Maharashtra – भारतातील एक प्रगत राज्य। स्थान, क्षेत्रफळ,स्थापना कधी झाली?

 Maharashtra महाराष्ट्राची – मूलभूत माहिती

Maharashtra – महाराष्ट्र हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे.  देशातील एकूण लोकसंख्येच्या दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये दिसून येते.  लोकसंख्येबाबत प्रथम क्रमांक उत्तरप्रदेशचा लागतो.  महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य आहे.  महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. 

अशा या महाराष्ट्राबद्दल महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

महाराष्ट्राची माहिती घेण्यासाठी आधी भारताचे स्थान समजून घ्यावे लागेल.

 भारत आशियातील एक महत्त्वाचा देश – 

          भारत हा उत्तर पश्चिम गोलार्धात आहे. भारतीय हा दक्षिण आशियामधील जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आणि प्रमुख देश आहे.  हा देश लोकसंख्येच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर तर क्षेत्रफळाने जगातील  सातव्या क्रमांकावर आहे. हिमालयाच्या दक्षिणेकडे  हिंदी महासागरापर्यंत आशियाचा पसरलेला एक मोठा भूभाग आहे.  त्यास भारतीय उपखंड असे म्हणतात. यालाच भारतीय द्वीपकल्प असेही म्हटले जाते. 

द्वीपकल्प म्हणजे अशी भूमी की ज्या भूमीच्या तिन्ही बाजूने पाणी असते व एका बाजूने जमिनीचा भूभाग पाण्यामध्ये शिरल्या सारखा दिसतो. या खंडात भारत, माली, पाकिस्तान, अफगानिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका व भूतान यांचा समावेश होतो.

 भारताच्या नावाने दक्षिण आशिया खंडामध्ये भारतीय द्वीपकल्प आणि हिंदी महासागर असे दोन महत्त्वपूर्ण भौगोलिक/नैसर्गिक घटक दिसतात.  यातून भारताचे आशिया खंडातील महत्त्व अधोरेखित होते. 

 महाराष्ट्र Maharashtra –

            महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागामधील व 28 घटक राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य हे एक राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात विकसनशील राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील लोकसंख्येत दुसरे मोठे राज्य आहे, आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे आहे. महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत.

महाराष्ट्राची भूमी उत्तर भारत व दक्षिण भारत यांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. म्हणून महाराष्ट्राचे स्थान महत्त्वपूर्ण ठरते. महाराष्ट्राची पश्चिम – पूर्व लांबी 800 किलोमीटर आहे. व दक्षिण बाजूची रुंदी 720 किलोमीटर आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण 36  जिल्हे आहेत.

 महाराष्ट्राचा आकार -(The size of Maharashtra)

          भारतीय द्वीपकल्प पठाराचा आकार अनियमित व त्रिकोणाकृती आहे. उत्तर भारतामधील मैदानाच्या दक्षिणे पासून कन्याकुमारीपर्यंत ही पठारे पसरलेली आहेत.दक्षिणेकडे चिंचोळा तर उत्तरेकडे रुंद आकार आहे. द्वीपकल्पाचा पाया कोकणात आहे. व निमुळते टोक पूर्वेच्या बाजूस गोंदिया कडे आहे.

 Maharashtra लांबी रुंदी व क्षेत्रफळ

                            पश्चिमेकडील अरबी समुद्र पासून पूर्वेकडे साधारणत: पूर्व घाटापर्यंत महाराष्ट्र पसरला आहे. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. 

महाराष्ट्रामधील समुद्राजवळील जिल्ह्यांची लांबी – महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी एकूण 720  किलोमीटर आहे. बृहन्मुंबई जिल्हा 114  किलोमीटर आहे.  तर रायगड जिल्हा122  किलोमीटर आहे. ठाणे व पालघर जिल्हा 127  किलोमीटर आहे. सिंधुदुर्ग जिल्हा 120  किलोमीटर आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी.  आहे.  महाराष्ट्र देशाचा प्रदेश 9.36  टक्के प्रदेश व्यापलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात  मध्य प्रदेश व राजस्थान असून त्याचा महाराष्ट्रात खालोखाल तिसरा क्रमांक आहे.

  महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा Natural boundaries of Maharashtra-

                    महाराष्ट्राच्या वायव्य भागात गाळणा टेकड्या, सातपुडा पर्वतरांगेतील अक्राणी टेकड्या व सातमाळा डोंगररांगा आहेत. ईशान्येस दरेकसा टेकड्या आहेत. पूर्वेस भामरागड डोंगर व चिरोली टेकडया या नैसर्गिक सीमा तयार करतात. दक्षिणेकडील भागात पठारावर कोकणातील तेरेखोल नदी व हिरण्यकेशी नदी आहेत. आणि पश्चिमेकडील अरबी समुद्र  आहे.अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आहेत.

 महाराष्ट्राच्या राजकीय सीमा

             गुजरात राज्य हे महाराष्ट्राच्या वायव्य भागात आहे. दादरा व नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र आहे. पूर्वेस छत्तीसगड, अग्नेयेस तेलंगणा, उत्तरेस मध्यप्रदेश ई. राज्यांच्या सीमा रेषा आहेत. अरबी समुद्र पश्चिमेस आहे. दक्षिणेस कर्नाटक व गोवा ही राज्ये आहेत.  नंदुरबार, धुळे, गोंदिया, भंडारा, जळगाव, बुलढाणा, अमरावती, या जिल्ह्यांची मध्यप्रदेशाला सीमा लागतात.

 महाराष्ट्राची सीमा व सीमेवरील जिल्हे

  1.  दक्षिणेकडील भागात कर्नाटकाकडे कोल्हापूर,  सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, या सात जिल्ह्यांची सीमा आहेत.
  2.  दादरा व नगर हवेली हे केंद्रशासित  प्रदेशात पालघर जिल्ह्यांची सीमा आहेत. 
  3. गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्हा पूर्वेकडील छत्तीसगड या राज्याची सीमा आहेत.
  4. गोवा या राज्याबरोबर दक्षिणेस गोवा राज्याची सीमा आहे.
  5.  यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व नांदेड या चार जिल्हा आग्नेयकडील तेलंगण  राज्यातील  सीमा आहेत.
  6.  मध्य प्रदेशाबरोबर उत्तरेकडे अमरावती, नागपूर, नंदुरबार,धुळे, बुलढाणा , गोंदिया, जळगाव व भंडारा या आठ जिल्ह्यांच्या सीमा आहेत. 

महाराष्ट्र राज्याची निर्मिती / महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?

When was tha state of maharashtra established ?

  भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य 1947 मध्ये मिळाले असले तरी महाराष्ट्राची निर्मिती मात्र 1947 मध्ये झालेली नाही. तेव्हा महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वात नव्हते. महाराष्ट्राची ओळख मुंबई प्रांत अशी होती.  मुंबई प्रांतामध्ये गुजरातचा काही भाग व कर्नाटकचा सुद्धा काही भाग अंतर्भूत होता. कर्नाटक मधील बेळगाव धारवाड विजापूर कॅनरा यासारखे जिल्हे मुंबई प्रांतांमध्ये होते. 

           1951 मध्ये मुंबई राज्याची निर्मिती झाली.  यामध्ये गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छ या भागांचा समावेश होता. 1956 मध्ये द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली. 

सध्या अस्तित्वात असणाऱ्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. 4 प्रशासकीय विभाग होते. प्रशासनाच्या सोयीसाठी वेळोवेळी या जिल्ह्यांच्या मध्ये व प्रशासकीय विभाग यांच्यामध्ये बदल करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आणि सहा प्रशासकीय विभाग आहेत. 

अशाप्रकारे महाराष्ट्र अस्तित्वात आला.  महाराष्ट्र सध्या देशातील एक प्रमुख व अग्रेसर राज्य आहे. देशाच्या एकूण प्रगतीत महाराष्ट्र राज्याचे बहुमोल योगदान आहे. 

 आणखी वाचा…

भारतातील राज्य व राजधानी State and Their Capital

NEET Information In Marathi

महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली.

द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली?

1956 मध्ये द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली. 

1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली?

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र व गुजरात या राज्यांची निर्मिती झाली

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

2 thoughts on “Maharashtra – भारतातील एक प्रगत राज्य। स्थान, क्षेत्रफळ,स्थापना कधी झाली?”

Leave a Comment