police bharti, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची सूची, Maharashtra Police Bharti Book List 2022

पोस्ट शेअर करा.

महाराष्ट्र पोलीस भरती साठी उपयुक्त पुस्तकांची सूची Maharashtra Police Bharti Book List 2022.

महाराष्ट्र शासनाने नुकतीच महाराष्ट्र पोलिस भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेत पोलिसांच्या १२५३८ जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीची तयारी करणारे बरेच माझे मित्र गावातून आणि दुर्गम भागातून आहेत. अशा मित्रांसाठी आणि पोलीस भरती तयारी करणाऱ्या सर्वच उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी उपयुक्त पुस्तकांची सूची या ठिकाणी देत आहे.

पुस्तक सूची सोबत पोलीस भरती संदर्भात आवश्यक सूचना व तयारी करताना कोणकोणते मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे हे देखील या लेखामध्ये आहेत. 

पोलीस भरतीचा अभ्यास करताना आपल्याला आधी अभ्यासक्रमाचा विचार करणं गरजेचं असतं. अभ्यासक्रमांमध्ये पुढील विषय अंतर्भूत आहेत.

  • मराठी
  • अंकगणित
  • बुद्धिमत्ता
  • सामान्य ज्ञान

या चार विषयांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. आता चार विषय कोणते आहे हे जरी समजलं तरी प्रत्येक विषयाचे महत्त्व किती आहे हे समजून खूप महत्त्वाचा आहे कारण त्याच्या अनुषंगाने मार्कांची विभागणी होत असते. परीक्षेसाठी एकूण असणाऱ्या गुणांमध्ये प्रत्येक विषयाला मार्गांची विभागणी केलेली असते. किती मार्कांसाठी कोणता विषय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

  • मराठी – २५ गुण
  • अंकगणित – २५ गुण
  • बुद्धिमत्ता – २५ गुण
  • सामान्य ज्ञानव चालू घडामोडी – २५ गुण

असे एकूण १०० गुणांसाठी लेखी परीक्षा होणार असते.यामध्ये पात्रतेसाठी गुणदेखील ठरवले आहेत.खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना शारीरिक परीक्षेसाठी पात्र ठरण्यास ३५ गुण मिळवणे आवश्यक आहे.मागास प्रवर्गातील उमेदवारांना शारीरिक परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी ३३ गुण १०० पैकी मिळविणे आवश्यक आहे. police bharti 2021

महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये पूर्वी शारीरिक चाचणी आधी होत असे.  नंतर लेखी परीक्षा घेतली जायची. मात्र या भरती पासून लेखी परीक्षा आधी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ह्यासाठी उमेदवाराने आधी लेखी परीक्षा समजून घेणे गरजेचे आहे.

police bharti
police bharti

  लेखी परीक्षा प्रथम असल्याने प्रत्येक उमेदवाराने लेखी परीक्षा तयारी जोमाने करणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस भरती पुस्तक सूची महत्त्वाची ठरते. प्रत्येक विषयाचे प्रमाण पुस्तक चांगले गुण देऊ शकते. अश्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी उपयुक्त पुस्तकांची सूची पुढीलप्रमाणे Police Bharti Book List

मराठी – सुगम मराठी  व्याकरण व लेखन (मो. रा. वाळिंबे)

अंकगणित – संपूर्ण गणित (पंढरीनाथ राणे)

बुद्धिमत्ता – समग्र बुद्धिमत्ता चाचणी (फिरोज पठाण)

सामान्य ज्ञान – तात्यांचा ठोकळा

चालू घडामोडी – पृथ्वी परिक्रमा वाचणे.

पुस्तक सूची विश्लेषण Police bharti book list 2022 Analysis

वरील नमूद केलेली पुस्तके त्या त्या विषयातील प्रमाण पुस्तके म्हणून वापरायला हरकत नाही. सोबत आजपर्यंतचा निकाल या पुस्तकांच्या आधारे सकारात्मक लागलेला आहे असे विविध विद्यार्थ्यांच्या अनुभवातून दिसून येते. वरील पुस्तकांच्या सोबत इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप च्या पुस्तकांचा अभ्यास फायद्याचा ठरू शकतो. किंबहुना या पुस्तकावर की थोडा जास्त जोर दिला तरी मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता हे तीन विषय चांगल्या पद्धतीने तयार होतील.

मराठी विषयासाठी स्पर्धा परिक्षा विश्वात मो रा वाळिंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन हे पुस्तक प्रमाण मानले जाते. या पुस्तकाचा अभ्यास फक्त शालेय स्तरावर तीच नव्हे तर एमपीएससी आणि देशातील अग्रगण्य यूपीएससी परीक्षेसाठी सुद्धा वापरले जाते. म्हणून मराठीसाठी एकमेव पुस्तक आहे असे म्हणायला हरकत नाही.

अंकगणिताचा विचार करता पंढरीनाथ राणे यांचे समग्र अंकगणित या पुस्तकाचा अभ्यास करावा. सोबत इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप पुस्तकांचा सराव करावा. अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयांसाठी सराव खूप महत्त्वाचा आहे. बुद्धिमत्तेने साठी फिरोज पठाण यांचे उपरोक्त पुस्तक सोबत अनिल अंकलगी यांचे पुस्तक सुद्धा वापरू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती च्या अभ्यासक्रमामध्ये सामान्‍य ज्ञान व चालू घडामोडी हा भाग एकत्रित दिलेला आहे. या विभागाला 25 गुण आहेत मात्र यामध्ये व्यवस्थित लक्ष घातले तर आपल्या लक्षात येईल की दोन विषयांमध्ये अंतर्भूत आहेत. सामान्य ज्ञान हा एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे आणि चालू घडामोडी हा एक स्वतंत्र विषय आहे. म्हणून या दोन विषयांना स्वतंत्रपणे पुस्तके वापरणे गरजेचे आहे.वर उल्लेख केलेली दोन पुस्तके स्वतंत्ररीत्या या विषयांमध्ये वापरल्यास चांगले गुण मिळू शकतात.

maharashtra police bharti books महाराष्ट्र पोलीस भरती

सध्या कोरोना संकटामुळे अभ्यासाला जास्त वेळ मिळत आहे त्या वेळेचा सदुपयोग करून घ्या व अभ्यास करत रहा. सोबत याचाच एक वाईट परिणाम म्हणजे परिक्षांच्या बाबत कोणतीही निश्चितता दिसत नाही. तरीही आपला अभ्यास आपण अखंडपणे चालू ठेवणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही क्षेत्रातील घेतलेले ज्ञान कधीही वाया जात नाही पहिला फायदा अभ्यास केल्याने होतो. दुसरा फायदा अभ्यासाचा असा होतो की आपल्या असणाऱ्या ज्ञानात भर पडते. तिसरा फायदा असा की नंतर होणाऱ्या परीक्षेसाठी आत्ता केलेला अभ्यास उपयोगी येतो.

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी कशी होते?

महाराष्ट्राच्या पोलीस भरती police bharti मध्ये शारीरिक चाचणीचा विषय भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येतो.यामध्ये शारीरिक चाचणी स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी वेगळ्या प्रकारे होत असते. यासाठी दिलेले गुणदेखील वेगळे असतात. पूर्वी पोलीस भरतीमध्ये शारीरिक चाचणी 100 गुणांसाठी असायची. सध्या मात्र या चाचणीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये शारीरिक चाचणी परीक्षा पन्नास गुणांसाठी घेतली जाते. यामध्ये शारीरिक चाचणीची गुणविभागणी पुढीलप्रमाणे असते. police bharti 2021

पुरुषांसाठी

  • १६०० मीटर धावणे – ३० गुण
  • १०० मीटर धावणे – १० गुण
  • गोळाफेक            – १० गुण

महिलांसाठी

  • ८०० मीटर धावणे   – ३० गुण
  • १०० मीटर धावणे   – १० गुण
  • गोळाफेक             – १० गुण

महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भातल्या वरील प्रमाणे सर्व माहिती देता येईल. आशा करतो आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे सदर लेखातून मिळाले असतील.

महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2022 police bharti 2022

आता प्रश्न उरतो तो म्हणजे ही भरती प्रक्रिया कधी होणार आहे? सध्या तुम्ही आम्हीच नव्हे तर राज्य देश आणि जग कोरोना संकट काळातून जात आहे. त्यामुळे भरतीबाबत अनिश्चितता दिसत आहे. मात्र कोरोना काळ संपल्यानंतर लगेच भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असे दिसते. म्हणजे कोरोना वरती औषध मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल. आणि औषध कोणत्याही घटकेला मिळू शकते. कारण संपूर्ण जगच औषधाच्या शोधासाठी प्रयत्नशील आहे. याची दखल तुम्ही-आम्ही घेऊन अभ्यासावराती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.

हेही वाचा :- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०

UPSC information in Marathi । upsc 2021 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे


पोस्ट शेअर करा.

Leave a Comment