महाराष्ट्रातील एकूण जिल्हे व त्यांची निर्मिती Maharashtratil Jilhe latest 2022

पोस्ट शेअर करा.

महाराष्ट्रातील जिल्हे । Maharashtratil Jilhe

महाराष्ट्रातील जिल्हे पाहण्याआधी प्रथमतः महाराष्ट्र कसा अस्तित्वात आला हे पाहणे महत्त्वाचे आहे.  कारण महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती ही महाराष्ट्राच्या निर्मितीवर अवलंबून आहे. 

 महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली.  परकीय अंमलाखाली असलेल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले.  तरी महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 मध्ये झाली. 

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे अस्तित्वात  होते.  काळाच्या ओघात सध्या म्हणजे आज 12 मार्च 2021 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे अस्तित्वात आहेत.  तारखेसहित नोंद देण्याचे कारण असे की, यापुढील काळामध्ये जिल्ह्यांची संख्या कमी जास्त होऊ शकते. 

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे, 235 तालुके, 289 शहरे आणि 3577 खेडी अस्तित्वात होती. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते.  ते म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग,  पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग.  

 सध्या महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत. 

यामध्ये नाशिक प्रशासकीय विभाग व अमरावती प्रशासकीय विभाग यांची भर पडली आहे. 

महाराष्ट्रातील एकूण जिल्हे । Maharshtratil Ekun Jilhe

Maharashtratil Jilhe सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत.  महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी असलेल्या 26  जिल्ह्यामध्ये आणखी दहा जिल्ह्यांची भर पडलेली आहे.  वाढती लोकसंख्या, प्रशासनाची सोय, लोकांची मागणी यासारख्या विविध मुद्द्यांना अनुसरून अशा जिल्ह्यांची निर्मिती केली जात असते. 

Maharashtratil 36 jilhe । महाराष्ट्रातील 36 जिल्हे

क्र.जिल्हाक्र.जिल्हा
मुंबई शहर१९जालना
मुंबई उपनगर२०बीड
ठाणे२१परभणी
पालघर२२हिंगोली
रायगड२३उस्मानाबाद
रत्नागिरी२४लातूर
सिंधुदुर्ग२५नांदेड
नाशिक२६अमरावती
अहमदनगर२७बुलढाणा
१०धुळे२८अकोला
११नंदुरबार२९वाशीम 
१२जळगाव३०यवतमाळ
१३पुणे३१नागपूर
१४सातारा३२वर्धा
१५सांगली३३भंडारा
१६कोल्हापूर३४गोंदिया
१७सोलापूर३५चंद्रपूर
१८औरंगाबाद३६गडचिरोली
Maharashtratil ekun Jilhe

महाराष्ट्रातील सुरवातीचे 26 जिल्हे | Maharashtratil Jilhe

क्र. जिल्हाक्र. जिल्हा
ठाणे१४उस्मानाबाद 
कुलाबा१५परभणी
रत्नागिरी१६नांदेड
बृह न्मुंबई१७बुलढाणा
नाशिक१८अहमदनगर
धुळे१९अकोला 
पुणे२०अमरावती 
सांगली२१नागपूर
सातारा२२वर्धा
१०कोल्हापूर२३यवतमाळ
११सोलापूर २४जळगाव
१२औरंगाबाद२५भंडारा
१३बीड२६चांदा 
महाराष्ट्रातील सुरवातीचे 26 जिल्हे

पुढील तक्ता मधील दोन जिल्हे Maharashtratil Jilhe ठळक व लाल रंगात दिसतील. ठळक केलेले जिल्हे सध्या अस्तित्वात नाहीत. या जिल्ह्यांच्या नावांमध्ये  बदल करण्यात आलेले आहेत.

 कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून ‘रायगड’ असे करण्यात आलेले आहे तर चांदा जिल्ह्याचे नाव बदलून ‘चंद्रपूर’ असे करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये झालेला बदल Maharashtratil Jilhe

महाराष्ट्रातील सुरुवातीच्या 26 जिल्ह्यामध्ये आणखी दहा जिल्ह्यांची भर पडलेली आहे.  हे दहा जिल्हे कोणत्या नवीन भूमीला महाराष्ट्र राज्यामध्ये सामावून घेत नाहीत.  अस्तित्वात असलेल्या 26 जिल्ह्यांमध्ये फोड होऊन नवीन दहा जिल्हे निर्माण झालेले आहेत.  हे पुढील प्रमाणे…. 

क्रमांकपूर्वीचा जिल्हानवीन जिल्हानिर्माण झालेली तारीख
रत्नागिरीसिंधुदुर्ग१ मे १९८१
औरंगाबादजालना१ मे १९८१
उस्मानाबादलातूर१६ ऑगस्ट १९८२
चंद्रपूरगडचिरोली२६ ऑगस्ट १९८२
बृह न्मुंबईमुंबई उपनगर१ ऑक्टोबर १९९०
अकोलावाशिम१ जुलै १९९८
धुळेनंदुरबार१ जुलै १९९८
परभणीहिंगोली१ मे १९९९
भंडारागोंदिया१ मे १९९९
१०ठाणेपालघर१ ऑगस्ट २०१४
महाराष्ट्रातील नवीन जिल्हे

Maharashtra – भारतातील एक प्रगत राज्य।स्थान, क्षेत्रफळ,स्थापना कधी झाली

UPSC information in Marathi । upsc 2021 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे?


पोस्ट शेअर करा.

2 thoughts on “महाराष्ट्रातील एकूण जिल्हे व त्यांची निर्मिती Maharashtratil Jilhe latest 2022”

Leave a Comment