NDA Admission Process in Marathi|एन डी ए परीक्षा 2022|Apply Now

पोस्ट शेअर करा.

एनडीए प्रवेश कसा घ्यावा ? NDA Admission Process in Marathi

महाराष्ट्रातील आणि देशातील बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असते की आपण एनडीए NDA मध्ये प्रवेश घ्यावा. एनडीएमध्ये प्रवेश घेऊन भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये आपले करियर करावे.  मात्र एनडीए विषयक पूर्णतः माहिती उपलब्ध होत नाही किंवा मिळत नाही. अशा महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालक वर्ग यांना माहिती देणारा एनडीए विषयक हा लेख.

NDA Admission Process in Marathi

 भारतीय संरक्षण विभागांमध्ये काम करणे म्हणजे देशाची दुहेरी सेवा करण्याची संधी  होय.  भारतीय नागरिक म्हणून नागरिकत्वाची नियमावली आपण पाळत असतोच.  याबरोबरच संरक्षण विभागामध्ये काम करून देशसेवेचे योगदान देता येईल.

देशाला सामरिकदृष्ट्या बलशाली बनवण्यासाठी भारतीय संरक्षण विभागाला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात.  राष्ट्रीय संरक्षणाच्या धोरणात्मक निर्णयानुसार सशस्त्र सेना संरक्षण उत्पादन विभाग आणि डीआरडीओ हे विभाग कार्यरत आहेत.

 भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत भारतीय सशस्त्र सेना (Indian Armed Forces), संरक्षण उत्पादन विभाग (Department of Defence production) आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (Defence Research and Development Organisation) या तीन  विभागांमध्ये एनडीए च्या माध्यमातून प्रवेश मिळवता येतो. 

 आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही संरक्षण दलामध्ये कार्य करणारे अधिकारी तयार करण्याचे काम राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अकॅडमी, एनडीए) पुणे करते.  अशा प्रकारचे अधिकारी घडवणारी देशातील एकमेव अशी संस्था  जी महाराष्ट्रामध्ये आहे. NDA Admission Process in Marathi 

बारावीनंतर एनडीएमध्ये प्रवेश मिळतो.  यासाठी देशपातळीवर घेण्यात येणारी एनडीए प्रवेश परीक्षा द्यावी लागते.  केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC एनडीए प्रवेश परीक्षा घेत असते.

 केंद्रीय लोकसेवा आयोग NDA परीक्षा कधी असते ? NDA Admission Process in Marathi

 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत वर्षातून दोन वेळा एनडीए परीक्षा घेण्यात येत असते.  ही परीक्षा एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यामध्ये होत असते. ज्यासाठी सामान्यतः जून आणि डिसेंबर मध्ये फॉर्म भरण्यासंदर्भात नोटिफिकेशन येते. 

एनडीए मधील प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड तीन टप्प्यांमधून होत असते. NDA Admission Process in Marathi

 •  केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा
 •  सर्विसेस सेलेक्शन बोर्ड मुलाखत
 •  वैद्यकीय चाचणी 

केंद्रीय लोकसेवा आयोगा कडून एनडीए परीक्षा बहुपर्यायी वैकल्पिक स्वरूपाची असते यामध्ये दोन पेपर असतात. 

NDA Exam Pattern

 •  पेपर 1 गणित
 •  पेपर 2 सामान्य क्षमता चाचणी

गणिताचा पेपर 1 – 300 गुणांचा असतो तर सामान्य क्षमता चाचणी हा पेपर क्रमांक 2 – 600 गुणांचा असतो. अशाप्रकारे 900 गुणांसाठी एन डी ए परीक्षा आयोजित केली जाते. NDA Admission Process in Marathi

 महाराष्ट्रामध्ये मुंबई व नागपूर या केवळ दोनच केंद्रावर  एनडीए प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते.

एअरफोर्स व नेव्ही साठी प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना राज्य शिक्षण मंडळाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

 एनडीए वयोमर्यादा –  ज्या उमेदवारांचे वय 16.5  ते 19  वर्षे दरम्यान आहे असे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

 सर्विसेस सेलेक्शन बोर्ड मुलाखत – 

 लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना सर्विसेस सेलेक्शन बोर्ड द्वारे आयोजित करण्यात येणारी मुलाखत द्यावी लागते.  या मुलाखतीमध्ये मानसिकता चाचणी, समूह कामगिरी आणि वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश होतो.  सदर मुलाखत 900 गुणांची असते.

 वैद्यकीय चाचणी – 

मुलाखत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आयोजित केली जाते सेना वैद्यकीय अधिकारी बोर्ड यांच्याकडून वैद्यकीय चाचणी घेण्यात येते.

 या नंतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मुख्यालय मुलाखत व वैद्यकीय चाचणी च्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी बनवतात आणि उपलब्ध जागा नुसार उमेदवारांना एनडीए प्रशिक्षणासाठी निवड झाल्याचे पत्र पाठवतात. 

 एनडीए प्रशिक्षण NDA Admission Process in Marathi

 बावीस आठवड्यांचे एक अशाप्रकारे सहा सत्रांमध्ये तीन वर्षांचा जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम उमेदवारांच्या कडून करून घेतला जातो.  या पदवी अभ्यासक्रमानंतर उमेदवार आपापल्या सेवेनुसार पुढील विशेष प्रशिक्षणासाठी नियुक्त होतात. 

 • आर्मी कॅडेट इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA), डेहराडून
 • नेव्ही कॅडेट इंडियन नेव्हल अकॅडमी, कोची
 •  एअरफोर्स केडिट इंडियन एअर फोर्स अकॅडमी, हैदराबाद

उमेदवारांना आपापल्या विभागानुसार वरील अकॅडमी मध्ये विशेष प्रशिक्षणासाठी पाठवले जाते.  विशेष प्रशिक्षणानंतर उमेदवार भारतीय सशस्त्र सेनेत कमिशनर ऑफिसर बनतो. 

पदवी अभ्यासक्रमाचे तीन वर्ष आणि विशेष अभ्यासक्रमाचे एक वर्ष असे एकत्रित चार वर्षाचे प्रशिक्षण एनडीए मध्ये मिळते. 

फक्त बारावीनंतरच संरक्षण सेवेमध्ये जाता येते का? NDA Admission Process in Marathi

 तर नाही.  पदवी पात्र उमेदवारांना सुद्धा भारतीय संरक्षण सेनेत अधिकारी म्हणून कार्य करता येते.  यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण सेवा परिक्षा (Combined Defence Services) आयोजित करत असते. 

संयुक्त संरक्षण सेवा परिक्षा (Combined Defence Services) cds

पदवीनंतर भारतीय सशस्त्र सेनेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना सी डी एस परीक्षा द्यावी लागते.  केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत वर्षातून दोन वेळा संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा आयोजित केली जाते.  मुंबई व नागपूर या दोनच केंद्रावर ती महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा घेतली जाते.

CDS शैक्षणिक पात्रता

 संयुक्त संरक्षण सेवा परिक्षा सी डी एस देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

 उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा किंवा पदवी परीक्षेत बसलेला असावा.

 नेव्हल अकॅडमी आणि एअर फोर्स अकॅडमी यातील प्रवेशासाठी उमेदवार बीएस्सी भौतिकशास्त्र व गणित विषयासह किंवा बॅचलर ऑफ इंजीनियरिंग (B.E.) पदवीधारक किंवा पदवी परीक्षेस बसलेला असावा.

CDS वयोमर्यादा

 • इंडियन मिलिटरी अकॅडमी साठी वयोमर्यादा 19 ते 24 वर्षे आहे.
 • नेव्हल अकॅडमी साठी वयोमर्यादा 19 ते 22 वर्षे आहे.
 • एअर फोर्स अकॅडमी साठी वयोमर्यादा 19 ते 23 वर्षे आहे..
 • ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी साठी वयोमर्यादा 19 ते 25 वर्षे आहे.

CDS लेखी परीक्षा स्वरूप कसे असते ?

 • इंग्रजी 100 गुण 
 • सामान्य ज्ञान 100 गुण 
 • प्राथमिक गणित 100  गुण

ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी साठी दोनच विषय असतात

 •  इंग्रजी 100 गुण
 •  सामान्य ज्ञान 100 गुण

 लेखी परीक्षेनंतर सर्विसेस सेलेक्शन बोर्ड यांची मुलाखत होते.मुलाखतीनंतर अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी निवड होते.  

आणखी वाचनीय  व मार्गदर्शन पर लेख 

Maharashtra common entrance test |MHT CET 2022

NEET Exam Information in Marathi | Neet Exam 2022

Maharashtra government teacher recruitment 2022


पोस्ट शेअर करा.

18 thoughts on “NDA Admission Process in Marathi|एन डी ए परीक्षा 2022|Apply Now”

 1. सगळ काही समजल छान वाटली माहीती

  Reply
  • खूप छान माहिती सांगली

   Reply
   • Indian Navy and Air Force साठी सायन्स गरजेचे आहे. आर्ट्स चे विद्यार्थी Indian Army साठी एनडीए परीक्षा देऊ शकता. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

    Reply
 2. २०२१ – २२ मध्ये admission notification आले आहे का ?

  Reply
 3. 2022 च्या परीक्षेच्या काही notification आले का…..?

  Reply

Leave a Comment