 2022  बाबत आपल्या मनात विविध प्रश्न असतील या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपल्याला  मिळतील. सर्वात शेवटी एक महत्त्वाची टीप खास आपल्यासाठी देण्यात आलेली आहे.

अलीकडेच महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आणि एक नवीन जीआर काढलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या मनातील शंका दूर केल्या आहेत. त्यातील विविध मुद्दे आणि त्यांचे स्पष्टीकरण देणारा हा लेख. Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti

Maharashtra Police Bharti

क्रमांक- सेप्रनि- १८१८/ प्र.क्र.३१३ (भाग-२)/पोल-५अ.-महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा मुंबई अधि. २२) याच्या कलम १५ च्या खंड (ब) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याच्या वतीने त्यास समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता पुढील नियम करीत आहेत :

१. या नियमास, “महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (पहिली सुधारणा) नियम, २०२२” असे म्हणावे.

२. “महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ याच्या नियम ४ ऐवजी पुढील नियम दाखल करण्यात येईल 

“४. (१) शारीरिक चाचणी (५० गुण) :

जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल.

Maharashtra Police Bharti Physical Test

शारीरिक चाचणी पुढीलप्रमाणे एकूण ५० गुणांची असेल :

(अ) पुरुष उमेदवारगुण
(क) १६०० मीटर धावणे.२०
(ख) १०० मीटर धावणे१५
(ग) गोळाफेक१५
एकूण५०
Maharashtra Police Bharti Physical Test for Men

Maharashtra Police Bharti Physical Test For Woman

(अ)  महिला उमेदवारगुण
(क) ८०० मीटर धावणे.२०
(ख) १०० मीटर धावणे१५
(ग) गोळाफेक१५
एकूण५०
Maharashtra Police Bharti Physical Test For Woman

Maharashtra Police Bharti Syllabus

(२) लेखी चाचणी (१०० गुण) :

(अ) शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १ : १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.

(ब) लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील : Maharashtra Police Bharti Written Exam

  • (१) अंकगणित ;
  • (२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ;
  • (३) बुध्दीमत्ता चाचणी;
  • (४) मराठी व्याकरण.

Maharashtra Police Bharti Book

(क) लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे इतका असेल.  प्रश्न संख्या १०० असेल. 

(ड) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के

 पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. 

स्पष्टीकरण :- शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील

जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या ११० या प्रमाणात लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलाविण्यास पात्र असतील. 

उदाहरणार्थ, जर अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये १० रिक्त पदे व अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये ५ रिक्त पदे असतील तर, अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये गुणवत्तेनुसार १०० (१०X१०-१००) उमेदवार, सूचीबध्द करण्यात येतील आणि अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये गुणवत्तेनुसार ५० (१० X ५ =५०) उमेदवार सूचीबध्द करण्यात येतील. 

तथापि, अनुसूचित जाती प्रवर्गातील गुणानुक्रमे १०० व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळाले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातर्गत लेखी चाचणीस बसण्यासाठी बोलवण्यास पात्र असतील. 

तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील गुणानुक्रमे ५० व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळाले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जमाती प्रवगांतर्गत लेखी चाचणीस बसण्यासाठी बोलावण्यास पात्र असतील. 

(३) पोलीस महासंचालक यांनी प्रत्येक पोलीस घटकासाठी गठीत केलेले निवड मंडळ, या नियमाचे पोट नियम (१) व (२) मध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार करील. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळविलेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृह विभाग, शासन निर्णय, क्रमांक – पोलीस १८१९ / प्र.क्र. ३१६ / पोल ५अ, दि. १० डिसेंबर, २०२० मध्ये आणि त्यानंतरच्या शासनाने वेळोवेळी काढलेल्या कोणत्याही आदेशानुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.”

सदर महाराष्ट्र पोलिसांच्या निर्णयानुसार लक्षात येते की 2022 नंतर होणारी पोलीस भरती मधे शारीरिक चाचणी आधी होणार आहे. यानंतर लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे. 

Maharashtra Police Bharti  परीक्षेचा निकाल हा लेखी व शारीरिक चाचणी मध्ये उमेदवारांना मिळणाऱ्या गुणांच्या आधारे लावण्यात येईल. 

महत्त्वाची टीप – बरेच विद्यार्थी मित्र फक्त लेखी परीक्षेचा किंवा फक्त शारीरिक चाचणीचा सराव व अभ्यास करतात. मित्रांनो, मेरिट लिस्ट मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर शारीरिक चाचणी बरोबर लेखी परीक्षेचा अभ्यास करणे गरजेचं आहे. अगदी तसेच लेखी परीक्षेचा अभ्यास करून उपयोगाचा नाही. लेखी परीक्षेच्या अभ्यासाबरोबर शारीरिक चाचणीचा सराव/व्यायाम करणं गरजेचं आहे.

याव्यतिरिक्त काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट मध्ये विचारायला विसरू नका.

MPSC Combined Exam Book List | MPSC PSI Book List 2022

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment