MPSC economics questions with answers in Marathi | Economics MCQ Quiz in Marathi 2024

MPSC economics questions with answers in Marathi | Economics MCQ Quiz in Marathi 2024

1) रिझर्व बँकेचे जवळ व्यवसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच ?

  • A) SLR
  • B) CRR
  • C) REPO
  • D)  यापैकी नाही

उत्तर – क्रमांक 2

  • CRR – प्रत्येक व्यापारी बँकांना स्वतःजवळ जमा झालेल्या एकूण ठेवी पैकी काही प्रमाणात ठेवी आर.बी.आय. कडे रोख पैशाच्या प्रमाणात ठेवावे लागतात त्या प्रमाणाला CRR म्हणतात.
  • SLR – प्रत्येक व्यापारी बँकेला स्वतःजवळ जमा झालेल्या एकूण ठेवी पैकी काही प्रमाणात ठेवी स्वतःकडे रोख स्वरूपात ठेवावे लागतात त्या प्रमाणाला एस.एल.आर. म्हणतात.

2) रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? (ASO 2016)

  • A) सरकारचे वित्तीय धोरण
  • B) सार्वजनिक कर्ज
  • C) आयात-निर्यात
  • D) रिझर्व बँकेचे पतधोरण

उत्तर – D) रिझर्व बँकेचे पतधोरण

  • रेपोरेट याचा अर्थ पुनर्खरेदी बंधन असा होतो.
  • रेपो यावर कोणत्याही वस्तूचा केला जाऊ शकतो या व्यवहारात वस्तूची आज विक्री केल्यास ठराविक कालावधीनंतर आधीच ठरलेल्या दरात पुनर्खरेदी केली जाते.
  • रेपो – रेपो व्यापारा अंतर्गत रिझर्व बँक व्यापारी बँकाकडून सरकारी रोखे खरेदी करून त्यांना कर्ज देते याला रेपो व्‍यवहार म्हणतात.
  • रिव्हर्स रेपो – या व्यवहारात व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडून सरकारी रोखे खरेदी करून तिला कर्जे देतात या व्यवहाराला रिव्हर्स रेपो  म्हणतात हे व्यवहार आरबीआयच्या पत धोरणाची निगडित आहेत.  

3) बँकेचा दर हे वतन नियंत्रणाचे कोणते साधन आहे?(PSI 2017)

  • A) संख्यात्मक
  • B) गुणात्मक
  • C) संख्यात्मक व गुणात्मक
  • D) वरीलपैकी नाही

उत्तर – संख्यात्मक

  • बँक दर – ज्या सामान्य व्याजदराने रिझर्व बँकेत व्यापारी बँकांना कर्जे दिली जातात त्या दरास बँकदर म्हणतात. बँक दराद्वारे रिझर्व बँक क्रेडिट कंट्रोल करते. बँक दर कमी झाला असता व्यापारी बँकांच्या व्याजदरांमध्ये सुद्धा कपात होईल, लोकांची बचत कमी होईल, लोकांचा उपभोग वाढेल, गुंतवणूक कमी होईल व गुंतवणुकीचा खर्च वाढेल.

4) रिझर्व बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत…… चा समावेश होतो. STI 2017

  • A) खुल्या बाजारातील कर्जरोख्यांची खरेदी-विक्री
  • B) बँक रेट
  • C) राखीव निधी चे बदलते प्रमाण
  • D) वरीलपैकी सर्व

उत्तर – वरीलपैकी सर्व

  • अर्थव्यवस्थेतील पैशांच्या संख्येत कमी-अधिक करण्यासाठी आरबीआय संख्यात्मक पद्धतीचा वापर करते.
  • संख्यात्मक पद्धतीमध्ये बँक दर, सी आर आर, एस एल आर, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, ओपन मार्केट ऑपरेशन्स, मार्केट स्टेबल रेशन स्कीम या संख्यात्मक साधनांचा वापर करते.

5) खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही? (Combine 2017)

  • A) कर आकारणी
  • B) सार्वजनिक कर्ज
  • C) खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी-विक्री
  • D) सार्वजनिक खर्च

उत्तर – खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी-विक्री.


 

6) जेव्हा रिझर्व बँक ऑफ इंडिया बँक रेट वाढवते तेव्हा ………… होते. (Excise 2017)

  • A) चलन वाढ
  • B) गुंतवणुकीस परावृत्त करणे
  • C) रोजगार इत वाढ
  • D) वरीलपैकी सर्व

उत्तर – गुंतवणुकीस परावृत्त करणे.

  • आरबीआयने बँक रेट वाढविल्यास व्यापारी बँक आणि आपल्या व्याजदरात वाढ करतात. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण कमी होते त्यामुळे नवीन गुंतवणूक थांबते त्यामुळे आरबीआय याचा वापर गुंतवणुकीस परावृत्त करण्यासाठी करते. mpsc economics questions in Marathi

7) मौद्रिक धोरण म्हणजे असे नियमक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक……. वर आपले नियंत्रण ठेवते. (combine 2018)

  • A) सार्वजनिक खर्च
  • B) पैशाचा पुरवठा
  • C) कर महसूल
  • D) वरील सर्व

उत्तर – पैशाचा पुरवठा

  • मौद्रिक धोरण हे धोरण केंद्रीय बँक राबवीत असते. याद्वारे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवले जाते. त्यासाठी बँक दर, रेपोदर, रिव्हर्स रेपो दर इत्यादी बाबींचा वापर केला जातो.

8) भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व बँक का म्हणतात? (PSI 2017)

  • A) ती सर्व अनुसुचित बँकांच्या रोख रकमेचा साठा सांभाळते.
  • B) ती सर्वश्रेष्ठ मौद्रिक आणि बँकिंग अधिकारिता आहे
  • C) ती देशाच्या बँक व्यवस्थेचे नियंत्रण करते.
  • D) ती बँकांची बँक आहे.

उत्तर – A) ती सर्व अनुसुचित बँकांच्या रोख रकमेचा साठा सांभाळते.

  • रिझर्व बँक
  • स्थापना – 1 एप्रिल 1935
  • राष्ट्रीयीकरण – 1 जानेवारी 1949
  • मुख्यालय – मुंबई
  • पहिले भारतीय गव्हर्नर – सी.डी. देशमुख

9) रिझर्व बँकेचे संदर्भात खालील प्रवर्गाचा विचार करा. (s.s.2012)

अ) कृषी क्षेत्र

ब) लघुउद्योग

क) बांधकाम क्षेत्र

ड) शैक्षणिक कर्ज

वरीलपैकी अग्रक्रम क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो?

  • A) फक्त अ
  • B) अ व ब
  • C) क व ड
  • D) क ब व ड

उत्तर – D) क, ब व ड

अग्रक्रम क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील अशी क्षेत्रे ज्यांना वेळेवर व योग्य प्रमाणात कर्ज मिळणे अवघड जाते ही कर्जे छोटी कर्जे असतात शेतकऱ्यांना शेतकाम व संलग्न कामासाठी सूक्ष्म व लघु क्रम गरीब व्यक्तींना निवाऱ्यासाठी शैक्षणिक कर्ज व इतर अल्प उत्पन्न गट दुर्बल घटक यांना दिले जातात भारतीय व्यापारी बँका एकूण कर्जापैकी 40 टक्के कर्ज अग्रक्रम क्षेत्रांना देतात.  

  • कृषी क्षेत्र एकूण कर्जपुरवठा पैकी 18 टक्के या क्षेत्रास व्हावा.
  • सूक्ष्म व लघु उपक्रम
  • शिक्षण
  • गृहनिर्माण
  • निर्माण कर्जे

10) भारतीय रिझर्व बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे? S.s.2014

A) 85 कोटी रुपये

B) एकशे पंधरा कोटी रुपये

C) 200 कोटी रुपये

D) वरीलपैकी एकही नाही

उत्तर – B

  • आरबीआयच्या चलन निर्मिती विभागास किमान 115 कोटी रुपयांचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे. आरबीआय कायदा 1934 द्वारे चलन निर्मितीचा अधिकार आरबीआयला देण्यात आला आहे. हे कार्य आरबीआयच्या प्रचालन विभागाकडून केले जाते. 1929 ते 57 पर्यंत चलन निर्मितीसाठी प्रमाणित निधी पद्धत अस्तित्वात होती. या पद्धतीत एकूण चलनाच्या 40 टक्के भाग सोन्याच्या स्वरूपात ठेवून चलनाला आधार दिलेला होता. 1956 मध्ये कायद्यात बदल करून सत्तावन्न पासून किमान निधी पद्धतीचा वापर चलन निर्मितीसाठी करण्यात आला. यात भारतीय चलनाला आधार म्हणून 200 कोटी रुपयांचा किमान निधी ठेवण्यात आला. यापैकी 115 कोटी रुपयांचे सोने तर 85 कोटी रुपयाचे परकीय, सरकारी कर्जरोखे ठेवण्याचे निश्चित केले. mpsc economics questions

11) प्रादेशिक ग्रामीण बँकांची महत्त्वाची अडचण कोणती? S.S.2012

A) वसुलीचा प्रश्न

B) खेळत्या भांडवलाचा प्रश्न

C) ग्राहकांची अशिक्षितता

D) अपुरा कर्मचारी वर्ग

उत्तर – A) वसुलीचा प्रश्न

  • एम नरसिंहन समितीच्या शिफारसीने 1975 मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली ग्रामीण भागात बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे हा मुळ हेतु ग्रामीण प्रादेशिक बँकांच्या स्थापने पाठीमागे होता. या बँकांमध्ये केंद्र सरकार 50 टक्के प्रायोजक बँक 35 टक्के राज्य सरकार 15 टक्के गुंतवणूक करत असे.
  • प्रादेशिक ग्रामीण बँका अडचणीत येण्याचे मुख्य कारण म्हणजे दिलेल्या कर्जापैकी वसूल न झालेली कर्जे वाढत गेली त्यामुळे बँकांचे बुडीत भांडवल वाढत गेले. आर आर बी वर नाबार्डचे नियंत्रण असते. 

12) बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व बँक कायदा 1934 च्या ……..सूची मध्ये समाविष्ट नाहीत. (Combine 2019)

A) दुसऱ्या 

B) पहिल्या 

C) तिसऱ्या 

D) चौथ्या

उत्तर – A) दुसऱ्या


13) भारतातील एकूण राज्य पैकी कोणते राज्य (बँकांमधील)ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? (combine 2019)

A) गुजरात

B) तमिळनाडू

C) पंजाब

D) महाराष्ट्र

उत्तर – D


14) पुढील कोणते विधान चुकीचे आहे? (STI 2015)

अ) सन 1969 मध्ये 19 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

ब) ज्या व्यापारी बँकांचे डिपॉझिट पन्नास कोटी रुपयाचे वर होते त्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

पर्याय उत्तरे

A) केवळ अ

B) केवळ ब

C) अ आणि ब दोन्ही

D) अ व ब दोन्ही नाही

उत्तर – A) केवळ अ

  • 19 जुलै 1969 या दिवशी 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ज्या बँकांच्या ठेवी पन्नास कोटीपेक्षा अधिक होत्या अशा बॅंका यासाठी निवडण्यात आल्या.
  • आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण रोखणे, ग्रामीण भागामध्ये शाखांचा विस्तार, प्रादेशिक समतोल, अग्रक्रम क्षेत्राला कर्जपुरवठा या कारणामुळे बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. mpsc economics questions

MPSC exam videos

Anganwadi Supervisor exam syllabus in maharashtra

भारतीय बँक, बँकांचा इतिहास, Banks Information In Marathi

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment