TET Syllabus 2021 In Marathi | MAHATET 2021

TET Syllabus in Marathi 2021 | MAHATET

Mahatet 2021 नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातून शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे  अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची परीक्षा आहे.  यासाठी आवश्यक मुद्दे या आधीच्या लेखांमध्ये आपण पाहिलेले आहे. याव्यतिरिक्त टीईटी परीक्षेसंदर्भातील प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रमाचे स्वरूप TET syllabus या विषयी सविस्तर व विस्तृत माहिती या भागांमध्ये पाहणार आहोत. 

अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती घेण्याआधी maha tet 2021 ची कार्यक्रम पद्धती पुढीलप्रमाणे आहे.

 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ चे वेळापत्रक | MAHATET TIMETABLE

अ.क्र.कार्यवाहीचा टप्पादिनांक व कालावधी
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी०३/०८/२०२१ ते २५/०८/२०२१ वेळ २३:५९ वाजेपर्यंत
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे.२५/०९/२०२१ ते १०/१०/२०२१
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ२१/११/२०२१ वेळ स. १०:३० ते दु १३:००
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ२१/११/२०२१ वेळ दु. १४:०० ते सायं. १६:३०
MAHATET TIMETABLE

MAHATET परीक्षा दोन स्तरावर घेण्यात येते.  प्राथमिक स्तर आणि उच्च प्राथमिक स्तर

 प्राथमिक स्तर –  इयत्ता पहिली ते पाचवी साठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या डीएडधारक विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पास होणे बंधनकारक आहे.

 उच्च प्राथमिक स्तर – इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करू इच्छिणाऱ्या वेड धारक विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पास होणे अत्यावश्यक आहे.

MAHATET परीक्षा शुल्क किती आहे?

१. सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज. –  ५०० रुपये (फक्त पेपर १ / २ ) / ८०० रुपये (दोन्ही पेपर)

२. अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग  – २५० रुपये (फक्त पेपर १ / २ ) / ४०० रुपये (दोन्ही पेपर )

इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील. MAHA TET SYLLABUS

पेपर (१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर) 

पेपर १ एकूण १५० गुणांसाठी असेल. यातील  गुणविभागणी पुढीलप्रमाणे

क्रमांक विषय गुण 
(भाषा-१)३०
(भाषा-२)३०
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र३०
गणित३०
परिसर अभ्यास३०
एकूण १५०
MAHATET MARKS

१) भाषा-१ व २) भाषा-२

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा १मराठीइंग्रजीउर्दूबंगाली /गुजराती /तेलुगु /सिंधी/ कन्नड /हिंदी 
भाषा २ इंग्रजीमराठीमराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी 
TET Syllabus

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.

४) गणित :-

गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.

५) परिसर अभ्यास :-

परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २ री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)

क्रमांक विषय गुण 
(भाषा-१)३०
(भाषा-२)३०
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र३०
गणित / सामाजिक शास्त्रे ३०
विज्ञान  / सामाजिक शास्त्रे३०
एकूण १५०
TET Syllabus

१) भाषा-१ व २) भाषा-२

पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती MAHATET SYLLABUS 

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा १मराठीइंग्रजीउर्दूबंगाली /गुजराती /तेलुगु /सिंधी/ कन्नड /हिंदी 
भाषा २ इंग्रजीमराठीमराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी 
TET Syllabus MAHATET – LANGUAGE

इ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :- (३० गुण )

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

४ अ) गणित व विज्ञान विषय गट :-

गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.

४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-

सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

MAHA TET । MAHA TET Exam 2021 बद्दल सर्व काही

Reference Books for Competitive Exam 2021

APPLY NOW

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment