NEET Exam Information in Marathi | Neet Exam Marathi Mahiti

NEET Exam Information in Marathi | Neet Exam Marathi Mahiti

प्रस्तुत लेखामध्ये आपण देशपातळीवर होणारी नीट परीक्षा याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.  महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यायची असते. अशा विद्यार्थ्यांना मराठी मधुन माहिती उपलब्ध व्हावी यासाठी आपण नीट परीक्षेची मराठीमधून माहिती पाहणार आहोत. NEET exam information in Marathi

महात्मा गांधीजी म्हणाले होते की खरा भारत हा खेड्यांमध्ये बसलेला आहे. खेड्यांमधील बऱ्याच विद्यार्थ्यांना डॉक्टरी पेशा कडे पाहून एक प्रोत्साहन मिळत असते. मात्र डॉक्टर कसे व्हावे याचे मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा लेख उपयुक्त ठरेल.  सोबत आपले बरेच पालक मित्र असे आहेत की त्यांना आपल्या चिमुरड्याला डॉक्टर करायचं आहे.  अशा पालक मित्रांसाठी याठिकाणी माहिती आपण देत आहोत.

NEET exam information in Marathi language

नीट या इंग्रजी शब्दाचे विस्तारित रूप पुढीलप्रमाणे आहे.

NEET – NATIONAL ELIGIBILITY CUM ENTRANCE TEST

NEET  परीक्षा दोन प्रकारची असते. 

  • NEET – UG(UNDER GRADUATE)
  • NEET – PG (POST GRADUATE)

NEET – UG(UNDER GRADUATE) ही परीक्षा जीवशास्त्र विषयासह बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देता येते.

NEET – PG (POST GRADUATE) ही परीक्षा MBBS,BDS यासारख्या वैद्यकशास्त्राच्या पदवी अभ्यासानंतर देता येते.  म्हणजे हा मास्टर कोर्स आहे असे म्हणायला हरकत नाही.

 नीट परीक्षा कोण घेत असते? neet exam 2023

 राष्ट्रीय पातळीवर होणारी नीट परीक्षा 2019 पूर्वी CENTRA BOARD OF SECONDARY EDUCATION (CBSE)घेत असते. सध्या  National Testing Agency ही परीक्षा घेत असते. 

Fixed deposit information in Marathi

बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षा पुढील प्रमाणे असते.

 परीक्षा पद्धत – परीक्षा ऑफलाईन  पद्धतीने घेतली जाते. 

 वय मर्यादा – किमान सतरा वर्ष जास्तीत जास्त पंचवीस वर्ष.

 किती वेळा देता येते? –  फक्त तीनच वेळा देता येते.

 परीक्षा – neet exam 2023

 प्रत्यक्ष परीक्षेमध्ये तीन विभाग असतात.

विभाग विषय  प्रश्न गुण
विभाग 1 भौतिकशास्त्र(Physics) 45 प्रश्न 180
विभाग 2 रसायनशास्त्र(Chemistry) 45  प्रश्न 180
विभाग 3 जीवशास्त्र(Biology) (Botany + zoology) 90  प्रश्न 360
एकूण   180 720
NEET exam information in marathi

परीक्षा मध्ये एकूण प्रश्न 180 असतात तर त्यासाठी एकूण 720 असतात.  प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण असतात.  या परीक्षापद्धतीत नकारात्मक गुणदान योजना (Negative Marking System) असते.   दिलेल्या उत्तरात पैकी चुकीचे उत्तर दिले  तर एका  चुकीच्या  उत्तरासाठी एक गुण वजा होतो. NEET Exam 2023

नीट परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक NEET exam information in Marathi

तपशील महिना अंदाजीत
सूचना  येते डिसेंबर
अर्ज करणे फेब्रुवारी पर्यंत
परीक्षा मे
निकाल जून
neet exam information in marathi

(टीप :  सदर चे वेळापत्रक हे अंदाजीत आहे.  विद्यार्थी व पालकांना ढोबळ मानाने अंदाज येण्यासाठी.)

 नीट परीक्षेच्या निकालानंतर शासकीय व खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो.  परीक्षेमध्ये मार्क चांगले मिळाल्यास प्रवेश शुल्क कमी असणारे दर्जेदार सरकारी महाविद्यालयांमध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतो. 

नीट परीक्षेत संदर्भात मूलभूत आणि अगदी बेसिक माहिती याठिकाणी दिलेली आहे.  नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना दिलेली माहिती उपयुक्त ठरेल. नीट परीक्षांची पद्धती, गुणदान योजना याविषयी स्पष्टता येथे मिळते. Neet exam information in marathi

NEET (UG) Exam Date 2023

2023 साठी ची नीट परीक्षा 29 सप्टेंबर 2023 रोजी संपूर्ण देशात होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15th April 2023 आहे. 

 डॉक्टर कसे व्हावे?

 बारावी नंतर काय करावे?

MPSC  परीक्षेची सविस्तर माहिती

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

6 thoughts on “NEET Exam Information in Marathi | Neet Exam Marathi Mahiti”

Leave a Comment