MPSC Combine Exam 2021 latest Information from MPSC

PSI STI ASO Exam । MPSC Combine Exam 2021 महत्वाच्या सूचना

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२०

प्रवेश प्रमाणपत्राबाबत

जाहिरात क्रमांक ०५/२०२०, दिनांक २८ फेब्रुवारी, २०२० तसेच दिनांक ११ जानेवारी, २०२१ रोजीच्या प्रसिद्दीपत्रकानुसार आयोगामार्फत रविवार, दिनांक ११ एप्रिल, २०२१ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० करीता प्रवेश दिलेल्या उमेदबारांची प्रवेश प्रमाणपत्रे दिनांक २ एप्रिल, २०२१ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर (https://mahampsc.mahaonline.gov.in) उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे

२. परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.

३. परोक्षेस येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे. मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ त्याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राहय धरला जाणार नाही व उमेदवारास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल.

४. आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेले ई- आधार सादर करणा-या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधार वर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhaar generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह आधार डाऊनलोड केले असल्यासच ई-आधार वैध मानण्यात येईल. 

५. परोक्षेच्या दिवशी ऐनवेळी उदभवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या अतिवृष्टो इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

६. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.

७. फक्त प्रवेश प्रमाणपत्र, काळया शाईचे बाल पॉईंट पेन, मूळ वैध ओळखपत्र, मूळ वैध ओळखपत्राची छायांकित प्रत, मुखपट (मास्क), फेस शिल्ड, हातमोजे व सॅनिटाईझरची पिशवी/बॉटल (पारदर्शक) या आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल.

८. आयोगाने परवानगी नाकारलेले कोणत्याहो प्रकारचे अनधिकृत साधन/साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित उपकेंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल. अशा साधन/साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस आयोग, जिल्हा प्रशासन किंवा शाळा/ महाविद्यालय व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही

९. कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पाश्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.

१०. आयोगाच्या संकेतस्थळावरील “स्पर्धां परीक्षेकरीता उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’, प्रवेशप्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक /परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही/उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम/कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.

११. प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उदभवल्यास उमेदवारास अर्ज सादर केल्याच्या तसेच विहित कालावधीत परीक्षा शुल्क भरल्याबाबतच्या आवश्यक आयोगाच्या [email protected]

पुराव्यासह व [email protected] या ईमेल व/अरथवा ०२२ – ६१३१६४०२ या दूरध्वनी क्रमांकावरुन आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल,

MPSC Books List In Marathi for mpsc exam 2021

Reference Books for Competitive Exam 2021

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment