MPSC Exam Question 2021

पोस्ट शेअर करा.

MPSC Exam Question For Preparation 2021

१) भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो?

अ) बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो.

ब) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत.

क) भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो.

ड) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत.

पर्यायी उत्तरे :

A)   ब, क, ड

B)   अ, ब, क

C)   अ, क, ड

D)   अ, ब, ड

उत्तर – B

२) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्तीने प्रास्ताविकात कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे?

अ)    सार्वभौम आणि समाजवादी

ब)    समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष

क)   श्रद्धा उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा

ड)   एकता आणि एकात्मता

वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत?

A)   फक्त ब

B)   ब आणि क

C)   क आणि ड

D)   ब आणि ड

उत्तर – A

३) भारताच्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेवर……. प्रभाव दिसतो.

अ) उद्देश पत्रिकेत बंधुभाव या तत्त्वाचा समावेश केला.

ब) मूलभूत हक्काद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे.

क) हे हक्क वादयोग्य आहेत.

ड) गरजा आणि दुर्दशा पासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहेत.

वर दिलेल्या विधानापैकी कोणते/ कोणती बरोबर आहेत?

A)  केवळ अ

B) केवळ अ आणि ब

C) केवळ अ, ब, क

D) सर्व

उत्तर – D

४) खालील मुद्यांचा विचार करा.

अ) भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.

ब) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला.

पर्यायी उत्तरे : 

A)   दोन्ही बरोबर आहेत.

B)   दोन्ही चूक आहेत.

C)   ब बरोबर आहे. 

D)   अ बरोबर आहे.

उत्तर – D

५) खालील विधाने लक्षात घ्या.

अ) भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते.

ब) भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही.

क) उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का लावता दुरूस्ती करता येते.

वरीलपैकी कोणते / ती  विधान / ने बरोबर आहे / त?

A)   अ

B)   अ, ब

C)   क

D)   अ, क

उत्तर – D

६) 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे उद्देश पत्रिकेमध्ये……… आणि……. शब्द जोडण्यात आले.

अ) समाजवादी

ब) धर्मनिरपेक्ष

क) प्रजासत्ताक

ड) राष्ट्राची एकता

पर्यायी उत्तरे :

A)  फक्त अ, ब, क

B)  फक्त अ, ब, ड

C)  फक्त ब, क, ड

D)  फक्त अ, क, ड

उत्तर – B

७) उद्देश पत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांनी जुळणी करा.MPSC Exam Question

अ) राजकीय कुंडली           i) पंडित ठाकूरदास भार्गव

ब) कल्याणकारी राज्याची    ii) एम. व्ही. पायली

अचंबित करणारे तत्वे

क) उत्कृष्ट गद्य – काव्य       iii) के. एम. मुंन्शी

ड) अशाप्रकारचा केलेला 

एक सर्वोत्तम मसुदा            iv) आचार्य जे. बी. 

                                      कृपलानी

      अ        ब       क      ड

A)   iii        iv        i       ii

B)   i          ii        iii      iv

C)   ii         i         iv      iii

D)   iv        iii       ii       i

उत्तर – A

८) खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते?

A)   महाराष्ट्र 

B)  आंध्र प्रदेश 

C)  गुजरात 

D)  राजस्थान

उत्तर – B

९) महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?

A)   2000

B)   2005 

C)  2010 

D)  2011

उत्तर – C

१०) भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता?

A)    मराठवाडा 

B)    महाराष्ट्र 

C)   आंध्र प्रदेश 

D)    कर्नाटक

उत्तर – C

११) राज्य पुनर्रचनेसंबंधी फाजल – अली आयोगाने केलेल्या प्रमुख शिफारशी

अ) विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे.

ब) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र बनवता येणार नाही.

क) गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे.

ड) मुंबईला स्वतंत्र ठेवण्यात यावे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

A)    अ, फक्त

B)    अ आणि ब फक्त

C)    अ, आणि क फक्त

D)    अ, ब, क आणि ड

उत्तर – C

१२) खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला?

A)    मराठवाडा 

B)    कोकण 

C)    विदर्भ 

D)    पश्चिम महाराष्ट्र

उत्तर – C

१३) राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णने व ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयानी ती केली यांची जुळणी करा.MPSC Exam Question

अ) घटना कर्त्यांचे मन       i) पंडित ठाकूरदास भार्गव

ओळखण्याची किल्ली

ब) राज्यघटनेचा सर्वात      ii) के. एम. मुंन्शी

मौल्यवान भाग

क) राजकीय कुंडली         iii) भारताचे सरन्यायाधीश 

                                  सिक्री

ड) अत्यंत महत्वपूर्ण भाग   iv) बेरुबारी संदर्भ खटला

          अ       ब        क       ड

 A)     iv       i          ii        iii

 B)     i         ii         iii       iv

 C)     iii       iv         i        ii

 D)     ii        iii         iv       i

उत्तर – A

१४) सध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंन्द्रशासित प्रदेश आहेत?

A)  २८ व ७

B)  २६ व ९

C)  २७ व ८

D)  २९ व ६

उत्तर – A

१५) कलम ३ संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत ठरते?MPSC Exam Question

अ) कलम 3 नुसार संसद एक राज्यातून भूप्रदेश अलग करून नवे राज्य निर्माण करू शकते.

ब) संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते.

क) नवीन राज्य निर्माण करण्याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारशीनेच संसदेत सादर करता येते.

ड) अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधिमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे.

वरीलपैकी कोणता / ते पर्याय चुकीचा / चे आहे /आहेत?

A)    अ

B)    ब

C)    क

D)    ड

उत्तर – D

१६) 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

A)  न्या. एस. के. दार

B)  एस. के. पाटील

C)  ब्रिजलाल बियाणी

D)  काकासाहेब गाडगीळ

उत्तर – A

१७) भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भूत नाहीत?MPSC Exam Question

अ) दोन किंवा अधिक राज्ये एकत्रित करुन नव्या राज्याची निर्मिती करता येते.

ब) कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरिता संबंधित राज्य विधिमंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते.

क) कोणतेही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल.

ड) संबंधित राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन, नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते.

पर्यायी उत्तरे:

A)  क, ड

B)  ब, क, ड

C)  अ, ड

D)  ब, ड

उत्तर – B

१८) कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येत जर त्यास?

A)   राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

B) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

C) राष्ट्रपतींच्या शिफारशी शिवाय परंतु संबंधित संघ राज्य क्षेत्रांच्या अभिप्रायासह

D) राष्ट्रपतींच्या शिफारशी शिवाय व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

उत्तर – B

१९) नागपूर करार बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

A) विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूर येथे घ्यावे.

B) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे असावे.

C) सरकारी नोकऱ्यात लोकसंख्येच्या प्रमाणात भरती करावी.

D) मराठवाड्यातील काँग्रेस नेत्यांचा नागपुर करारास विरोध होता.

उत्तर – D

२०) घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानापैकी कोणते विधान चूक आहे?

A)   संसदेला तो अधिकार दिला आहे.

B) संसद साध्या बहुमताने तसा कायदा करू शकते.

C) विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित विधिमंडळाची मते आजमावली पाहिजेत.

D) सीमा बदलण्यासाठी संबंधित घटक राज्यांची संमती आवश्यक आहे.

उत्तर – D

Questions on Fundamental Rights – best for MPSC exams 2021.

mpsc previous year question papers for MPSC 2021

PSI/STI/ASO practice with Question MPSC Exam Question


पोस्ट शेअर करा.

1 thought on “MPSC Exam Question 2021”

Leave a Comment