TAIT Exam Syllabus Free Download PDF

पोस्ट शेअर करा.

TAIT Exam Syllabus, Exam, Books Free Download

TAIT Exam ही एक अशी परीक्षा आहे, जी महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीसाठी 2017 पासून लागू केलेली आहे. TAIT म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होय.

TAIT Full Form

Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test – सदर परीक्षा शिक्षक भरतीसाठी डिसेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा घेण्यात आलेली होती. यापूर्वी CET च्या माध्यमातून शिक्षक भरती केली जात असे.

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करीता पात्रता

सर्वसाधारणपणे महाराष्ट्र शिक्षक भरती करिता डीएड आणि बीएड पात्रताधारक TAIT परीक्षा देण्यासाठी पात्र असतील.

इयत्ता १ ली ते ८ वी मधील शिक्षक [ Maha Tet परीक्षा पास ] पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मध्ये विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी करिता उक्त नियमावलीत विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण केलेले उमेदवार सदर परीक्षेस पात्र असतील.

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करीता वयोमर्यादा काय आहे.

शिक्षक सेवक पदी किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारा करिता ३८ वर्ष व मागास सवर्ग उमेदवारा करिता ४३ वर्ष राहील.

TAIT Syllabus

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम खालील प्रमाणे.

पेपर साठी २ घटक असतात अभियोग्यता व बुद्धिमता व परिक्षा ही एकून २०० प्रश्नांची व २०० गुणांची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येईल.

  • अभियोग्यता 120 प्रश्न (60% प्रश्न )
  • बुद्धिमत्ता 80 प्रश्न (40% प्रश्न)
  • एकूण गुण – 200
  • वेळ –  2 तास
विषयप्रश्न संख्याएकूण गुण
अभियोग्यता120120
बुद्धिमत्ता8080
एकूण200200

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकावर आधारित असेल,

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमतामध्ये शेकडा ६०% म्हणजेच १२० प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर शेकडा ४०% म्हणजेच ८० प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील.

 अभियोग्यता या घटकांमध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो. 

अभियोग्यता

  • 1. गणितीय क्षमता,
  • 2 तर्क क्षमता,
  • 3. वेग आणि अचूकता,
  • 4. इंग्रजी भाषिक क्षमता,
  • 5. मराठी भाषिक क्षमता,
  • 6. अवकाशीय क्षमता,
  • 7. कल / आवड,
  • 8. समायोजन / व्यक्तिमत्व

 बुद्धिमत्ता या घटकामध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो. 

बुद्धिमता

  • 1. आकलन,
  • 2. वर्गीकरण,
  • 3. सांकेतिक भाषा,
  • 4. लयबध्द मांडणी,
  • 5. समसंबंध
  • 6. कुट प्रश्न,
  • 7. क्रम श्रेणी,
  • 8. तर्क व अनुमान

इत्यादी उपघटकांचा सर्वसाधारणपणे समावेश करण्यात येईल

TAIT Exam Book | TAIT Book

शिक्षक अभियोग्यता चाचणी साठी उपयुक्त पुस्तके कोणती वापरावी :

 कोणत्याही शासकीय परीक्षांची तयारी करण्यासाठी शासकीय पुस्तकांचा वापर जास्त करावा.  ही अत्यंत महत्वाची सूचना आपल्या लक्षात असणे गरजेचे आहे.  जसे की स्कॉलरशिपची पुस्तके, नियमित अभ्यासक्रमाची पुस्तके (बालभारती),  इतर शासकीय प्रकाशित संदर्भ साहित्य. 

 शासनाच्या परीक्षेमध्ये खाजगी पुस्तकांचा विचार न करता शासकीय पुस्तकांमध्ये  असलेली माहिती किंवा मजकूर  मुख्यतः ग्राह्य धरला जातो. 

 मात्र फक्त शासकीय पुस्तकेच पुरेशी आहेत असे म्हणणे देखील योग्य नाही यासाठी इतर पुस्तकांची लिस्ट या ठिकाणी देत आहे. 

यामधील अभियोग्यता घटकांतर्गत खालील विविध उपघटक आहेत, त्यासाठी उपयुक्त पुस्तक सूची देत आहे.

1) गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता या घटकांच्या तयारीसाठी

. 5 वी व 8 वी स्कॉलरशिप ची पुस्तके कोणतेही अंकागणिताचे

 (उदा: पंढरीनाथ राणे, मोकलीकर, सतीश वसे इ) बुक वापरू शकता.

 कोकिळा प्रकाशन चे पुस्तके, आर. एस. अगरवाल चे पुस्तके

2) मराठी व्याकरण –

मराठी – सुगम मराठी  व्याकरण व लेखन (मो. रा. वाळिंबे

3) इंग्रजी साठी

English Grammar

4) अवकाशीय क्षमता, कल / आवड, “समायोजन/ व्यक्तिमत्व, इत्यादी

यासाठी शिक्षक अभियोग्यता मार्गदर्शक सर्वात उत्तम राहील, या बुक मध्ये सर्वच घटक खूप छान प्रकारे कव्हर केलेले आहेत. शिवाय संभाव्य प्रश्नपत्रिकाही दिलेली आहे, त्यामुळे तुम्हास प्रश्नपत्रिका स्वरूप कसे आहे समजून घेण्यास मदत होईल.

5) बुद्धिमत्ता 

या अंतर्गत येणाऱ्या घटकांच्या तयारीसाठी खालील पुस्तके वापरावीत.

तैसेच 5 वी व 8 वी स्कॉलरशिप ची बुक्स वापरणे अत्यावश्यक आहे. दिलेली बुक लिस्ट जवळपास परिपूर्ण आहे, आपण राहिलेल्या दिवसात त्यातून संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करू शकता …

 शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची वाढती संख्या,  शासकीय शाळांमधील रिक्त शिक्षकांची संख्या,  दोन भरती प्रक्रिया मधील असणारा मोठा कालावधी या सर्वांचा विचार करता तूम्ही येणाऱ्या कालावधीत नक्कीच शिक्षक होणार.

 या व्यतिरिक्त आपले मत खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता.  आपल्याला असणाऱ्या शंकांचे निरसन करण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल. 

 याव्यतिरिक्त आमचे वाचनीय व माहितीपूर्ण लेख..

शिक्षक होण्यासाठी काय करावे? (New and latest 2022)

Best Book For Talathi Exam

TAIT Syllabus Download Free PDF


पोस्ट शेअर करा.

9 thoughts on “TAIT Exam Syllabus Free Download PDF”

  1. खूप महत्वपूर्ण माहिती.
    धन्यवाद.

    Reply
  2. Sir mi sadhy B.ed I year la aahe. mi abhiyogyta exam deu shakato ka….?

    Reply
  3. खूप छान माहिती दिली सर

    Reply
  4. वयो मर्यादा 38 वर्ष सांगण्यात येत आहे ,ज्यांचे 38 वर्षे वय पूर्ण असेल ते टेट एक्झाम देऊ शकता का.

    Reply
  5. जनरल कॅटागिरी साठी वयोमर्यादा 38 आहे.. टेट देऊन उपयोग होईल का? माझे वय ४३ वर्ष आहे..

    Reply
    • असे काही पदे आहेत की ज्यांना ही वयोमर्यादा लागू होत नाही. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link https://www.nitinsir.in/

      Reply
  6. PWD students sathi 180markschi exam aasate ka?

    Reply

Leave a Comment