mpsc chalu ghadamodi| MPSC Current Affairs December 2020

एमपीएससी चालू घडामोडी mpsc chalu ghadamodi

mpsc chalu ghadamodi
mpsc chalu ghadamodi

 मुंबईला मागे टाकत पुणे बनले राज्यातील सर्वात मोठे शहर

 पुणे महापालिकेच्या क्षेत्राला लागून असलेल्या २३  गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महापालिका हद्दीत २३ गावांचा नव्याने समावेश झाला असल्याने मुंबईला मागे टाकत पुणे राज्यातील सर्वात मोठे शहर बनले आहे.  मुंबई महापालिकेची हद्द ४४० चौरस  किलोमीटर  आहे.  नव्या निर्णयानुसार तेवीस गावे पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर पुण्याचे क्षेत्रफळ ४८५ चौरस किलोमीटर होईल.  महसूल विभागाच्या दाव्यानुसार महापालिकेची हद्द ५१६ चौरस किलोमीटर होणार आहे. 

देवनागरी लिपी मध्ये मुद्रीत झालेला जगातील पहिला ग्रंथ

 देवनागरी लिपी मध्ये मुद्रीत झालेला जगातील पहिला ग्रंथ मिरज येथे  इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात समाविष्ट झाला आहे.  इसवी सन अठराशे पाच मध्ये छपाई झालेल्या या भगवद्गीता नंतरच देवनागरी मध्ये ग्रंथ छपाईची परंपरा सुरू झाली. 

इसवी सन १८०५ मध्ये बंगाल मध्ये श्रीरामपूर येथे विल्यम कॅरे याने देवनागरी लिपी मध्ये ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज प्रसिद्ध केले होते. याच वर्षी पुणे येथे सवाई माधवरावांच्या दरबारात असलेला इंग्रज वकील चार्ल्स मॅलेट यांनी येथील एका तांबट कारागिराला तांब्याच्या पत्र्यावर मुद्रण करण्यास शिकवले त्याच्याकडून त्याचवर्षी देवनागरी लिपीतून छपाई इस प्रारंभ होणार होता हे समजल्यावर या कारागिराला मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन ऊर्फ पहिले बाळासाहेब यांनी मिरजेत बोलावून घेतले त्यांच्याकडून देवनागरीतील पहिला मुद्रित ग्रंथ म्हणून भगवद्गीतेची छपाई करून घेतली एक प्रकारे १८०५ मध्ये छपाई झालेला हा ग्रंथ ही देवनागरीतील पहिला मुद्रित ग्रंथ ठरला.

 मेघालय मध्ये माशाची नवी प्रजाती

 मेघालय राज्याच्या डोंगराळ भागात स्नेकेड या माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे चमकदार रंग आणि सापाप्रमाणे तोंड असणाऱ्या यांना कुळातील माशांची संख्या मेघालयात मोठ्या प्रमाणात असून या कुळातील नवीन प्रजाती नुकतीच समोर आली आहे

 ऑनलाइन जागतिक युवा आणि कॅडेट जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा

भारताचा ग्रँडमास्टर निहाल सरिन, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर रक्षिता रवी आणि  डी.गुकेश  यांनी पुढे ऑनलाइन जागतिक युवा आणि कॅडेट जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली. निहाल सरिन याने 18 वर्षाखालील गटांमध्ये सुवर्णपदक मिळवले रक्षिता रवी हिने 16 वर्षाखालील गटात मिळवले तर डी.गुकेश याने 14 वर्षाखालील गटात सुवर्णपदक मिळवले.

रिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय

 गुजरात राज्यातील जामनगर येथे मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय उभारणार आहे.  रिलायन्सकडून उभारण्यात येणाऱ्या या प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी पक्षी सरपटणारे प्राणीही पर्यटकांना पाहता येणार आहेत.  फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील विविध भागातील प्राणी या ठिकाणी पाहता येतील.  280 एकर परिसरावर निर्माण केलं जाणार हे आधुनिक प्राणिसंग्रहालय असणार आहे.

 दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल झुलॉजिकल गार्डन्स ऑफ आफ्रिका हे प्राणी संग्रहालय जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय असून 210 एकरवर पसरलेलं आहे.

राज्यातील पहिले शासकीय आय व्ही एफ केंद्र नागपूर मध्ये

स्त्रीमधील वंध्यत्वाची समस्या सोडवण्यासाठी आय व्ही एफ तंत्रज्ञान एक वरदान ठरले आहे.गर्भधारणेला अडचण असणार्‍या स्त्रियांसाठी इन व्रिटो फर्टिलिटी तंत्राचा वापर करून मातृत्व धारण करता येते.

 नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने  पथदर्शी प्रकल्प म्हणून पहिले शासकीय आय व्ही एफ केंद्र तयार करण्याचे निश्चित केले आहे. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी ठरल्यास वैद्यकीय शिक्षण खात्याकडून राज्यातील इतर भागातही असे केंद्र तयार केले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिजन ऑफ मेरिट पुरस्कार प्रदान

भारत अमेरिकेतील सामरिक भागीदारी पुढे ने भारताला जागतिक शक्ती म्हणून नावारूपास आणल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिजन ऑफ मेरीट पुरस्कार जाहीर केला होता हा पुरस्कार मोदी यांच्या वतीने भारताचे राज्य दूत रणजीत सिंग संधू यांनी स्वीकारला. 

बिबट्यांच्या संख्येत देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

वाघांच्या गणे सोबतच भारतामध्ये बिबट्यांचे देखील गाना केली जात असून बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. नुकताच पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018 हा अहवाल प्रसिद्ध केला या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये 1690 बिबटे आहेत.  राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी एकत्रितपणे हा अहवाल तयार केला आहे. 

              बिबट्यांच्या संख्येत देशात पहिल्या क्रमांकावर मध्यप्रदेश असून मध्यप्रदेश मध्ये 3421 बिबटे आहेत तर दुसरा क्रमांक कर्नाटकचा असून कर्नाटकामध्ये 1783 बिबटे आहेत. बिबट्यांच्या संख्येत यानंतर तमिळनाडू गोवा केरळ उत्तर प्रदेश उत्तराखंड बिहार असा राज्यांचा क्रम लागतो.

MPSC chalu ghadamodi

mpsc current affairs 2020 | mpsc | चालू घडामोडी २०२० mpsc chalu ghadamodi

mpsc exam book list in marathi | mpsc exam book list

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment